Tuesday, 5 December 2023

कल्याण मुरबाड तालुक्यातून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांना अभिवादन !!

कल्याण मुरबाड तालुक्यातून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांना अभिवादन !!

कल्याण, संजय कांबळे -

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना संपूर्ण कल्याण मुरबाड तालुक्यातून विविध प्रकारच्या उपक्रमाव्दारे अभिवादन करण्यात आले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिंसेबर 1956 साली महानिर्वाण झाले, हे धगधगते वादळ शिवाजी पार्क दादर च्या अथांग समुद्र किनारी आजच्या दिवशी शांत झाले, तेंव्हा पासून ते आजपर्यंत देशभरातून लाखोंच्या संख्येने भिम अनुयायी चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात, दिवसेंदिवस यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे, त्यामुळे बाहेरून व लांबच्या ठिकाणावरून येणाऱ्या प्रत्येक अनुयायांना दर्शन व्हावे, अभिवादन करता यावे, म्हणून मुंबई व उपनगर परिसरातील अनुयायी हे आप आपल्या भागात आजच्या दिवशी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात, यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, प्रबोधन पर कार्यक्रम, रक्तदान, शिबीर, अन्नदान वाटप, आदी विविध उपक्रमांचा समावेश असतो.

कल्याण तालुक्यातील विविध शाळा, जीवनदिप महाविद्यालय, म्हारळ, वरप, कांबा, ग्रामपंचायत, जनाधार निर्भीड पत्रकार संघ, धम्मदिप संघ, तसेच विविध संघटना, पक्ष आदींनी या कार्यक्रमाद्वारे अभिवादन केले तसेच ज्या ज्या अनुयायांना चैत्यभूमीवर जाता येत नाही, ते कल्याण, बदलापूर, मुरबाड मधील आंबेटेंभे, इत्यादी ठिकाणी जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात, विशेष म्हणजे मुंबई प्रमाणे याही परिसरात मोठ्या प्रमाणात भिम अनुयायींनी गर्दी केली होती, एकूण संपूर्ण कल्याण मुरबाड तालुक्यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...