Saturday, 15 June 2024

आपल्याला मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगले काम करायचे आहे - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा)

आपल्याला मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगले काम करायचे आहे - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा)


कल्याण, प्रतिनिधी : कल्याणचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम आता उद्यापासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाची गुरुवारी (१३ जून) रोजी पडझड झाली असून भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह दुर्गाडी किल्ल्याची पाहणी केली.

विशेष म्हणजे पीडब्ल्यूडीकडून काही वर्षांपूर्वीच या बुरुजाचे काम करण्यात आले होते. हा बुरुज ढासळल्याची माहिती मिळताच सायंकाळच्या सुमारास पीडब्ल्यूडी अधिकारी, केडीएमसी अधिकारी आदींच्या उपस्थितीत भिवंडी मतदारसंघाचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी आधी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले आणि नंतर या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी केली. त्यावेळी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच हे डागडुजीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले.

आपण विकासकामांसाठी कोणाकडूनही एक रुपया घेणार नाही. आपल्याला मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगले काम करायचे आहे. जर काम चांगले केले नाही तर, मग तो कंत्राटदार असो की शासकीय अधिकारी, त्यांचा कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.' असे सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी इएसआय (ESI) यंत्रणा सक्षम करण्यास सरकार कटिबद्ध !!

कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी  इएसआय (ESI) यंत्रणा सक्षम करण्यास सरकार कटिबद्ध !! भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबतच्या बै...