Monday, 23 March 2026

घणसोली येथे नागरी संरक्षण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन; प्रशिक्षणार्थींना ओळखपत्रांचे वितरण !!

घणसोली येथे नागरी संरक्षण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन; प्रशिक्षणार्थींना ओळखपत्रांचे वितरण !!

बातमीदार प्रतिनिधी: ता.२२, रविवार दि. १५/०३/२०२६ रोजी नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणेचे उपनियंत्रक मा. श्री. विजय जाधव साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली घणसोली येथील ज्ञानसागर शिक्षण संस्थेत मूलभूत नागरी संरक्षण व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

शैक्षणिक वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून संस्थेतर्फे मा. श्री. विजय जाधव साहेब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच घणसोली परिसरातील नागरी संरक्षण दलात नव्याने भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावरून नागरी संरक्षण दलाचे महत्त्व विशद करून संघटनेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, संघटन सशक्त व बळकट करण्यासाठी प्रचार-प्रसारासह जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रभारी विभागीय क्षेत्ररक्षक कोपरखैरणे श्री. अरुण महादेव सातपुते, उपविभागीय क्षेत्ररक्षक प्रगती वाघमारे, हनुमंत साबळे, अरुण शिरसाट, वर्षा पोपळे तसेच मुख्याध्यापिका, सर्व प्रशिक्षणार्थी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

सौजन्य/वृत्त - विश्वनाथ राऊत सर 

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...