Thursday, 7 December 2023

शिवसेना विभाग क्रमांक -१ बोरिवली विधानसभा आणि शिवसेना सहकार सेना, शिवबा मित्र मंडळ तर्फे आयुष्यमान भारत’ ही योजना नोंदणी शिबीरचे आयोजन !!

शिवसेना विभाग क्रमांक -१ बोरिवली विधानसभा आणि शिवसेना सहकार सेना, शिवबा मित्र मंडळ तर्फे आयुष्यमान भारत’ ही योजना नोंदणी शिबीरचे आयोजन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             देशात उपचार सुविधांपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी केंद्र सरकारने ‘आयुष्यमान भारत’ ही योजना सुरू केली. वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून कुणाचा मृत्यू होऊ नये, हा या योजनेचा उद्देश आहे. आयुष्यमान कार्डाच्या आधारे एका कुटुंबाला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहेत. अनेक पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी केली नसल्याची खंत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी व्यक्त केली. आरोग्य अधिकाऱ्यांशिवाय हे काम होणार नाही, यासाठी ही नोंदणी वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शिवसेना विभाग क्रमांक -१ बोरिवली विधानसभा आणि शिवसेना सहकार सेना, शिवबा मित्र मंडळ तर्फे आयुष्यमान भारत’ ही योजना नोंदणी शिबीर शनिवार दि.९/१२/२०२३ आणि रविवार दि.१०/१२/२०२३ रोजी सुनील पाटील (उपविभाग प्रमुख /विभाग प्रमुख - वाहतूक सहकार सेना ), समाजसेवक समीर खाडिलकर, राजूभाई मेहता आणि शिवसेना विभाग क्र.१ चे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिवसेना विभाग क्रमांक -१ बोरिवली विधानसभा आणि शिवसेना सहकार सेना, शिवबा मित्र मंडळ पदाधिकारी, सदस्य, जनसेवा संघ, चिकुवाडी आणि जनहित प्रतिष्ठान चिकुवाडी पदाधिकारी, सदस्य यांच्यातर्फे शिवसेना शाखा - १७, एस.बी.आय बँक समोर, चिकुवाडी, शिंपोली गाव, बोरिवली (प.) येथे आयोजित केले आहे.

           अनेक नागरिकांच्या खिशात डॉक्टरांनी लिहून दिलेले औषधे खरेदीसाठी पैसे नसतात. त्यामुळेच केंद्र सरकारने ‘आयुष्यमान भारत’ ही योजना सुरू केली. उपचाराशिवाय कुणाचा मृत्यू होऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे. आयुष्यमान कार्डाच्या आधारे एका कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी हे कार्ड मिळवून योजनेचा लाभ घेता यावा यासाठी हे शिबीर घेण्यात येत आहे. स्थानिक रहिवाशी यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहनही आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...