Monday, 24 October 2022

" ग्रामीण महाराष्ट्र " दिवाळी विशेषांकाचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रकाशन !

" ग्रामीण महाराष्ट्र " दिवाळी विशेषांकाचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रकाशन !


वाडा / प्रतिनिधी :
वृत्तपत्र व वेब न्युज पोर्टल स्वरूपात प्रकाशित होणाऱ्या व अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या जयेश शेलार पाटील संपादीत " ग्रामीण महाराष्ट्र " या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि. २४ ऑक्टोबर) करण्यात आले. यावेळी कोकण कृषी महोत्सवाचे प्रणेते व पालघर जिल्हा काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील, वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती वैभव ठाकरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल पष्टे व मनसेचे कुडूस विभाग अध्यक्ष केशव शेलार उपस्थित होते.


जेष्ठ पत्रकार जयेश शेलार पाटील यांनी " ग्रामीण महाराष्ट्र " दिवाळी विशेषांकाचे संपादन केले असून या अंकात ठाणे - पालघर जिल्ह्यातील सांस्कृतिक, सामाजिक व पर्यटन विषयाची परिपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर ग्रामीण साहित्यिकांच्या साहित्याने हा दिवाळी अंक सजला आहे. यावेळी उपस्थितांनी गेली २० वर्षे पत्रकारिता व साहित्य चळवळीत विशेष कार्य करणाऱ्या जयेश शेलार पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...