नवतरुण विकास मंडळ, दोडवली ( मुंबई ) तर्फे क्रिकेटचे सामने उत्साहात संपन्न !
मुंबई - ( दिपक कारकर ) :
उपरोक्त मंडळातर्फे रविवार दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी नवतरुण विकास मंडळ, दोडवली आणि नागेश्वर क्रिकेट संघ दोडवली यांच्या माध्यमातून गुहागर तालुका मर्यादित क्रिकेट स्पर्धेचं मीरा रोड येथे आयोजन केले होते. मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शंकरराव कांबळे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण तालुक्यातील १६ संघानी सहभाग घेतला होता. निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ अणि शिर क्रिकेट यांच्यात चुरशीच्या अंतिम सामन्यात निर्मला इलेव्हन क्रिकेट संघाने विजेता तर शिर संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला ₹ ११००० /- रोख आणि चषक आणि उपविजेत्या संघास ₹ ७०००/- रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेला मंडळाचे अध्यक्ष शंकर कांबळे, कुणबी युवक मंडळ मुंबई युवाअध्यक्ष - माधव कांबळे, मंडळाचे कार्याध्यक्ष बबन कांबळे,मनोजी डाफळे, नितीन कांबळे, प्रकाश रामगडे, गणपत दिपक मोरे, सचिन मोरे, मोडेकर, संतोष हुमणे, शिवशक्ती महिला मंडळ अध्यक्षा-रुपाली कांबळे, नारायण मोरे, सुलोचना मोरे, विवेकजी कातकर, संदिप पाष्टे, संदेश मते, विजय मते, संजय राजाने, सुनील ठोंबरे, विजय मोरे नितीन करंबळे, आदींची उपस्थिती होती. अशोकराव कांबळे, भरतजी हुमणे, संदिप निकम, रविंद्र मुरमुरे, रमेश हुमणे दिनेश कांबळे आणि नागेश्वर क्रिकेट संघातील सर्व खेळाडुंनी विशेष परिश्रम घेत ही स्पर्धा पार पाडली.या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment