Tuesday, 27 May 2025

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा व्हॉट्सॲप ग्रुपचा ५ वा वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यातील समशेरसिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा वरदडा येथे उत्साहात साजरा !!

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा व्हॉट्सॲप ग्रुपचा ५ वा वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यातील समशेरसिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा वरदडा येथे उत्साहात साजरा !!

मुंबई, (केतन भोज) : आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त २६ वा सामाजिक उपक्रम दि.२५ मे २०२५ रोजी समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा जिल्हा बुलढाणा येथे साजरा करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबई येथील एकनिष्ठ शिवसैनिकांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गरजू नागरिकांना आर्थिक आणि वैद्यकीय मदतीसोबतच होतकरू विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांना शालेय साहित्य तसेच धान्य आदि वस्तू देणगी स्वरूपात देण्यात येते. कोरोना काळात २५ एप्रिल २०२० रोजी सुरु करण्यात आलेल्या "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रभर विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या ब्रिद वाक्याप्रमाणे सामाजिक ऋण फेडण्याचे काम या ग्रुपच्या माध्यमातून केले जात असून संपूर्ण महाराष्ट्रात या ग्रुपचे सदस्य आहेत.त्यांच्या या स्पृहाणीय कामाची खुद्द उद्धव ठाकरे यांनीही मुक्तकंठाणे प्रशंसा केलेली आहे. "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हॉट्सॲप ग्रुपचा वरदडा, बुलढाणा येथे झालेला हा २६ वा सामाजिक उपक्रम असून या ग्रुपकडून समशेरसिंग पारधी आदिवासी आश्रम शाळेतील १२० विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी एक वर्षाच्या नेट पॅकसह ५० इंच एलईडी टीव्ही, ब्लॅंकेट, धान्य, गृह उपयोगी वस्तू आणि शालेय साहित्य देण्यात आले.शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कर्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, सिंदखेड तालुका प्रमुख महेंद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याच बरोबर ग्रुपचे संस्थापक, संचालक संतोष पाटील, अध्यक्ष सुरेश वाडकर, उपसेक्रेटरी भालचंद्र उकिर्डे, सल्लागार विलास चव्हाण, उपसेक्रेटरी सौ.वासंती गोताड, उपखजिनदार सोनिया पाटील तसेच ग्रुपचे सदस्य रेणुका पालांडे, संतोषी पवार, गीता कांबळे, छाया गायकवाड, श्रीराम खेलदार, दत्ताराम मोतेकर, संदीप पाटील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शिवसैनिक यावेळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी विद्येची देवी सरस्वती, क्रांतिवीर समशेरसिंग पारधी तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. तद्नंतर आशिष रहाटे, संतोष पाटील, रेणुका पालांडे आणि रत्नाबाई पवार यांची समायोजित भाषणे झाली.

No comments:

Post a Comment

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...