Monday, 24 October 2022

"शिंदे सरकारला घरचा आहेर" आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि कष्टकरी जनतेसोबत खाल्ली दिवाळीच्या दिवशी ठेचा आणि भाकर !

"शिंदे सरकारला घरचा आहेर" आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि कष्टकरी जनतेसोबत खाल्ली दिवाळीच्या दिवशी ठेचा आणि भाकर !


बुलढाणा, अखलाख देशमुख, दि २४ : दिवाळी म्हणजे लाडू -चकल्या, फराळ आणि पुरणाच्या पोळयाची मेजवाणी, पण परतीच्या पावसाने यावर्षी शेतकऱ्यांवर ओढावलेल्या स्थितीमुळे व बळीराजाची दिवाळी अंधारात जाणार असल्याने, ही दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय आज दिवाळीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कुटुंबीयांसह ठेचा -भाकर खात त्यांनी संवेदनशीलता व्यक्त केली आहे....!

परतीच्या पावसाने जिल्हाभरात शेतकऱ्यांसमोर संकटाचा डोंगर उभा राहिला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हरवल्याने शेतकरी त्रस्त आहे.

सगळ्यांची दिवाळी उत्साहाने साजरी होत असताना शेतकऱ्यांची दिवाळी मात्र संकटाने साजरी होत आहे. मागील २ वर्षात कोरोना संक्रमणामुळे दिवाळीवर संकट होते. यंदा वातावरण निवळल्याने दिवाळी उत्साहात साजरी होईल असे वाटत होते. मात्र परतीच्या पावसाने हे स्वप्र देखील धुळीस मिळाले. सातत्याने तिसऱ्या वर्षी शेतकऱ्याची दिवाळी साजरी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या
दुःखाची जाणीव ठेवून या पोशिंदाच्या पाठीमागे आपण आहोत ही भूमिका घेत संवेदना व्यक्त करण्याच्या उद्देशाने आ. संजय गायकवाड यांनी दीपावलीच्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचा दिवा लावणार नाही, अंगणात रांगोळी काढणार नाही, दिवाळीचे गोडधोड न खाता चटणी भाकर खाऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू तसेच शासनाकडे शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करू,अशी भूमिका घेतली. त्या अनुषंगाने २४ ऑक्टोबर रोजी आ. धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्यासह त्यांचा संपूर्ण परिवार तसेच शेतकरी, कष्टकरी जनतेसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर चटणी भाकर खाऊन संवेदना व्यक्त केल्या.

आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजय गायकवाड यांच्यासह माजी नगराध्यक्षा सौं. पुजाताई संजय गायकवाड, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना नेते संदीप गायकवाड,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील,युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण निमकर्डे, शिवसेना तालुका प्रमुख धनंजय बारोटे, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, मोताळा शहर प्रमुख सुरेश खर्चे, शिवसेना महिला आघाडी वैशालीताई ठाकरे यांच्यासह बुलढाणा तसेच मोताळा येथील सर्व सन्मानीय नगरसेवक, शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते...!

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...