नँशनल हायवे विभागाचे'जुगाड, तोडलेली झाडे न लावताच पुन्हा कल्याण नगर मार्गावरील शेकडो झाडे तोडण्यासाठी परवानगी?
कल्याण, (संजय कांबळे) : राष्ट्रीय महामार्ग, ६१ अर्थात कल्याण नगर मार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल या २/३ किलोमीटर अंतरावरिल रस्ता सिंमेट काँक्रीटीकरण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली सुमारे २४०च्या आसपास झाडे तोडण्यात आली, ती या रस्त्यावर न लावता दुसरीकडे लावल्याचे'जुगाड, नँशनल हायवे विभागाने केले आहे, अशातच आता पुन्हा कल्याण नगर निर्मल महामार्ग हा माळशेज घाट पर्यंत करण्यासाठी या महामार्गाच्या दुतर्फा असलेली हजारो उपयोगी व जुनी झाडे तोडण्याची परवानगी या विभागाने वनविभागाकडे मागितली आहे. आणि दुर्दैवाने यावर सगळेच मुग गिळून गप्प बसले आहेत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे, यामुळे आता हिरवागार दिसणारा कल्याण माळशेज घाट हा रस्ता भविष्यात ओसाड व वनवन करायला लावणारा असणार आहे.
दोन अडीच वर्षांपूर्वी कल्याण नगर मार्गावरील प्रथम शहाड उड्डाणपूल ते म्हारळपाडा या दरम्यान रस्ता सिंमेट काँक्रीट करण्यात आला, यावेळी रुंदीकरणात बिर्ला गेट, धोबीघाट, म्हारळ येथील आंबा, व इतर झाडे तोडण्यात आली, यानंतर म्हारळपाडा ते पाचवामैल या २/३ किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले, यावेळी, म्हारळपाडा, वरप, कांबा, पाचवामैल या भागातील वड, निंब, पिंपळ, करंज, जांभूळ, आदी सुमारे २४० च्या आसपास झाडे तोडण्यात आलीत.
वास्तविक पाहता, अशी झाडे तोडण्यासाठी वनविभागाची परवानगी मागितली जाते, त्यानंतर वनविभाग अनेक अटीशर्तीवर झाडे तोडण्याची परवानगी देतात, यामध्ये जेवढी झाडे तोडली जातील, तितकीच झाडे लावण्याची व ती काही वर्षे सांभाळण्याची जबाबदारी ही तोडणा-या विभागाची असते तसे बाँडपेपर घेतले जातात. असेच बाँडपेपर नँशनल हायवे विभागाने म्हारळपाडा ते पाचवामैल या कामासाठी घेतले होते, अनेक अडचणी, अडथळे, पार केल्यानंतर अखेरीस हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र नँशनल हायवे विभागाने येथे बरोबर 'जुगाड, केला, या रस्त्यावर झाडे लावण्यासाठी जागाच नाही असे कारण पुढे करून ही झाडे आणे भिसोळ, नालिंबी या परिसरात लावल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थ व वनविभागाला विश्वासात घेऊन योग्य नियोजन केले असते तर म्हारळपाडा ते पाचवामैल या दरम्यान किमान १००/२०० झाडे तरी लावता आली असती. पण तेवढे सौजन्य या विभागाने दाखवली नाही, त्यामुळे आता या दरम्यान रस्त्यावर काही सेंकद उभे राह्याला झाडं शिल्लक राहिले नाही.
असे असताना पुन्हा आता कल्याण नगर निर्मळ या महामार्गावर माळशेज घाट पर्यंत २२किंवा२४ मी रुंद इतके रस्त्याचे काम सुरू होणार आहे. यासाठी या मार्गावरील वड, पिंपळ, मोह, करंज, जांभूळ, चिंच, आंबा, ऐन, आदी हजोरो झाडे तोडण्यासाठी हायवेने वन विभागाकडे परवानगी मागितली आहे,
कल्याण तालुक्यातील एकट्या मामणोली पर्यंत सुमारे २८० च्या आसपास झाडे तुटणार आहेत, कांबा, पांजरापोळ, रायते, गोवेली, रेवती, बापसई, कोलम, मामणोली, या ठिकाणी ही झाडे आहेत, यापुढे मुरबाड, टोकावडे व माळशेज घाट असा हा तोडातोडीचा कार्यक्रम असणार आहे. यामुळे आता हिरवागार दिसणारा कल्याण नगर महामार्ग भविष्यात ओसाड माळरन दिसणार आहे. विकास व्हायला हवा. परंतु तो मनुष्य व पशुपक्षी, प्राणी यांचे जीवन उध्वस्त करणारा नसावा. त्यामुळे नँशनल हायवे विभागाचा मागील अनुभव पाहता व त्यांनी केलेले झाडे लावण्याचे 'जुगाड, लक्षात घेता पर्यावरण प्रेंमी व इतरांनी आताच कल्याण माळशेज घाट या रस्त्याचे हिरवेगार फोटो काढून ठेवावेत, कारण भविष्यात ते केवळ फोटोतच बघण्याची वेळ सर्वावर येणार आहे. दुर्दैवाने या भागातील लोकप्रतिनिधी, पुढारी, त्यांचे कार्यकर्ते, विविध संघटना, स्वयंभू समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, मुग गिळून गप्प आहेत. याचे आश्चर्य वाटते. तरीही काळजी करण्याचे कारण नाही, २०२४ मध्ये राज्यकर्ते घरोघरी व गल्लीबोळात येणार आहेतच ?
No comments:
Post a Comment