Wednesday, 25 March 2026

माजी मंत्री सतेज पाटील यांच्या मुलाच्या शाही विवाहाला महेंद्रशेठ घरत उपस्थित !

माजी मंत्री सतेज पाटील यांच्या मुलाच्या शाही विवाहाला महेंद्रशेठ घरत उपस्थित !

तेजस पाटील यांना महेंद्रशेठ घरत यांनी दिल्या शुभेच्छा!

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्या मुलाचा (तेजस आणि स्नेहा) शाही विवाह सोहळा मंगळवारी (ता. २४) कोल्हापूर येथे संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आवर्जून उपस्थित होते. आपली मैत्री सदोदित कायम राहावी आणि वधुवरांस शुभाशीर्वाद देण्यासाठी महेंद्रशेठ घरत कोल्हापूर येथे गेले होते. शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. वाय. पाटील यांचे सतेज पाटील हे चिरंजीव, तर तेजस हा नातू. त्यामुळे या विवाह सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...