Thursday 29 November 2018

कुळगाव-बदलापूर पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम

कुळगाव-बदलापूर पोलीस स्टेशन तर्फे पोलीस काका व पोलीस दिदी उपक्रम

काराव येथील आश्रम शाळांना मदत

बदलापूर - (जैनेंन्द्र सैतवाल)
            कुळगाव-बदलापूर (ग्रा) पोलीस स्टेशन तर्फे पोलीस काका व पोलीस दीदी या उपक्रमाअंतर्गत परिसरातील आश्रम शाळेतील मुला-मुलींना मदत करण्यात आली.
          या पोलीस स्टेशन चे एपीआय अविनाश पाटील यांच्या पुढाकाराने व आयोजनाने नकुल पाटील आश्रमशाळा काराव, डॉ. तोरसकर ज्युनियर कॉलेज काराव, आदिवासी आश्रम शाळा लावाहली येथील ५० मुला-मुलींना ब्लॅंकेट्स वाटप करण्यात आले.
       थंडीचे महिने म्हणजे हिवाळा सुरू झाल्याने येथील आश्रम शाळेतील मुलांना ब्लॅंकेट वाटप करून पोलीस काका व पोलीस दीदी हा उपक्रम आम्ही आयोजित करून या मुलांना पोलीस हे आपलेच वाटले पाहिजे व भीती न बाळगता मनसोक्त पोलीस काका व पोलीस दिदींशी बोलता यावे व संवाद साधता यावा या करिता असे उपक्रम आम्ही आयोजित करतो असे या वेळी एपीआय अविनाश पाटील म्हणाले.

राजाभाऊ पातकर यांचे कल्याण येथे न्यूटेक डायगनोस्टिक सेंटर सुरू होणार

कल्याण येथे अत्याधुनिक न्यूटेक डायगनोस्टिक सेंटर सुरू होणार

२ डिसेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री करणार उद्घाटन

कल्याण - (जैनेंन्द्र सैतवाल)
              येथील सुप्रसिद्ध असे उद्योगपती राजाभाऊ पातकर यांनी आरोग्य क्षेत्रात एक नवीन मुहूर्त मेढ रोवली आहे. फिलिप्स कंपनी ने जगात प्रथमच लॉंच केलेली अत्याधुनिक अशी ३ टेलसा अल्ट्राफास्ट डिजिटल एम आर आय व १२८ स्लाईस अल्ट्राफास्ट सी टी स्कॅन मशीन भारतात प्रथमच कल्याण शहरात, शेलार पार्क, खडकपाडा सर्कल जवळ कल्याण येथील  न्यूटेक डायगोनिस्टिक सेंटर च्या माध्यमातून दि. २ डिसेंबर २०१८ पासून सुरू होत आहे.
         दि.२ डिसेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या न्यूटेक सेंटर चे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्र्या सोबत जवळपास ५ ते ६ कॅबिनेट मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, मुंबई येथील नामांकित हॉस्पिटल चे डीन, डॉक्टर, उपस्थित राहणार असल्याचे राजाभाऊ पातकर यांनी सांगितले.

कल्याण येथे राजाभाऊ पातकर यांचे न्यूटेक डायगनोस्टिक सेंटर सुरू होणार

Sunday 25 November 2018

स्तुत्य उपक्रम, वापरा व परत करा

रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ!

विनामूल्य वैद्यकीय साहित्य लायब्ररी सुरू : गरजूंनी लाभ घेण्याचे नगरसेवक कैलास सोनवणे यांचे आवाहन

जळगाव, दि.२४ - (प्रतिनिधी)
              शहरासह जिल्ह्यात नेहमी नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे रुग्णांसाठी विनामूल्य वैद्यकीय साहित्य लायब्ररीची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांच्या नातेवाईकांनी लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक, संस्था अध्यक्ष कैलासआप्पा सोनवणे यांनी केले आहे.
           स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय साहित्य लायब्ररी सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले.
           अत्याधुनिक साहित्य उपलब्ध
         वैद्यकीय साहित्य लायब्ररीमध्ये रुग्णांचा पलंग, व्हील चेअर, सलाईन स्टँड, वॉकर, स्ट्रेचर, वॉटर-एअर बेड, शवपेटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या या वस्तू वापरा व परत करा या तत्वावर जिल्हावासियांसाठी उपलब्ध आहेत.
            विनामूल्य लायब्ररीचा लाभ घ्यावा
स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेने सर्व साहित्य वापर व परत करा या तत्वानुसार विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातील गरजू नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केले आहे.
कुठं साधणार संपर्क?
         सर्व वैद्यकीय साहित्य स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था, नगरसेवक कैलास सोनवणे यांचे कार्यालय, बालाजी प्लाझा, बालाजी पेठ, जळगाव फोन 0257 - 2234455 तसेच संजय शर्मा, कमलेश सोनवणे, किरण भालोदकर, संदीप पाटील, मधुकर कोळी यांच्याशी संपर्क साधावा, असे कैलास सोनवणे यांनी कळविले आहे.

Saturday 24 November 2018

टिटवाळयात शिवसेनेतर्फे महागणपती मंदिरात श्रीराम महाआरतीचे आयोजन

टिटवाळा येथे महागणपती मंदिरात, श्रीराम यांच्या आरतीचे शिवसेनेने केले आयोजन

टिटवाळा - प्रतिनिधी
           तमाम हिंदूंचे आराध्य दैवत " प्रभू श्रीराम" यांच्या पवित्र जन्मभूमी अयोध्या येथे त्यांचे भव्य मंदिर उभारण्यात यावे यासाठी  राम जन्म भूमीचे दर्शन घेऊन उध्दव ठाकरे महाआरती करणार  आहेत.
              उद्धव ठाकरे यांनी  दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात महाआरतीचे ठीक-ठिकाणी श्रीराम आरतींचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार, भारतातील प्रसिद्ध असे श्री क्षेत्र टिटवाळा येथील सिद्धिविनायक महागणपती मंदिरात, कल्याण उपशहर प्रमुख किशोर शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
            या प्रसंगी युवासेना सह-सचिव अॅड. जयेश वाणी, उपशहर प्रमुख किशोर शुक्ला, युवासेना शहर उपाधिकारी प्रविण भोईर, शिवसेना रिक्षा युनियन अध्यक्ष बाळा भोईर, महिला आघाडी राजेश्वरी गुप्ता, अक्षय स्वामी, संतोष पवार, अनिल राठोड, दिलीप राव, निमीष जाधव, सचिन भोईर, प्रविण काकडे व शेकडो शिवसैनिक, युवासैनिक व पहिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

Friday 23 November 2018

कल्याण येथे लवकरच सुरू होणार न्यूटेक डायगणोस्टिक सेंटर

अत्याधुनिक न्यूटेक डायगणोस्टिक सेंटर लवकरच कल्याण मध्ये

२ डिसेंबर ला मुख्यमंत्री करणार उद्घाटन

कल्याण - ( जैनेंन्द्र सैतवाल)
             येथील प्रसिद्ध उद्योगपती व भाजप नेते राजाभाऊ पातकर यांनी आरोग्य क्षेत्रात एक नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आहे. अत्याधुनिक असे 3 telsa Ultrafast digital MRI मशीन व 128 Slice Ultrafast CT स्कॅन मशीन व जगातील प्रथमंच असे हे मशीन भारतात प्रथमच कल्याण शहरात न्यूटेक डायगणोस्टिक सेंटर च्या माध्यमातून येत आहे.
          दि.२ डिसेंम्बर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या न्यूटेक सेंटर चे उद्घाटन होणार आहे. हे सेंटर शेलारपार्क खडकपाडा सर्कल जवळ, कल्याण येथे आहे, मुख्यमंत्र्या सोबत जवळपास पाच ते सहा केबिनेट मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व सर्व पक्षांचे पदाधिकारी, मुंबई येथील नामांकित हॉस्पिटल साज डीन, डॉक्टर उपस्थित राहणार असल्याचे राजाभाऊ पातकर यांनी सांगितले.
          त्यानिमित्त नवीन वास्तूमध्ये सलग तीन दिवस पूजा, होम, शांती कार्यक्रम आयोजित केला आहे. गणेश याग, वास्तूशांती पूजा, नवचंडी होम अशा विविध पूजा राजाभाऊ सपत्नीक व संपूर्ण पातकर परिवारासह पूजेमध्ये सहभागी आहेत.

Sunday 18 November 2018

कल्याण येथे महावोकेथॉन ने रस्ते सुरक्षेची जनजागृती

कल्याण येथे रस्ता सुरक्षा महावोकेथॉन चे आयोजन

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण चा उपक्रम

कल्याण - (जैनेंन्द्र सैतवाल )
             संपूर्ण जगभरात प्रत्येक वर्षातील नोव्हेंम्ब महिन्याचा तिसरा रविवार हा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहून त्यांची आठवण काढण्याचा दिवस. म्हणजे world day remembrance for road sefty victim म्हणून मानला जातो. १९९३ पासून ही प्रथा सुरू झाली. यास संयुक्त महासंघानेही मान्यता दिली आहे. अपघातात मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जनजागृती म्हणून या दिवसाचे आयोजन केले आहे.
           अतिवेगाने वाहन चालविणे, मद्यपान व अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालविणे, चार चाकी वाहन चालक हे सीट बेल्ट चा वापर न करता वाहन चालविणे, हेल्मेट शिवाय दुचाकी वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाइल वर बोलणे, एस एम एस व w up चा वापर करणे. या विषयांची जनजागृती
करण्यासाठी कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विविध ठिकाणी त्यांच्या अखत्यारीत सहा ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
            उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण  तर्फे " सुरक्षा महावोकेथॉन" चे आयोजन करण्यात आले होते. उपप्रादेशिक कार्यालय ते प्रेम ऑटो व परत वरील मार्गा वरून ही वोकेथॉन आयोजित केली होती. सदर रॅली मध्ये उपप्रादेशिक कार्यलयातील अधिकारी, कर्मचारी, मोटर वाहन वितरकांचे प्रतिनिधी, मोटर प्रशिक्षण संस्थानचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, कर्मचारी, रिक्षा चालक-मालक संघटनेचे प्रतिनिधी, गुरुकृपा विद्यालयाच्या प्रचार्या व विद्यार्थी व १५५ नागरिक सहभागी झाले होते. यावेळी हेल्मेट वापरणे व हॉर्न न वाजविणे या विषयी जनजागृती करण्यात आली.
           उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण येथील विविध महाविद्यालयांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या सर्व विद्यार्थ्यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी उपस्थित राहून सहभागाबद्दल कौतुक केले

कल्याणमध्ये सुरक्षा महावोकेथॉन ने जनजागृती

Saturday 17 November 2018

रविवारी मांडा-टिटवाळा येथे महा आरोग्य शिबिराचे आयोजन

टिटवाळयात रविवारी महाआरोग्य शिबीर

सर्व आरोग्य मोफत तपासणी"

टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल )
         टिटवाळा- मांडा येथे रविवार दि.१८/११/२०१८ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत विद्यामंदिर शाळा येथे संभाजी ब्रिगेड व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे.
         या शिबिरात हृदय रोग, ईसीजी, रक्तदान, रिप्लेसमेंट, एन्जोप्लास्टी, बायपास सर्जरी, मूत्रपिंड, मुतखडा, मूत्रमार्ग विकार, हाडांचे विकार, कॅन्सर, सांधे व फुफुसांचे आजार, अस्थमा, नेत्र तपासणी, मान,पाठ, कंबर दुखणे, पेरालिसिस, चक्कर येणे, जीर्ण व्याधी उपचार, दंत तपासणी, स्त्री रोग, लहान मुलांची तपासणी, गरोदर स्त्रियांची तपासणी इत्यादींची तपासणी करण्यात येणार आहे.
           तरी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन, संभाजी ब्रिगेड चे कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष प्रभाकर भोईर, कार्याध्यक्ष रमेश फुंदे, रेड स्वस्तिक चे प्रमोद नांदगावकर यांनी केले आहे.
             
Wednesday 14 November 2018

"सरकार विरुद्ध सर्व समाज" परिषद होणार

लोकांचे दोस्त तर्फे," सरकार विरुद्ध सर्व समाज "परिषदेचे आयोजन
--------------------------------
मुंबई,दिनांक ११(प्रतिनिधी):
          लोकांचे दोस्त संघटनेतर्फे विविध भारतीय जाती,जमाती,समाज संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची,"सरकार विरुद्ध सर्व समाज परिषद"आयोजित करण्यात आली आहे.या परिषदेला मुंबई,ठाणे,पालघरसह राज्याच्या अनेक भागातून विविध समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
        रविवार १८ नोव्हेम्बर रोजी गोरेगाव,आरे कॉलनी येथील न्यूझीलंड होस्टेलमध्ये दुपारी २ ते संध्याकाळी ७ या वेळेत ही परिषद होत आहे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकरने सर्वच जाती,जमाती आणि समाज समूहांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे.या पार्श्वभूमीवर सर्वच समाजांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या परिषदेला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन लोकांचे दोस्तचे अध्यक्ष रवि भिलाणे,प्रमुख आयोजक संजय शिंदे,बाळासाहेब उमप,भानुदास धुरी,काशिनाथ निकाळजे,ममता अडांगळे  ,संजीवनी नांगरे,नसीम शेख,ज्ञानेश पाटील,राजा आदाटे,विनायक साळुंखे,शशी सोनावणे, फिरोज मिठीबोरवाला आदींनी केले आहे.
      
मांडा-टिटवाळा येथे जनसुनावणीचा उडाला फज्जा

टिटवाळा येथे पर्यावरण विभागाच्या जनसुनावणीचा झाला फज्जा

टिटवाळा येथील होणाऱ्या डंपिंग ग्राऊंडला सर्व स्तरातून विरोध

सर्व पक्षीयांचा सुद्धा डंपिंग ला विरोध

टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल)
             टिटवाळा हे श्री क्षेत्र व पर्यटन स्थळ असून देखील महाराष्ट्र प्रदूषण विभागाने येथे बुधवारी जनसुनावणी डंपिंग ग्राउंड बाबतीत ठेवली होती. या डंपिंग ग्राऊंडला सर्व टिटवाळा-मांडा परिसरातील नागरिक विविध संघटना , पक्ष यांनी  विरोध करीत या पर्यावरण विभागाच्या पदाधिकाऱ्यांची जन सुनावणी उधळून लावून त्यांचे म्हणणे ऐकूनच न घेता फक्त नागरिकांचे म्हणणे ऐका असे उपमहापौर व येथील नागरिक सौ. उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी ठणकावून सांगत यावर अधिकाऱ्याना जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यास भाग पाडले.व यात सर्व पक्षीय पदाधिकारी एकत्र येऊन या डंपिंग ग्राऊं ग्राऊंडला विरोध दर्शविला.
           येथील स्थानिक नगरसेविका व उपमहापौर सौ.उपेक्षा शक्तिवान भोईर याही बऱ्याच वर्षांपासून या मांडा-टिटवाळा येथे होणाऱ्या डंपिंग ला विरोध करीत आहेत. तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक हेही विरोध करून ठीक-ठिकाणी मिटिंग घरून निषेध व्यक्त केला. आज पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी येथे आले असता त्यांनी विद्यामंदिर शाळेत ही जनसुनावणी स.१२ वा.आयोजित केली होती. सकाळ १० वाजेपासूनच येथे मांडा-टिटवाळा येथील नागरिक, विविध संघटनेचे कार्यकर्ते व सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते हजर होत होते. जनसुनावणी शाळेच्या वरील हॉल मध्ये होती पण वरील हॉल मध्ये जमलेले नागरिक येण्यास तयार नव्हते. प्रचंड जनसुमुदाय येथे जमल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. शेवटी अधिकाऱ्यानी नमते घेऊन जनसमुदायासमोर खालील पटांगणात जनसुनावणी सुरू केली.
           जनसुनावणी सुरू करण्याअगोदर येथील स्थानिक नागरिकव कंडोमनपाच्या उपमहापौर सौ.उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी अधिकाऱ्यानं सांगितले की, तुम्ही जे सांगणार आहात व स्क्रीन वर जे दाखविणार आहात ते आम्हाला माहीत आहे. आम्हाला तुमचे काहीच ऐकायचे नाही. जनसुनावणी मध्ये तुम्ही नागरिकांचे म्हणणे अगोदर ऐकून घ्या व या प्रकल्पाला आमचा पूर्णपणे विरोध आहे. म्हणून आम्ही तुमचे काहीच ऐकून घेणार नाही. त्यानुसार नागरिकांनी त्यांचे मत व्यक्त करून त्याची नोंद पर्यावरण अधिकाऱ्यानी घेतली.
              या जनसुनावणी मध्ये, प्रस्तावित प्रकल्प हा नदीजवळ असल्याने पुरकालीन स्थिती येथे आल्यास प्रकल्प पूर बाधित होऊ शकतो. हे क्षेत्र भारत सरकारच्या केंद्र शासनाच्या बी एम टी सी सी च्या प्रकाशित नकाशा नुसार हे क्षेत्र भूकंप बाधित आहे. येथून ३०० मी. चया आसपास नागरी वस्तीला ५५ डेसीबील आवाज झाल्यावर पर्यावरण नियमांचे उल्लंघन होते. व विशेष म्हणजे मांडा-टिटवाळा हे श्री क्षेत्र व पर्यटन क्षेत्र मंजूर असल्याने येथे डंपिंग प्रकल्पाला विविध संघटना, पक्ष व दक्ष नागरिक या मुद्द्यांवर अधिकाऱ्याचे लक्ष वेधले. शेवटी अधिकाऱ्यानी सांगितले की या ज सुनावणीच्या बाबतीत आम्ही आमचा अहवाल व हा निषेध शासनाला कळऊ.
                या जनसुनावणी मध्ये स्थानिक नागरिक व उपमहापौर सौ. उपेक्षा शक्तिवान भोईर, नगरसेविका सौ. अपेक्षा बंदेश जाधव, नगरसेविका सौ. नमिता मयूर पाटील, नगरसेवक संतोष काशीनाथ तरे, राष्ट्रवादी चे मोरेश्वर (अण्णा) तरे, शिवसेनेचे किशोर शुक्ला, संभाजी ब्रिगेड चे प्रभाकर भोईर,  एड. जयेश वाणी, मनसेचे सावंत, भूषण जाधव, भाजपचे परेश गुजरे, अमोल गुजरे, शक्तिवान भोईर, सन्नी जाधव, राम भोईर, मधुकर भोईर, सर्व पक्षीय नेते-कार्यकर्ते व हजारो महिला , पुरुष या जनसुनावणी मध्ये सहभागी होते.
          
रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...