Thursday, 2 April 2026

पडघ्यात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीचे आयोजन !!

पडघ्यात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीचे आयोजन !!

** २५ गावांचा सहभाग; प्रबोधन सत्र, भव्य मिरवणूक

भिवंडी, प्रतिनिधी (मिलिंद जाधव) :

पडघा परिसरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  संयुक्त जयंती  महोत्सव  पडघे विभागाच्या वतीने मंगळवार, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर  संयुक्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पडघा येथील जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळेत करण्यात आले असून सकाळी १०.३० वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उद्घाटनानंतर बुद्ध वंदना तसेच मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ होईल .तर यंदाच्या जयंती महोत्सवात प्रबोधनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रबोधन सत्रात प्रसिद्ध शाहीर आकाश पवार हे “आम्ही भारताचे लोक आणि भारतीय संविधान” या विषयावर मार्गदर्शन करणार असून उपस्थितांना संविधानाविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सायंकाळी ६ वाजता समतानगर बुद्ध विहार येथून जिल्हा परिषद मराठी शाळा, पडघा पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा विद्युत दिव्याची रोषणाई आणि फुलांनी सजविलेल्या रथावर विराजमान करून जयघोषाच्या वातावरणात जयंती साजरी होणार आहे. या संयुक्त जयंती उत्सवासाठी पडघा परिसरातील तब्बल २५ गावे एकत्र येत असून सामाजिक ऐक्य व महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभागातील आयोजकांकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...