Saturday, 9 December 2023

केडिएमटी कार्यशाळेत लागलेल्या आगीत दोन बसेस जळून खाक !!

केडिएमटी कार्यशाळेत लागलेल्या आगीत दोन बसेस जळून खाक !!

कल्याण , प्रतिनिधी‌ : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन कार्यशाळेला शनिवारी पहाटे अचानक आग लागली, या आगीत दुरुस्ती साठी उभ्या असलेल्या दोन बसेस जळून खाक झाल्या तसेच इमारतीचे नुकसान झाले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परिवहन सेवेतील बसेस दुरुस्ती व देखभाल करणारी कार्यशाळा कल्याण- मुरबाड रोड असून येथे दुरुस्तीच्या कामासाठी इंधनाचा वापर केला जातो, शनिवारी पहाटे अचानक इंधननाने पेट घेतला, व बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. या कार्यशाळेच्या बाजूला डिझेलचे भूमिगत टॅंक आहेत, या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या वतीने चारही बाजूंनी पाण्याचा मारा चालू ठेवून आग कुठे पसरणार यांची काळजी घेतली.

आग शॉक सर्किट मुळे लागली असण्याची शक्यता असल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले, तसेच याची सखोल चौकशी केली जाईल असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...