Monday, 24 October 2022

कल्याणकरांनी अनुभवली अविस्मरणीय अशी सुरेल दिवाळी पहाट !

कल्याणकरांनी अनुभवली अविस्मरणीय अशी सुरेल दिवाळी पहाट !


कल्याण, बातमीदार : मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात दिवाळी पहाट कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात सादर होताना दिसतात. दिवाळी पहाट ही संकल्पना रसिक प्रेक्षकांत बऱ्यापैकी रुजली आहे. यंदा एकूण साडेचार हजार दिवाळी पहाट कार्यक्रम सादर होताहेत.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर झालेल्या दिवाळी पहाटमध्ये नागरिकांचा सर्वत्र अपूर्व उत्साह व जोश पाहावयास मिळाला. 

अशीच एक दिवाळी पहाट भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे कल्याण साई चौक, कल्याण येथे आयोजित केली होती. दीपावली निमित्ताने हजारो कल्याणकरांनी सूर व संगीताने मंतरलेली दिवाळी पहाट अनुभवली. साई चौकात आयोजित केलेल्या पाच तासांच्या रंगतदार कार्यक्रमात अविस्मरणीय गीते गुणगुणत तरुणाईबरोबरच ज्येष्ठांनीही लावणीवर ठेका धरला.

दीपावली निमित्ताने हजारो कल्याणकरांनी सूर व संगीताने मंतरलेली दिवाळी पहाट अनुभवली. साई चौकात आयोजित केलेल्या पाच तासांच्या रंगतदार कार्यक्रमात अविस्मरणीय गीते गुणगुणत तरुणाईबरोबरच ज्येष्ठांनीही लावणीवर ठेका धरला.

चित्रपटसृष्टीतील १३ कलाकारांचा अविष्कार व गायकांचा सूर ऐकून हजारो कल्याणकरांची यंदाची दिवाळी स्मरणीय ठरली.

आघाडीचा गायक-गायिका अवधुत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, सावनी रविंद्र यांनी सादर केलेली गीते, अभिनेत्री अमृता खानविलकर व नृत्यांगना नेहा पेंडसे यांचे लावणीनृत्य, हास्य जत्रेतील कलाकार गौरव मोरे, नम्रता संभेराव, वनिता खरात, श्याम राजपूत, चेतना भट यांचे विनोदी सादरीकरण आणि डान्स महाराष्ट्राची कलाकार तश्वी भोईर हिचे नृत्य रसिकांच्या पसंतीला उतरले. अव्वल कलाकारांच्या उपस्थितीत सकाळी साडेपाच वाजता सुरू झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत केला. त्यानंतर सकाळी १० वाजता राज्यगीत जय जय महाराष्ट्र व राष्ट्रगीताने समारोप झाला.

या कार्यक्रमाला आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे, भाजपाचे शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन भोईर, वरुण पाटील आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...