Wednesday, 9 August 2023

कपिल पाटील फाउंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी संजय हंडोरे पाटील यांची निवड !!

कपिल पाटील फाउंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी संजय हंडोरे पाटील यांची निवड !!

*संजय हंडोरे पाटील यांच्या सामाजिक कार्याची घेतली दखल*

मुरबाड, प्रतिनिधी : सामाजिक सेवेत मदतीचा हात, गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, असाह्य  रुग्णांना वैद्यकीय मदत, शासकीय लाभापासून वंचित असलेल्याना शासकीय योजनांचा लाभ व युवकांच्या करियर करिता मार्गदर्शन करणारे कपिल पाटील फाउंडेशन प्रत्येक ग्राम शाखेच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे, या फाउंडेशनचे आधारस्तंभ "केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील" हे असून, "संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील" आहेत, ठाणे जिल्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका अध्यक्ष व कार्यकारिणीच्या निवडी चालू असता, याच संदर्भात मुरबाड शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कपिल पाटील फाउंडेशनच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये कपिल पाटील फाउंडेशनच्या मुरबाड तालुकाध्यक्षपदी 'संजय हंडोरे पाटील' यांचे सर्वांनुमते निवड करण्यात आली.... 

कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, ठाणे जिल्हा सार्वजनिक व्यायाम शाळा संघाचे अध्यक्ष, वृत्तपत्र कोकण वैभव चे संपादक, तसेच अनेक संस्था संघटना यावर विश्वस्त व जबाबदार पदाधिकारी म्हणून काम पाहणारे 'संजय हंडोरे पाटील' यांच्या सामाजिक कार्याचा आढावा पाहता त्यांच्या हातून अनेक सामाजिक कार्य झालेली आहेत. गावचे सरपंच असताना प्रथम त्यांनी इयत्ता दहावी बारावी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेत ध्वज फडकवण्याचा मान देण्याचा अनोखा क्रांतिकारी निर्णय घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी केली. तो निर्णय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देणारा.. त्यांच्या आई-वडिलांना मानपान देणारा.. आणि  झेंडावंदनाकरिता हापहापल्याना  चपराक देणारा हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रात, भारतामध्ये भादाणे गावाचा  झेंडावंदन अनोखा उपक्रम म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेने या उपक्रमाचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे. गाव तेथे वाचनालय गाव तेथे व्यायाम शाळा ही चळवळ ते येत्या दहा वर्षांपासून ते ठाणे पालघर रायगड जिल्ह्यामध्ये राबवत आहेत. त्यामुळे शेकडो गावांना व्यायामाचे साहित्य पोहोच झाले आहे... अनेक तालुक्यात वाचनालयाची शिबिरे भरून सार्वजनिक वाचनालय नोंदणी पासून अनुदानापर्यंत व्यवस्थापन इत्यादी माहिती शिबिरांच्या माहिती माध्यमातून ते देत असतात.. कोणताही जादूटोणा तंत्र मंत्र चमत्कार न करता केवळ मानसशास्त्रीय उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीने व्यसनमुक्तीचा कार्यक्रम गेले वीस वर्षे ते करत आहेत. या उपचार पद्धतीचा शेकडो लोकांनी लाभ घेतला असून त्यांचे हे कार्य अखंडपणे चालू आहे... सेवाभाव हा त्यांचा स्थायीभाव असल्यामुळे कोणतेही सामाजिक कार्य करण्यास त्यांना मोठा फार समाधान वाटत असते  ..वृक्षारोपण असो किंवा  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असो. याकडे सामाजिक दायित्व या नजरेने पाहणारे हे व्यक्तिमत्व कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कोकणाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी अनेक वेळा आझाद मैदानामध्ये उपोषण आंदोलने केली असून त्यांची अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली आहे अश्या, होतकरू, हुशार, हसतमुख कार्यक्षम व्यक्तीची कपिल पाटील फाउंडेशनच्या मुरबाड तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व तालुक्यातील पत्रकारानी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे..

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...