प्रचंड इच्छाशक्ती आणि योग्य उपचारांमुळे रायगड जिल्ह्यात ५ हजार २०६ रुग्णांनी केली करोनावर मात !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) स्वत:च्या प्रचंड इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या आणि औषधोपचाराच्या जोरावर आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील ०५ हजार २०६ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज ४६३ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-१४८४, ग्रामीण-४६१, उरण-१६१, खालापूर-२७०, कर्जत-१२१, पेण-३६५, अलिबाग-२२१, मुरुड-४६, माणगाव-६९, तळा-०५, रोहा-८२, श्रीवर्धन-२८, म्हसळा-४९, महाड-४३, पोलादपूर-१७ अशी एकूण ०३ हजार ४२२ झाली आहे.
कोविड-१९ ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-०२ हजार ७५१, पनवेल ग्रामीण-८७३, उरण-३५८, खालापूर-१०३, कर्जत-१५२, पेण-१८०, अलिबाग-२००, मुरुड-२६, माणगाव-१३२, तळा-१५, रोहा-२०५, सुधागड-०७, श्रीवर्धन-५१, म्हसळा-४८, महाड-७३, पोलादपूर-३२ अशी एकूण ०५ हजार २०६ आहे.
१५ जुलै रोजी दिवसभरात पनवेल मनपा-१२१, पनवेल ग्रामीण-३५, उरण-३०, पेण-१३, अलिबाग-०१, मुरुड-०२, माणगाव-०७, रोहा-१९, श्रीवर्धन-१६, महाड-०६ असे एकूण २५० नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-१००, पनवेल ग्रामीण-३०, उरण-१३, खालापूर-१२, कर्जत-१२, पेण-१२, अलिबाग-१०, मुरुड-०६, माणगाव-०२, तळा-०२, रोहा-०५, सुधागाड-०१, श्रीवर्धन-०४, म्हसळा-०६, महाड-१३, पोलादपूर-०२ असे एकूण २३० नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-१८०, पनवेल (ग्रामीण)-७१, उरण-१०, खालापूर-४७, कर्जत-१८, पेण-८६, अलिबाग-१३, माणगाव-१९, रोहा-०१, म्हसळा-०२, महाड-१२, पोलादपूर-०४ अशा प्रकारे एकूण ४६३ ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात ०८ व्यक्तींची ( पनवेल मनपा)-०४, श्रीवर्धन-०१, महाड०३ मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून ३० हजार ४०३ नागरिकांचे स्वॅब कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या २९६ एवढी आहे.

No comments:
Post a Comment