Monday, 27 January 2025

193 देशांच्या ग्लोबल करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन तसेच आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर् स्पर्धा 2025 !

193 देशांच्या ग्लोबल करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन तसेच आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर् स्पर्धा 2025 !

डोंबिवली, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी 2014 पासून डावखर फाउंडेशन, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म्स विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करत आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन येत्या 29 व 30 जानेवारी 2025 रोजी रिजन्सी अनंतम, विको नाका, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत आयोजित केले आहे. 

आयोजक संतोष डावखर यांच्या म्हणण्यानुसार दर वर्षी अंदाजे 30000 हुन अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात. या वर्षी 45 शाळा सहभागी झाल्या असून विद्यार्थ्यां मधील कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन पोस्टर् स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच जागतिक पातळीवरील विविध देशांच्या ग्लोबल करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन सुध्दा असणार आहे. सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य आहे. तेंव्हा जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांसह या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजक श्री संतोष सोपान डावखर आणि टीम यांनी केले आहे.

शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल आणि पोस्टल स्टॅम्प बद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 193 देशांच्या नोट्स आणि पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन तसेच विज्ञान या विषयांमध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


सौजन्य __
श्री संतोष सोपान डावखर आणि टीम.

No comments:

Post a Comment

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...