Wednesday, 13 December 2023

ओम श्री सद्गुरू पुरुषोत्तम शांतीस्थान दरबार येथे श्री राम कथा, श्री भागवत कथा ज्ञानसत्र सप्ताह संपन्न !!

ओम श्री सद्गुरू पुरुषोत्तम शांतीस्थान दरबार येथे श्री राम कथा, श्री भागवत कथा ज्ञानसत्र सप्ताह संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             ओम श्री सद्गुरू पुरुषोत्तम शांतीस्थान दरबार (रजि) या विद्यमान संस्थेच्या वतीने काजरोळकर सोसायटी समोर , नॉर्थ बॉम्बे शाळेजवळ, बर्वे नगर, घाटकोपर (प.) मुंबई -८६ येथे श्री राम कथा, श्री भागवत कथा सप्ताह पार पडला. या श्री राम कथा, भागवत कथेला प्रमुख पाहुणे म्हणून  शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते साहेब (माजी केंद्रीय ऊर्जा व अवजड उद्योग मंत्री) यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या हस्ते भागवत कथाकर कुमार वेदांत महाराज कुंभार यांना शाल व श्रीफळ  देऊन सन्मानित करण्यात आले. 

महाड जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत धोंडगे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक - १२३ राजेन्द्र पेडणेकर, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक १२४ यशवंत वि. खोपकर संस्थापक अध्यक्ष मायेची सावली एक हात कर्तव्याचा यांनी या कथेला शुभेच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत संस्थेचे पदाधिकारी मारुती कुंभार (भागवताचार्य), विनायक जाधव, अश्विन फाळके,प्रवीण साळुंखे भिवा टेमगिरे, रामचंद्र शिर्के लक्ष्मण इंदोरे शांताराम मांडके रवींद्र तांबे,एकनाथ शेडगे, मधुकर रेवाळे, शांताराम कदम, सुरेश धाडसे, ज्ञानदेव फाळके, प्रमोद साळुंखे, संदीप शिर्के, ज्ञानेश्वर भोर, युवराज डांगळे, रोहिदास फुटाणे, कुमार सुजल हरिदास अजगणकर उतेकर, ओम श्री सद्गुरू पुरुषोत्तम शांतीस्थान दरबार, अध्यक्ष, सचिव, संतोष तांबे, शंकर ठोंबरे उमेश शेडगे आणि सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...