Friday, 8 December 2023

राष्ट्रीय कर्मचारी सेनातर्फे कामगारांच्या न्याय हक्कासाठी सहारा एअरपोर्ट येथे सभा !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनातर्फे कामगारांच्या न्याय हक्कासाठी सहारा एअरपोर्ट येथे सभा !!

*बहुसंख्य कामगारांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये जाहीररित्या प्रवेश*

***** राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या फलकाचे अनावरण

मुंबई, (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :
           महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मा.आ. शिवसेना- सचिव अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वात  दिनांक ०८/१२/२०२३ रोजी सहारा एअरपोर्ट (BWFS ग्राउंड हँडलिंग) कामगारांच्या न्याय हक्कासाठी गेट मीटिंग घेण्यात आली. 
           तेथील बहुसंख्य कामगारांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये जाहीररित्या प्रवेश केला. तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या फलकाचे अनावरणही  करण्यात आले. यावेळी सोबत विभाग प्रमुख कुणाल सरमळकर, गणेश शिंदे, विजय धीवार, बोरिवली लोकसभा संपर्क प्रमुख सचिन म्हात्रे, माजी नगरसेविका सौ. वंदना गवळी, माजी नरसेवक प्रदीप गवळी, सुभाष सावंत, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष श्रेयस सु.पाडावे  तसेच चिटणीस, रितेश शिवडीकर, सचिन लिमण, सूर्यकांत शिगवण, तुषार केसरकर, सह-चिटनीस अर्जुन आहेर आणि शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रदीप भंगारे, शाखाप्रमुख मोहितेश नवघरे, शाखा प्रमुख उप- शाखाप्रमुख तसेच वरळी येथून आलेले शिवसैनिक नितेश पाटील आणि त्यांचे सहकारी तसेच बॉम्बे हॉस्पिटल यूनिट आणि जे. डब्लू. मॅरीयट हॉटेल यूनिटचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या प्रमाणात यूनियनचे पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक व BWFS चा कामगार वर्ग उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...