Wednesday, 29 January 2025

कातळवाडी येथे माघी गणेशोत्सव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन !

कातळवाडी येथे माघी गणेशोत्सव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन !

चिपळूण - ( दिपक कारकर  )

तालुक्यातील अंतिम टोकाच्या मुर्तवडे कातळवाडी येथील श्री गणेश मंदिर देवस्थान असणाऱ्या वाडीतील श्री गणेश नवतरुण मित्र मंडळ व महिला मंडळ ( गणेश गल्ली ), ( रजि. ) उपरोक्त मंडळातर्फे सालाबादप्रमाणे माघी गणेशशोत्सव साजरा होणार आहे. कातळवाडीतील भक्तीस्थान असलेलं ग्रामदैवत श्री वाघाजाई देवी मंदिर, श्री हनुमान मंदिर त्यातीलच वाडीत प्रवेश केल्यावर गणपती बाप्पाचे मुखदर्शन घडविणारे हे एक मंदिर आहे. सदर मंडळाची सन - १९९१ साली स्थापना होऊन मंडळाचे यंदाचे ३४ वे वर्षे असून, सुवर्णमहोत्सवाकडे मंडळाची वाटचाल सुरु आहे.

प्रतिवर्षे भक्तिमय वातावरण व विविध कार्यक्रमांचे भरगच्च संयोजनात मंडळातील जेष्ठ - तरुण कार्यकर्ते व महिला मंडळ हा उत्सव साजरा करत असते.ह्यावर्षी दि.३१ जानेवारी २०२५ पासून उत्सवाला प्रारंभ होत असून,दि.२ फेब्रुवारी रोजी उत्सवाची सांगता होणार आहे. ३१ जानेवारी रोजी महिलांकरिता हळदी कुंकू, विनोदी खेळ, दांडिया नृत्य,संगीत भजन, १ फेब्रुवारी रोजी श्री गणेश जन्म, भव्य पालखी मिरवणूक, भजन व दि.२ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान रात्रौ १० वा. चिपळूण तालुक्यातील नावाजलेलं "जय हनुमान भजनी भारुड मंडळ, मांडकी ( खुर्द )" निर्मित भारूड कलेचा मनोरंजनपर कार्यक्रम सादर होणार आहे. सदर मंडळाच्या तरुण कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत मंडळाची नुकतीच महाराष्ट्र शासन मान्य मंडळाची नोंदणी केली आहे. आगामी काळात कला/क्रिडा/सामाजिक/शैक्षणिक/सांस्कृतिक क्षेत्रात उपक्रम राबवत, मंडळाचे नाव रोशन करण्याची उमीद तरुणांनी निर्माण केली आहे.

पंचक्रोशीसह सर्व गणेश भक्तांनी सहकुटूंब, मित्रमंडळींसह उपस्थित राहून कार्यक्रमाची भव्यता वाढविण्याचे आवाहन श्री गणेश नवतरुण मित्र मंडळ, ( गणेश गल्ली ) तसेच मंडळाच्या महिला मंडळ व कार्यकारिणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...