Monday, 21 February 2022

राष्ट्रीय तायक्वांदो निवड चाचणी आजपासून सुरूवात !! "केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री भागवतजी कराड यांच्या हस्ते उद्घाटन"

राष्ट्रीय तायक्वांदो निवड चाचणी आजपासून सुरूवात !!

"केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री भागवतजी कराड यांच्या हस्ते उद्घाटन"


औरंगाबाद, बातमीदार :-  तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि इंडिया तायकांदो यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुल येथे तायक्वांदो राष्ट्रीय निवड चाचणीला आज सुरुवात झाली. 

या उद्घाटन समारंभ साठी "केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री भागवतजी कराड", 'आमदार श्री अतुलजी सावे', 'ग्रँडमास्टर किरॅश बहरी', वर्ल्ड तायक्वादोचे भारतीय कॉर्डिनेटर व ग्रेडमास्टर हसन मलेको मोगदम तसेच भारतीय तायक्वांदो महासघाचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव श्री संदीप ओंबासे व आदी मान्यवर उपस्थित होते.. 

या उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री भागवतजी कराड यांनी तायकांडो या खेळाला शासनाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील तसेच तायकांदो या खेळाला श्री नामदेव शिरगावकर आणि आमचे मित्र श्री संदीप ओंबासे यांनी राज्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. असे सांगितले...

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते. माननीय श्री प्रवीणजी घुगे राज्य सचिव भाजपा, श्री. संजय केणेकर साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष, श्री. के. डी. शार्दुल सर, जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष मा. डॉ. तिरुमल जे. कर्नाटक रेफ्री चेअरमन (क्युरेगी/फुमसे) मा. श्री. प्रविण बोरसे, ताम संघटनेचे टेक्रिकल डायरेक्टर, पुणे मा. सुभाष पाटील, रायगड मास्टर विनोद कुमार, इंडिया तायक्वांदो मा. श्री. अमित अग्रवाल, औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी आयोजन मुख्य सहकारी श्री नीरज बोरसे, श्री प्रसाद कुलकर्णी
सहसचिव श्री गफार पठाण मुंबईचे श्री राहुल वाघमारे व विजय कांबळे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...