Saturday, 2 May 2026

निकालाच्या तोंडावर शासकीय दाखला पोर्टल बंद !!

निकालाच्या तोंडावर शासकीय दाखला पोर्टल बंद !!

** पालक विद्यार्थ्यांना नाहक त्रास.; विद्यार्थी पालकांना शैक्षणिक नुकसानीची भीती.

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
बारावीचा निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन दाखल्यासाठीचे शासकीय पोर्टल गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने उरणमधील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मात्र, पोर्टल बंद असल्याने हे दाखले मिळविणे अशक्य झाले आहे.पुढील शिक्षणासाठी जात, उत्पन्न, रहिवासी आदी विविध दाखल्यांची आवश्यकता असते मात्र ते वेळेत मिळत नसल्याने  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या परिस्थितीचा परिणाम सेतू केंद्रांवरही झाला असून, पोर्टल बंद असल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. नागरिकांची गर्दी वाढत असताना सेवा देणे शक्य नसल्याने सेतू चालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी निकालाच्या काळात पोर्टल बंद पडण्याचा अनुभव येत असल्याने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...