Friday 31 March 2023

कोचरी लघु पाटबंधारे योजना भूसंपादन व पुनवर्सनासंदर्भात जिल्हा स्तरावर संबंधित प्रशासनाने ग्रामस्थांसोबत बैठक घ्यावी - केतन भोज

कोचरी लघु पाटबंधारे योजना भूसंपादन व पुनवर्सनासंदर्भात जिल्हा स्तरावर संबंधित प्रशासनाने ग्रामस्थांसोबत बैठक घ्यावी - केतन भोज

लांजा, शांताराम गुडेकर ; गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या कोचरी लघु पाटबंधारे योजना कोचरी (डाफळेवाडी) या योजनेला सामजिक कार्यकर्ते केतन भोज यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मुंजरी मिळाल्यानंतर या मृद व जलसंधारण विभागाच्या होऊ घातलेल्या लघु पाटबंधारे योजना कोचरी ( डाफळेवाडी ) या प्रकल्पामुळे कोचरी गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदतच होणार आहे तसेच या योजनेचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.परंतु या होऊ घातलेल्या योजनेमुळे त्याठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या प्रकल्पग्रस्त होणाऱ्या वाड्या-वस्त्यांच्या पुनवर्सनासंदर्भात आणि प्रकल्पाच्या सद्य:स्थितीतबद्दल जिल्हा स्तरावर संबंधित प्रशासनाने प्रकल्पग्रस्त होणाऱ्या ग्रामस्थांसोबत बैठक घ्यावी अशी मागणी केतन भोज यांनी केली होती यामुळे येथील ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन त्या बाबतीत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करता येतील.तसेच भूसंपादनाच्या कार्यवाही मध्ये ही पारदर्शकता येईल, केतन भोज यांच्या या लेखी मागणी नंतर उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन ) समन्वय, रत्नागिरी यांनी भोज यांना कळवले की लघु पाटबंधारे योजना कोचरी ता.लांजा जि.रत्नागिरी या योजनेच्या धरण तळ व बुडीत क्षेत्र, सांडवा,धरण पोहोच रस्ता या प्रयोजनासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, राजापूर यांचेकडून भूसंपादनाची कार्यवाही सुरू असून, त्यांच्या कार्यालयाकडील पत्राने उपविभागीय अधिकारी, राजापूर यांचेकडे भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (भूसंपादन) समन्वय शाखा, रत्नागिरी यांनी पाठवला आहे या सदर भूसंपादनाची कार्यवाही प्राथमिक स्तरावर आहे त्यामुळे सामजिक कार्यकर्ते केतन भोज यांच्या लेखी मागणी नंतर उपविभागीय अधिकारी, राजापूर व जिल्हा जलसंधारण अधिकारी, रत्नागिरी यांना पुनवर्सनाशी निगडीत काही बाबी असल्यास त्या तपासून उचित कार्यवाही करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) समन्वय, रत्नागिरी यांनी दिल्या आहेत.

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) तर्फे चेंबूर येथील माहुल गाव म्युनिसिपल मराठी शाळेतील मुलांसाठी विनामूल्य वैद्यकीय चिकित्सा शिबिर संपन्न !

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) तर्फे चेंबूर येथील  माहुल गाव म्युनिसिपल मराठी शाळेतील मुलांसाठी विनामूल्य वैद्यकीय चिकित्सा शिबिर संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर) : 

संपूर्ण महाराष्ट्र व आदिवासी पाड्यात आपल्या समाजकार्याचे जाळे विणणाऱ्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) यांच्या माध्यमातून नुकतेच माहुल गाव म्युनिसिपल मराठी शाळा चेंबूर येथील मुलांसाठी विनामूल्य वैद्यकीय चिकित्सा शिबिर पार पडले. यावेळी त्यांना स्वच्छता किट तसेच औषधे, खाऊचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी विचारमंचावर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझरचे वित्त संचालक श्रीमती नजहत शेख मॅडम, कार्यकारी संचालक श्री. अनिलकुमार माथुर, वरिष्ठ प्रबंधक श्री. अश्विन कांबळे, पंचरत्न मित्र मंडळ अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदिप गावंड तसेच डॉ.विनित गायकवाड, डॉ.रजनिश कुमार आदि मान्यवर  उपस्थित होते. 

यावेळी मार्गदर्शनपर भाषणात शाळकरी मुलांना शिस्त, आरोग्य पालनाचे महत्व समजावून सांगितले व अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन शाळेचे समाजाचे, देशाचे नाव उंचावण्याचा सल्ला दिला. प्रमुख पाहुण्यानी विद्यार्थांशी हितगुज साधताना त्यांना व्यायाम, आहार-विहार हेही आपल्या जीवनात तेवढेच महत्त्वाचे असून एक दिवस तुम्हीही विचार मंचावरून आपापले मनोगत मांडण्याइतके मोठे व्हा अशा शुभेच्छा दिल्या. 

यावेळी पंचरत्न मित्र मंडळाच्या सामाजिक कामाची प्रशंसा केली व आरसीएफचे  व्यवस्थापन आणि या मंडळाला मदत करणारे सर्वच प्रायोजक, दानशुर दाते हे नेहमीच पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करुन मोठे सामाजिक दायित्व निभावत असल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. कार्यक्रम सूत्रसंचालनाची भुमिका सौ. स्नेहा नानिवडेकर यांनी पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रमेश पाटील, सचिन साळुंखे, वैभव घरत, हनुमंत चव्हाण, रहीम शेख, राजलक्ष्मी नायडू, नीलम  गावंड, स्वाती नाईक, जालिंदर इंगोले, मॅथ्यू  डिसूजा, सतीश कुंभार, प्रशांत नागपुरे, कार्तिकीयन एम. यांच्यासह पंचरत्न च्या सर्व पदाधिकारी, सभासद आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. शेवटी मंडळ अध्यक्ष अशोक भोईर यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमची सांगता केली.

मनसेच्या दमदार आमदारांनी करून दाखवले, राजू पाटलांच्या मनसे इशाऱ्यामुळे बेकायदा फेरीवाल्यांनी ठोकली धूम !

मनसेच्या दमदार आमदारांनी करून दाखवले, राजू पाटलांच्या मनसे इशाऱ्यामुळे बेकायदा फेरीवाल्यांनी ठोकली धूम !

डोंबिवली, अखलाख देशमुख, दि ३१ : स्टेशन पूर्व परिसरातल्या बेकायदा फेरीवाल्यांच्या मनमानीमुळे प्रवासी आणि नागरिकांना प्रचंड मनःस्ताप होत होता. यातून मार्ग काढण्यासाठी केडीएमसीला अनेकदा अर्ज पाठवले, विनवण्या केल्या; परंतु केडीएमसीने डोंबिवलीकरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. म्हणून मग यांना १५ दिवसांची मुदतही दिली, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. अखेर आज मनसे रस्त्यावर उतरली आणि गेली २५ वर्षे झोपलेली कुंभकर्णी केडीएमसी खडबडून जागी झाली.

डोंबिवली स्टेशन पूर्व परिसर मोकळा श्वास घेऊ लागलं. पण ही कारवाई केवळ एका दिवसापुरती मर्यादित राहिली तर त्याला काहीच अर्थ नाही, कायमस्वरूपी फेरीवालामुक्त डोंबिवली स्टेशन परिसर मनसेची मागणी आहे.

"फेरीवाल्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळाली तरच हा प्रश्न कायमचा निकाली निघेल. आता पुन्हा झोपी जाण्याआधी हा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर आम्ही आहोतच पुन्हा उठवायला" असा आमदार श्री. राजू पाटील यांनी आज इशारा दिला.

शांतता आणि शिस्तीत महाविकास आघाडीची सभा पार पडेल - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

शांतता आणि शिस्तीत महाविकास आघाडीची सभा पार पडेल - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

'प्रमुख पदाधिकारी यांनी घेतली मैदानावर बैठक'

छत्रपती संभाजीनगर, अखलाख देशमुख, दि ३१ :  २ एप्रिल रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. सर्वसामान्य नागरिक या सभेला मोठ्या संख्येने येणार असल्याचे पाहून सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे शहरात असंवेदनशील वातावरण निर्माण केले जाते. मात्र शिवसैनिक आणि नागरिक अफवाना बळी पडत नाही. शांतता आणि शिस्तीत महाविकास आघाडीची सभा पार पडेल, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

प्रशासन आणि प्रमुख पदाधिकारी यांनी सभा मैदानावर आढावा घेऊन नियोजन बैठक घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, सर्वांनी सतर्क राहून, अफवा आणि वातावरण खराब करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवावे. तात्काळ पोलीस आणि पदाधिकारी यांना माहिती द्यावी. सभा यशस्वी होणारच असा विश्वास त्यांनी वक्त केला. संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

या बैठकीस माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, बाप्पा दळवी, गणू पांडे, अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड,  महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटक सुनीता देव, माजी महापौर जिल्हा समनव्यक कला ओझा, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हासंघटक नलिनी बाहेती, अनिता मंत्री, जयश्री लुंगारे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, शहर संघटक आशा दातर, भागूबाई शिरसाठ, विद्या अग्निहोत्री, शिव अंगणवाडी सेनेच्या मंजुषा नागरे, रेणुका जोशी, वनमाला पटेल झ किरण शर्मा, पद्मा तुपे, कविता सुरळे, सविता निघूळे, उपशहरप्रमुख अनिल जैस्वाल, किशोर कच्छवाह, राजू दानवे, दिग्विजय शेरखाने, संजय हरणे, शिवा लुंगारे, बाळासाहेब गडवे, संतोष खेडके, हिरा सलामपुरे, लक्ष्मीनारायण बाखरिया, सीताराम सुरे, बंटी जैस्वाल, छोटू घाडगे, नंदू लबडे, अभिजित पगारे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Thursday 30 March 2023

"द ग्रेट इम्तियाज जलील"... वॉल ऑफ औरंगाबाद", याला म्हणतात नेतृत्व...... पोलिसांच्या संयमाला ही सॅल्युट... खरंच आम्ही वाचलो... !!!

"द ग्रेट इम्तियाज जलील"... वॉल ऑफ औरंगाबाद", याला म्हणतात नेतृत्व...... पोलिसांच्या संयमाला ही सॅल्युट... खरंच आम्ही वाचलो... !!!

🙏 गेली चाळीस वर्षे ऐतिहासिक औरंगाबाद शहराला गालबोट लावणाऱ्या अनेक घटनांचे आम्ही साक्षीदार.... एखादी अप्रिय घटना घडल्या नंतर त्यावर काबू मिळविण्याचा साठी पोलीस पेक्षा जास्त जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. बुधवारी रात्री शहराच्या किराडपुरा भागात काही बटन टोळक्याने जो धुमाकूळ घातला,तो स्वीकार्य नाहीच नाही. मात्र बघता... बघता ज्या गतीने वातावरण पालटले ते अत्यंत धक्कादायक आहे.वाटत होतं या घटनेचे लोण शहरात इतरत्र पसरते की काय? या *"संकटाच्या घडीत तो धावून आला.... काही काळ तो .... हळहळला.... मात्र गडबडला नाही.... त्यांने एकट्याच्या बळावर तितक्याच खुबीने परिस्थिती आटोक्यात आणली.... तो सोशियल मेडीयावर ज्या पद्धतीने हात जोडून शहरवासीयांना कळकळीची विनंती करत होता त्यावरून त्याची शहराच्या सामजिक सामंजस्यासाठी तळमळ किती? हे कळतंय..... म्हणूनच आम्ही या अद्वितीय देवदूताला खिताब देतोय.... "द ग्रेट इम्तियाज जलील.... वॉल ऑफ औरंगाबाद", आणि याच वेळी शहराचे पोलीस आयुक्त यांच्या कल्पक नेतृत्वाच्या संयमाला ही सॅल्युट..!! हुश्श....आम्ही वाचलोय.....!!

🙏  अनेकांना वाटत असेल.... खासदार इम्तियाज जलील यांचा इतका उदो..उदो कशाला?  *मात्र सत्य स्वीकारण्याची ताकत असायला हवी. काल रात्रीच्या घटने नंतर खासदारांचे राजकीय शत्रू ही त्यांचे चाहते झालेत... ! किराडपुरा भागात राममंदिर असल्याने हा भाग नेहमी संवेदनशील मानला जातो. रात्री नेमकी घटना याच ठिकाणी रस्त्यावर घडली. जलील जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी वेळ न घालता थेट मंदिरात जाऊन ठिय्या मांडले. तेथील पुजारी, महिला, कर्मचारी यांच्या घरात जाऊन ....तुमच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे.... तुम्ही घाबरू नका म्हणून धीर दिला. त्यातच शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ, राष्ट्रवादीचे विनोद पाटील व इतर नेत्यांशी संपर्क साधून राममंदिरात काहीच घडलं नाही म्हणून थेट व्हिडीओ कॉन्फरन्स करून पटवून दिलं. त्याच वेळी शहराच्या जनतेला हात जोडून शांततेचे आवाहन करत संयम बाळगा..... शांती भंग करू नका.... म्हणून विनवणी केली.एका भिंती सारखे रात्रभर राममंदिराचा किल्ला लढवला.... स्वतःवर दगड येत असतांना मात्र मंदिराला किंवा तिथल्या महिला व कर्मचाऱ्यांना किंचित ही इजा पोहोचू दिली नाही. एकीकडे दगडफेक होत असताना त्या क्षणी कल्पकतेने निर्णय घेत आपल्या कर्तृत्वाचा परिचय दिला. त्या मुळे लाखो शहर वासी अर्ध्या रात्री का असेना निवांत झोपले. आज सकाळी शहरात असं काही घडलं... किंचितही वाटलं नाही. काही तासात हा बदल घडवून आणला म्हणून.... "द ग्रेट इम्तियाज जलील"*.

🙏  *राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शहराच्या घटनेवर जे संयमाने वक्तव्य दिलं, त्यांचे ही अभिनंदन.. !! शहराच्या शांततेला तडा जाऊ दिलं जाणार नाही. नामांतरशी या प्रकरणाचा काडीमात्र संबंध नाही. हे सांगताना त्यांनी राजकारण केले नाही. त्यात डॉ.निखिल गुप्ता यांनी ज्या प्रकारे शहराच्या इतर भागात पडसाद उमटू दिलं नाही म्हणून त्यांचे ही अभिनंदन... प्रकरण दोन गटांचे असल्याचे सांगत राजकीय पुंग्या वाजविणाऱ्यांची त्यांनी हवाच काढून घेतली. *पोलिसांचा संयम ही शहराच्या शांततेला कायम ठेवण्यासाठी उपयोगी ठरला.

🙏 *आज आम्ही दिवस भरात अनेक शहराच्या जुन्या-जाणत्यांशी चर्चा केली. यात अनेक राजकीय पक्षाचे शिलेदार ही आहेत. त्या सर्वांनी खासदार जलील यांची तोंडभरून स्तुती केली. आपल्या शहराच्या जातीय सलोख्याला तडा जाऊ नाही... म्हणून खंबीरपणे हा माणूस भिडला... लढला... उभा राहिला. आपल्या जीवाची पर्वा न करता राम मंदिराचे संरक्षण केले. हे मंदिर जितके तुमचे आमचे ही तितकेच...... आपल्या राजकीय स्वार्थया साठी शहराची अब्रू घालणाऱ्यांना ही त्यांनी चांगलाच चोप दिला. मंदिराचे संरक्षक... रखवालदार आम्हीच.... ही जाणीव त्यांनी करून दिली. हा संदेश छोटा नाही. बाहेरच्या विषारी लोकांना शहरात आणून शहराची सामाजिक सामंजस्य बिघडवणाऱ्यांनाही हा... टोला... धडा... !! (जयहिंद)* 

*अशफाक शेख,वरिष्ठ पत्रकार*, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) +91 99236 21786

मंचदिनी कीर्तन महोत्सवास कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची सदिच्छा भेट !

मंचदिनी कीर्तन महोत्सवास कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची सदिच्छा भेट ! 

सिल्लोड, अखलाख देशमुख‌, दि ३० : अंधारी ता. सिल्लोड येथील महंत श्री. अर्जुनदास महाराज यांच्या 93 व्या पुण्यतिथी निमित्त उदासी मठ येथे आयोजित भव्य मंचदिनी कीर्तन महोत्सवास कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित पंचदिनी कीर्तन महोत्सव व श्रीराम नवमीच्या उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.

      यावेळी महंत मुकुंडदास महाराज, ह.भ.प. तुळशीराम महाराज काकडे , शिवसेना जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे , सिल्लोड न.प. तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, रवींद्र दाणी यांच्यासह अण्णा पांडव, अब्दुल रहीम, लक्ष्मण तायडे, जयवंता गोरे, विठ्ठल तायडे, डॉ. मुळे आदिंसह भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती कॉंग्रेस तर्फे डॉ.पवन डोंगरे यांची अध्यक्षपदी निवड !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती कॉंग्रेस तर्फे डॉ.पवन डोंगरे यांची अध्यक्षपदी निवड ! 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : दरवर्षी प्रमाणे या वर्षीही औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२३ स्थापन करण्यात आली आहे. औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ लिडर यांनी सर्वानुमते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी डॉ.पवन डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे. 

डॉ.पवन डोंगरे यांना नियुक्ती पत्र देतांना औरंगबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर, अनिस पटेल, डॉ.निलेश अंबेवाडीकर, कैसर बाबा, गुरमितसिंग गिल, योगेश बहादुरे, अभिषेक शिंदे, आकाश रगडे, मिलीद थोरे, विनोद उंटवाल, मयुर साठे, असित सरदवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सिद्धी महिला कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता कवडे यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी अभिनव उपक्रम - विनोद कांबळे (चिफ ब्युरो, मुंबई)

सिद्धी महिला कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता कवडे यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी अभिनव उपक्रम - विनोद कांबळे (चिफ ब्युरो, मुंबई) 

मुंबई, दि.३० : सिद्धी महिला कल्याणकारी संस्थेतर्फे दिनांक आज नामांकित युनिकेअर हेल्थ केअर सेंटर टीमच्या समवेत प्रभात मित्र मंडळाने छत्रपती संभाजी उद्यान कन्नमवार नगर क्र १ विक्रोळी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर आरोग्य तपासणी शिबिर ज्येष्ठ नागरिक व घरकाम करणाऱ्या महिलांकरिता आयोजित करण्यात आले होते.‌ 

ज्येष्ठ नागरिक शरद राऊत यांच्या ८६ वा वाढदिवसाचे निमित्त साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिशा वेल्फेअर ग्रुप संस्थेचे दिनेश बैरीशेट्टी व त्यांचे इत्तर सहकारी यांनी उपस्थित राहून उत्तम सहकार्य केले केले आहे. त्याचप्रमाणे प्रभात मित्र मंडळ यांनी आरोग्य तपासणी शिबिरासाठी व्यवस्था करून छान सहकार्य केले आहे. तर प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान सरनोबत यांची उपस्थिती सुद्धा कार्यक्रम प्रसंगी महत्वपूर्ण होती. त्याचप्रमाणे सरनोबत यांनी आरोग्य चिकित्सा शिबिरात असणारे चिकित्सक तसेच नितीन पाये व त्यांचे सहकारी यांना सिद्धी महिला कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता कवडे या सर्वांचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

विक्रोळीतील शांतीवन येथील जयश्री खिलारे यांनीही या आरोग्य चिकित्सा शिबिरास उपस्थित होत्या. सुमारे १०० ज्येष्ठ नागरिक व घरकामगार महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे. नमुद आरोग्य शिबिरामध्ये संधिवात, नेत्र चिकित्सा,सांधेदुखी ,गुडघा दुखी,वांग्या अश्या अनेक विकारांवरती निःशुलका सल्ला तसेच औषधे वितरण सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत करून आरोग्य शिबिराची सांगत करण्यात आली आहे.

लिंबू आणि सिताफळाने आणली आर्थिक समृद्धी !

लिंबू आणि सिताफळाने आणली आर्थिक समृद्धी !

अकोला, अखलाख देशमुख,  दि.30 : अथक मेहनत आणि शास्त्रीय दृष्टीकोनाचा अवलंब केल्यास शेतीसारखा फायद्याच्या व्यवसाय नाही, असे सांगतात पुनोती बु. ता. बार्शीटाकळी येथील शेतकरी गजानन मोतिराम महल्ले. महल्ले यांनी आपल्या तुलनेने हलक्या प्रतिच्या जमिनीत लिंबाची बाग केली आहे. शिवाय नुकतीच त्यांनी उर्वरित क्षेत्रात सिताफळ बाग केली आहे.  लिंबाच्या बागेतून वर्षाला  ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत असते, असे त्यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या योजनांमुळे झाला लाभ___

हे सगळं त्यांना शक्य झाले ते कृषी विभागाच्या विविध योजनांमधून. लिंबाची बाग त्यांनी महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेतून मिळाली. त्यात त्यांनी २ एकर ७ गुंठे क्षेत्रात  लिंबाची झाडे लावली. संपूर्ण बाग त्यांनी ठिबक खाली घेतलाय. या शिवाय त्यांनी सेंद्रीय खतांचा वापर, बागेची नीट निगा राखणे, झाडांची वेळेवर छाटणी करणे इ. उपाययोजना केल्याने आज त्यांच्या बागेतील लिंबू बाजारात प्रसिद्ध झालाय. महल्लेंचा लिंबू म्हणून हा लिंबू अकोला, कारंजा, पिंजर या ठिकाणच्या बाजारात प्रसिद्ध आहे. मोठा आकार, भरपूर रस हे त्यांच्या लिंबाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे इतरांपेक्षा त्यांच्या लिंबाला भाव जास्तच मिळतो. आता तर इतकी ख्याती झाली आहे की, व्यापारी स्वतःच येऊन माल घेऊन जातात. याच कमाईतून सर्व प्रपंच आपण केला, असेही त्यांनी सांगितले. 

सिताफळ बागेची लागवड___

याच बागेच्या अनुभवातून त्यांनी सन २०२१-२२ मध्ये सिताफळाची बाग केली आहे. सिताफळ बागेसाठी त्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ मिळाला असून  सिताफळही त्यांनी ठिबकवर केले आहे. त्यांची जमिन हलकी असल्याने त्यांनी फळबाग हा पर्याय निवडला. ते स्वतः आता फलोत्पादनातील तज्ज्ञ झाले आहेत. त्यांच्या शेतावर हल्ली कृषी विभागाचे प्रक्षेत्र दौरे आयोजित करुन अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. सेंद्रीय खतांचा वापर हे ही त्यांच्या बागेचे वैशिष्ट्य. 

रोपवाटिकेचेही संवर्धन___

या शिवाय आता त्यांच्या बागेचे वृक्ष हे मातृवृक्ष म्हणून गृहित धरुन त्यांना रोपवाटिका करण्यासही प्रोत्साहन देण्यात आले आहे. रोपवाटिका करुन त्यांच्याकडील रोपे आता अन्य शेतकरी घेऊन जात असून फळबाग लागवड करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना___

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा भाग म्हणून ही योजना राबविली जाते. वैविध्यपूर्ण हवामान विभागानुसार प्रादेशिक  अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या भागात फलोत्पादनाला चालना दिली जाते. त्यात संशोधन, तंत्रज्ञान प्रसार, विस्तार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा देऊन समुह पद्धतीने विकास केला जातो. यात शेतकऱ्यांचे एकत्रिकरण करणे हा महत्त्वाचा घटक आहे.  त्याद्वारे फलोत्पादनात वाढ करणे, उत्पन्नात वाढ करुन आहार विषयक सुरक्षा बळकट करण्यात येते. यात सुक्ष्म सिंचनाला चालना दिली जाते. जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती असून त्यासमितीमार्फत योजनेचा प्रसार व शेतकऱ्यांची निवड करणे आदी बाबी करण्यात येतात, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर यांनी दिली.

औरंगाबाद मध्ये झालेल्या घटनेस एमआयएमसह, भाजप जबाबदार !

औरंगाबाद मध्ये झालेल्या घटनेस एमआयएमसह, भाजप जबाबदार !

*विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप*

छत्रपती संभाजीनगर, अखलाख देशमुख‌, दि ३० : येथे  मध्यरात्री झालेल्या दोन गटांच्या वादातून शहारत अशांतता पसरवण्याची घटना घडली. या घटनेला सर्वस्वी एमआयएमसह भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

औरंगाबाद येथील श्रीराम मंदिर किराडपुरा परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून करण्यात आलेल्या जाळपोळ, झालेल्या घटनास्थळाची पाहणी करत परिस्थितीचा दानवे यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

एमआयएम भाजपने  मागच्या काळात दोन समाजात द्वेष रुजवण्याचा काम केलं आहे, त्याचा हा परिणाम आहे. 
जे संभाजी नगर गुण्यागोविंदाने राहण्याच व विकासाच्या दृष्टीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तेथील वातावरण धगधगत ठेवण्याच काम हे राजकीय पक्ष करत आहेत. याबाबत  सभागृहातही आवाज उठविला होता. या परिस्थितीबाबत पोलिसांनाही अवगत केले होते असे दानवे म्हणाले. 

तसेच पोलिसांवर हल्ले होणं, पोलिसांचे वाहन जाळणे ही बाब निषेधार्ह आहे. त्यामुळे पोलिसांनीही अशा समाजकंटकांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हे प्रकार होत आहेत. दंगल होण्यास हे पक्ष जबाबदार आहेत. मात्र जनता आता शहाणी झाली आहे ती अशा गोष्टींना खतपाणी घालणार नाही असे म्हणत *अंबादास दानवे यांनी नागरिकांनी शांतता, संयम पाळवा. घाबरण्यासारखे काहीच नाही, रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.*

हॉटेल व्यावसायिकाची मुजोरी !

हॉटेल व्यावसायिकाची मुजोरी ! 

*महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे अभय असल्याची चर्चा*

कल्याण, नारायण सुरोशी : कल्याण शहरात स्टेशन जवळील दिपक हॉटेल मालकाची मुजोरी पहाण्यास मिळाली, एवढ्या मोठ्या कारवाई वेळी महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला.

कल्याण स्टेशन परिसराच्या विकासाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु आहे. हे हॉटल रस्त्याला लागूनच आहे.  या हॉटेलचे स्ट्रक्टरल ऑडीट करण्यासाठी महापालिकेने ऑडीट करण्याची नोटिस हॉटेल मालकास पाठविली. हॉटेल मालकाने महापालिकेचं पथक ऑडीटकरीता येणार त्या आधी एक दिवस हॉटेल बंद केलं आहे. आज महापालिकेतर्फे ऑडीट करण्यासाठी प्रभाग अधिकारी तुषार सोनावणे, महापालिका अधिकारी राजेश सावंत हे त्यांच्या पथकासह पोलीस बंदोबस्तात पोहोचले. त्याठिकाणी हॉटेल मालकाने ऑडीट करण्यास मज्जाव केला. महत्वाची बाब एवढी मोठी कारवाई व स्थानिक प्रभाग समितीचे उपायुक्त धैर्यशील जाधव गैरहजर, कारवाईसाठी गेलेले प्रभाग अधिकारी तुषार सोनवणे‌ एकटे पडल्याचे दिसून आले. महापालिका अधिकारी हॉटेल मालक यांच्यात बरीच चर्चा झाली, पण हॉटेल बंद असताना कारवाई करणे बेकायदेशीर असल्याचा दावा हॉटेल मालकाने केला. 

या आधी ही अनेकदा दिपक हॉटेलचा विषय कारवाई संदर्भात पुढे आला होता, या हॉटेल मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीस अडथळा निर्माण होत असतो, तरी अजून पर्यंत कधीही याच्यावर कारवाई झालेली नाही.

 सर्वसामान्य नागरिकांत हीच चर्चा आहे. गरिबांसमोर धाडस दाखवणारे महापालिकेचे अधिकारी एका हॉटेल व्यवसाय का समोर किती लाचार आहेत हे याचे जिवंत उदाहरण हा प्रसंग दाखवून गेला, तसेच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा सहकार्य शिवाय एक हॉटेल व्यावसायिक एवढी मुजोरी दाखवू शकत नाही. तरी प्रश्न रहातात या हॉटेलचे स्ट्रक्चरल ऑडीट (Structural Audit) होणार का ? आणि झालं तर ते कधी होणार ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. महानगरपालिका या हॉटेल संदर्भात काही ठोस निर्णय घेऊ शकेल का?

दिपक हॉटेलचे मालक चंद्रकांत शेट्टी यांनी सांगितले, ही कारवाई बेकायदेशीर असून याआधी देखील मी पालिकेच्या पॅनेलवरील स्ट्रक्चरल ऑडिटरमार्फत स्ट्रक्चरल ऑडिटर केलं होतं. मात्र महापालिकेने त्यात त्रुटी काढल्या आहेत. विजेटीआयमार्फत ऑडिट करण्यासाठी आज ते आलेत मात्र हे सर्व बेकायदेशीर आहे. माझं हॉटेल बंद आहे. हॉटेलमध्ये कुलूप तोडून घुसणे बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं.

राम नवमी उत्सवात " शिर्डी " साईंच्या जयघोषाने दुमदुमली, भक्तांसाठी मंदिर रात्रभर खुले !

राम नवमी उत्सवात " शिर्डी " साईंच्या जयघोषाने दुमदुमली, भक्तांसाठी मंदिर रात्रभर खुले !

*श्री राम नवमी निमीत्त शिर्डीत श्री.साई बाबांची आरती, पूजन व मध्यांन आरती*

भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील, (कोपर) :
            शिर्डीत दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आज (दिं,३०) रामनवमी उत्सवात "शिर्डी" साईंच्या जय घोषानेने दुमदुमली असून आलेल्या सर्व साई भक्तांना दर्शन मिळावे या साठी साई संस्थानाने मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
             शिर्डीतील रामनवमी उत्सव सर्वांच्याच श्रध्देचा विषय आहे. शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची बुधवारपासून भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. साईनामाचा जयघोष करत मुंबईसह ईतर शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. उत्सवासाठी  " साईबाबा" मंदिरावर विद्युत रोशनाई तसेच "साई" मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. 
            शिर्डीत रामनवमी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. भाविकांनी कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याची विधीवत पुजा करून "साईमुर्ती" आणि "साई" समाधीला जलाभिषेक करण्यात आला. उत्सवाचे यंदाचे हे ११२ वे वर्ष आहे. "साईबाबांना" मंगलस्नानही कावडीतून आणलेल्या पाण्याने करण्यात आले आहे. सकाळी काकड आरतीनंतर बाबांची पोथी, विणा आणि प्रतीमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. 
           उत्सवाच्या निमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. साई मूर्तीलाही विविध अलंकारांनी सजविण्यात आले आहे. साई मंदिराच्या ४ नंबर प्रवेशद्वारावर द्वारकामाई मंडळाच्या वतीने भव्य श्रीराम प्रवेशद्वार उभारले आहे. लेंडीबागेत साई पालखी मिरवणूक व साई प्रसादालयाच्‍या प्रवेशद्वारावर शिव भोला भंडरी, साई भोला भंडारी हे भव्‍य देखावे उभारले आहेत.
         रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक येथे येत असतात. शिर्डीचा उत्सव हा भाविकांसाठी आनंद सोहळा असतो. साईबाबांच्या भेटीसाठी आतुर झालेला भक्तगण साई मुर्तीची केवळ एक झलक पाहाण्यासाठी उत्सुक असतो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवातील उर्जा भाविकाला वर्षभर पुरणारी असते.हा उत्सव 'याची देहि याची डोळा' अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येने भक्त "साई" दरबारी दाखल झाले आहेत.

Wednesday 29 March 2023

गोवंडी मध्ये असंघटित कामगार महिलांसोबत जागतिक महिला दिन संकल्प संस्थेने केला साजरा !

गोवंडी मध्ये असंघटित कामगार महिलांसोबत जागतिक महिला दिन संकल्प संस्थेने केला साजरा !

मुंबई, (अश्विनी निवाते) :
गोवंडी विभागातील शिवाजी नगर मधील समाज कल्याण केंद्र येथील भव्य सभागृहात वस्ती स्तरावर नागरिकांच्या मूलभूत गरजांच्या संदर्भात व्यापक काम करणाऱ्या संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिन कार्यक्रम शनिवार २५ मार्च २०२३ रोजी करण्यात आले होते.

या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या समन्वयक शकीला तांबोळी यांनी शिस्तबद्धरीत्या आखणी केली होती. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नशा बंदी मंडळ सरचिटणीस वर्षा विद्या विलास, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता वंदना शिंदे; अभिनेत्री, नृत्यांगना,मॉडेल व इंडिया नेक्स्ट सुपर मॉडेल २०२३ स्मिता धुमाळ, पी.एस.आय दिपाली पावसे, ए.पी.आय प्रियंका चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता कवडे उपस्थित होत्या.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकल्प संस्थेच्या वनिता सावंत आणि कार्यक्रमाची प्रस्तावना सविता हेंडवे यांनी सादर केली.

सदर कार्यक्रमामध्ये असंघटित क्षेत्रातील १२० महिलांनी मोठ्या प्रमाणात हिरीरीने सहभाग नोंदवला होता. शिवाय या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी स्त्री पुरुष समानता विषयावर साप सीडी खेळाच्या माध्यमातून चर्चासत्र घेण्यात आले. तसेच विविध मनोरंजन खेळाच्या माध्यमातून सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक स्पर्धा घेऊन विजेता महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर पोषण आहार या विषयावर महिलांनी कौशल्यपूर्ण पथनाट्य सादर केले. फरीदा अत्तार यांनी आई या विषयावर एक खूप छान गीत सादर केले. तर उपस्थित मान्यवरांनी महिलांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले. सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांना संकल्प संस्थेतर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

राजू जगताप, मंगेश पडवळ‌, सूर्यकांत चव्हाण, प्रमोद गायकवाड, प्रकाश पवार यांचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीमा परीहार, कपिल क्षीरसागर, विनोद कांबळे, अशपाक तांबोळी यांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्व महिलांना संकल्प संस्थेने भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता आणि आभार प्रदर्शन कपिल क्षीरसागर यांनी केले.

कल्याण येथील फडके मैदान येथे MICHI चे ६ ते ९ एप्रिल दरम्यान प्रॉपर्टी प्रदर्शन !

कल्याण येथील फडके मैदान येथे MICHI चे ६ ते ९ एप्रिल दरम्यान प्रॉपर्टी प्रदर्शन !

 

कल्याण, प्रतिनिधी : क्रेडाय एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिट चे १२ वे प्रॉपर्टी एक्झिबिशन ६ ते ९ एप्रिल दरम्यान कल्याण पश्चिमेतील फडके मैदान येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी एमसीएचआयचे रवि पाटील, एमसीएचआय अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, कॉर्डिनेटर दिनेश मेहता आदी पदाधिकारी उपस्थित होते.


४० हून अधिक विकासक १५० हून अधिक प्रोजेक्ट एका छताखाली बघता येणार आहेत. गेल्या अनेक वर्षाचा अंदाज बघता २५ हजारांपेक्षा अधिक नागरिक भेट देतील असा अंदाज आहे. या वर्षी तर स्पॉट बुकिंग डिस्काउंट तर आहेच पण त्या सोबत प्रत्येक तासाला एक लकी ड्रॉ देखील काढला जाणार आहे.

क्रेडाय एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिट गेली ११ वर्ष लोकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा स्वप्नातलं घर घेण्याची एक सुवर्णसंधी येऊन आली आहे. या प्रदर्शनात सर्व रेरा प्रोजेक्ट नामांकित विकासक एका छताखाली बघता येणार आहे. फक्त कल्याण डोंबिवलीच नव्हे तर अंबरनाथ, बदलापूर, बापगाव, कोनगाव, टिटवाळा, शहापूर परिसरातील सर्व सुविधा युक्त घरे बघण्याची संधी कल्याण डोंबिवली करांना मिळणार आहे. १६ लाखांपासून सुरु होणारी आणि १ करोड पर्यंतची घरे यावेळी प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. बजेटमध्ये बसतील आणि सर्वांना परवडतील अशी स्वप्नातली घरे देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्रेडाय एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे.

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार विश्वनाथ भोईर, कडोमपा आयुक्त भाऊसाहेब दांडगे, सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे, अधिकारी व मा. नगरसेवक देखील एक्झिबिशनला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.

सार्वजनिक सण उत्सवाच्या निमित्ताने पोलीस अधिक्षकांनी घेतली शांतता कमिटीची बैठक !

सार्वजनिक सण उत्सवाच्या निमित्ताने पोलीस अधिक्षकांनी घेतली शांतता कमिटीची बैठक ! 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २९ : आगामी सार्वजनिक सण उत्सव ज्यामध्ये रामनवमी, महाविर जयंती, डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद - 2023  च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय मध्यवर्ती शांतात समितीची बैठकीचे आयोजन आज आर्यभट्ट सभागृह, एम.जी.एम. कॅम्पस येथे करण्यात आले होते. यावेळी मा. श्री. अस्तिककुमार पांडे सर यांचे अध्यक्षतेखाली व मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, यांचे उपस्थितीत जिल्हातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, माध्यम प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.  

यावेळी शांतता बैठकीस उपस्थित नागकिरांना पैकी मोहंमद कुरेशी, सिल्लोड यांनी शहराचे मुख्य मार्गावरिल बंद असलेले सि.सी.टी.व्ही. कॅमेरे पुर्वरतपणे चालु करणे तसेच नव्याने सि.सी.टि.व्ही. कॅमेरे बसवण्यात यावे. तसेच सिल्लोड येथील चाठे सर, यांनी सांगितले कि, नागरिकांनी स्वयंशिस्तीने कायद्याचे मर्यादा पाळने गरेजेचे असुन मिरवणुका व सण साजरा करतांना पोलीसांना सहकार्य करणे अपेक्षीत असल्याचे मत व्यक्त केले आहे. याच प्रमाणे अलिम पठाण यांनी पोलीस ठाण्यात पोलीसांची कुवक वाढवण्या बाबत  प्रश्न मांडला तर रमेश जाधव (माजी सरपंच) शेद्रा यांनी डी. जे. वाजवण्यास परवानगी देण्याबाबत विंनती केली आहे.  

मा. पोलीस अधीक्षक यांनी  आगामी सण-उत्सवाचे अनुषंगाने नागरिकांच्या सुचना समजावुन घेऊन त्या निश्चीत पणे सोडवीण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच जिल्हयात सर्वत्र डी. जे. वाजवण्यास पुर्ण: बंदी असल्याने नागरिकांनी किंवा मिरवणुक संयोजकांनी मिरवणुकी करिता पारंपारीक वाद्यांचा वापर करावा जेणे करून ध्वनी नियंत्रण कायद्याचा भंग होणार नाही. 

सध्या तरुणाई मध्ये अवैध बॅनरबाजी करण्याचा कल मोठयाप्रमाणावर वाढत आहे. ज्यामुळे धार्मिक भावना दुखावणारे तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल असे मजुकर प्रकाशित करणे, ते सोशल मिडीयाचे माध्यमातुन स्टेटस ला ठेवणे, पुढे पाठवणे अश्या प्रकारच्या वृत्तीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. स्वत:चा धर्म किंती प्रभावी हा दाखविण्यासाठी तरूण मुलांनमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. ज्यामधुन इतरांच्या धार्मिक भावना दुखाल्या जावुन दोन धर्मात तेढ निर्माण होतात. व यामुळे गावामध्ये तणावयुक्त विस्फोटक वातावरण निर्माण होते.  ज्यामुळे अशा तरूण मुलांचे विरूध्द कायदेशिर गुन्हे दाखल होवुन त्यांचे चारित्र्यावर कायमस्वरूपी गुन्हयाची नोंद केली जाते ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगल्या नोकरी अथवा व्यवसायाची संधीला मुकावे लागते.

यासाठी घरातील जेष्ठ किंवा गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी वेळीच अशा तरूण मुलांकडे लक्ष देवुन त्यांचेवर चांगले संस्कार देणे अपेक्षीत आहे. कारण धार्मिक भावना दुखावणे किंवा तसा प्रयत्न करणारी वर्तन करणे हा मार्ग शेवटी विध्वसंकडे घेवुन जाणार आहे. नागरिकांनी शक्य असल्यास महापुरूषांचे नावाने साजरे होणारे सणांचे माध्यमांतुन त्या महापुरूषांचे विचार हे तरूणाई पर्यंत कसे पोहचतील यासाठी प्रयत्नशिल रहावे. त्यांचे मिरवणुकीसाठी जमा होणा-या पैशातुन गावात त्यांचे नावाने अभ्यासिका अथवा समाजपयोगि उपक्रम राबविण्यावर अधिक भर दिल्यास त्यांना तिच खरी श्रध्दांजली/ अभिवादन ठरेल. त्याचे मिरवणुकीत दारू पिवुन धिंगाना घालेने, असभ्य वर्तन करणे, हा एक प्रकारे त्या उत्सवाचा अनादर केल्या प्रमाणे आहे.

महापुरूषांची अथवा धार्मिक मिरवणुक काढतांना स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा गोधंळ घातल्यास अगर धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन करणा-या व्यक्तीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येवुन त्यांचे विरूध्द कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल तसेच  यामध्ये आयोजकांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांना सुध्दा यामध्ये आरोपी केले जाईल असा कायदेशिर ईशारा दिला आहे.
परंतु आदर्श मंडळांना/ आदर्श मिरवणुक बद्दल पदाधिकारी यांचा बक्षिस व सन्मानपत्रदेवुन त्यांचा कामाचा गौरव सुध्दा करण्यात येणार आहे. याकरिता त्यांना पोलीसांचे अटी व शिर्थीचे पालन करणे अत्यावश्यक असुन डी.जे. ऐवजी पारंपारिक वाद्याचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करून त्यांचा अधिका अधिके सहभाग नांेदविणे प्राधान्यक्र राहील.  जिल्हा पोलीस यंत्रणा या सण उत्सवाचे अनुषंगाने सर्तक असुन सर्व पोलीस ठाण्यास मनुष्यबळ वाढवुण देण्यात येणार असुन सर्व मिरवणुक मार्गावर सि.सी.टि.व्ही. कॅमेरा सह, पोलीसही संपुर्ण मिरवणुकीचे व्हिडीओग्राफी करणार आहेत. यासाठी पोलीस ठाणे स्तरावर नागरिकांच्या

शांतात समितीच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत असुन त्यामाध्यमांतुन नागरिकांना मार्गदर्शन करून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवुन गावातील शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेणे बाबत व त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती  देणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.

तसेच मा. जिल्हाधिकरी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना सांगितले कि, कोणताही उत्सव साजरा करतांना समाज चांगला राहिला पाहिजे याचा विचार करून पुढे जाणे आवश्यक आहे. चांगल्या गोष्टी स्विकारून व वाईट गोष्टी सोडुन चांगल्या विचारांनी सकारात्क उर्जाने व शांततेने उत्सव साजरा करावा. यामध्ये महिलांना व मुलींना सण/उत्सव साजरा करतांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशा प्रकारचे वातावरण निर्माण करावे जेणे करून अधिक प्रमाणात महिला/ मुली आनंदाने या उत्सवात सहभाग नोंदवतील तेव्हा आपला हा सण/उत्सव साजरा करण्याचा उद्देश साध्य होईल. आपले सण साजरा करतांना इतर समाजाचे किंवा कोणाचे भावना दुखावणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.  बहुतांश नागरिक हे कायद्याचे पालन करतात परंतु 2/4 टक्के लोक हे उदंड, नकारात्क असतात अशा लोकांना नियंत्रणात ठेवण्याचे काम हे पोलीसांचे आहे. गावातील जेष्ठ नागरिकांनी तरूण मुलांना चांगल्या भविष्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे. समाजातील दोन पिठयामध्ये चांगले प्रबोधनात्क सुसंवाद असल्यास समाज हा प्रगतीच्या दिशने वाटचाल करतो वाईट मार्गाने गेल्यास त्यांचा शेवट हा विदारक असतो. यासाठी नागरिकांनी आदर्श आचारण ठेवणे गरजेचे आहे.

सध्या जिल्हयात महापुरूषांचे रात्रीमधुन अवैधपणे विना परवानगी अनाधिकृतपणे पुतळे बसविण्याचे प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. प्रशासनाच्या संयमी भावनेचा गैर फायदा घेण्यात येत आहे. पण यापुढे अनाधिकृत पुतळा बसविण्याच्या प्रवृत्तीला कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे असा गंभीर इशार सुध्दा यावेळी दिला आहे.
 
 या बैठकीचे सुत्रसंचलन श्री. डॉ. विशाल नेहुल उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले असुन बैठकीस सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी ,प्रभारी अधिकारी, शाखा अधिकारी, यांचे सह 300 ते 350 जण उपस्थित होते.

तरुण युवा वर्गाने महाविकास आघाडीच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे

तरुण युवा वर्गाने महाविकास आघाडीच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -  विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे 

*युवासेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवक काँग्रेसच्या बैठकीत युवा पदाधिकाऱ्यांना आवाहन*

पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर, कार्यपद्धतीवर विशेष करून तरुण वर्ग फार आकर्षित होत आहे,  या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये साहेब काय बोलणार याकडे सर्व तरुण वर्गाचे लक्ष लागून आहे, त्यामुळे युवासेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवक काँग्रेस आपली जबाबदारी वाढली असून आपण तरुण वर्ग युवा - युवती या सभेसाठी कसे उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करायचे, यासाठी शहरातील सर्व महाविद्यालय, कोचिंग क्लासेस वसतीगृह या ठिकाणी भेटी देऊन सभेचे निमंत्रण द्या, शहरस्तरावर बैठका, कॉर्नर बैठका, वाहन रॅली काढून एक जबरदस्त वातावरण निर्मिती आपण संपूर्ण शहरामध्ये करा, दोन एप्रिलच्या या सभेस तरुण युवा - युवती सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केले.

२ एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या होणाऱ्या 'वज्रमुठ' सभेच्या पूर्वतयारीनिमित्त युवा सेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवक काँग्रेसची एकत्रित तयारीची आढावा बैठक आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या वेळी युवा सेना उपसचिव ऋषीकेश खैरे, जिल्हायुवा अधिकारी हनुमंत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मयुर सोनवने, युवक काँग्रेस अध्यक्ष सागर नागरे , ग्रामीण जिल्हा युवा अधिकारी मच्छिंद्र देवकर, शहर युवा अधिकारी सागर खरगे,आदित्य दहिवाल, रामेश्वर कोरडे, कय्युम शेख स्वप्निल डिडोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रकाश दुर्वे, सागर वाघचौरे, मनोज क्षीरसागर, सागर जत्री, अनिकेत खरात ,शेखर पोतदार, ज्ञानेश्वर मुळे, योगेश कोळेकर, दत्ता कणसे, गजानन राऊत, सागर राऊत, आकाश पोळ, शुभम साळवे, युवा काँग्रेस सचिव गौरव जयस्वाल, योगेश बहादुरे, शुभम टिचराळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आशुतोष सांगळे, विशाल विराळे, दादासाहेब पत्ते, दत्ता गाडे, शिवाजी खानापुरे, शुभम देशमुख, आदित्य रगडे, निकेत रेडे, शुभम खेत्रे, धम्मा साळवे, प्रशांत दळवी, रोहित चंचलानी, नितीन कीर्ती, साई बादशहा, अन्सारी, सुशील अंभोरे, प्रणित आगळे, कृष्णा फुंदे, कांता पाटील, अनिल सुरडकर, कय्युम शेख, सुनील मोठे, मयूर साठे, नितीन मानकापे, अजय रेड्डी, शुभम त्रिभुवन, ज्ञानेश्वर मुळे, योगेश कोळेकर, शिवप्रसाद कोल्हे आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवोदय कुणबी सेवा संघ शाखा : तळा -रोहा यांची वार्षिक सभा संपन्न !

नवोदय कुणबी सेवा संघ शाखा : तळा -रोहा यांची वार्षिक सभा संपन्न !

*कोकण : उदय दणदणे*

नवोदय कुणबी सेवा संघ संलग्न शाखा तालुका (तळा) रोहा यांची वार्षिक सभा रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी, मु.पढवन येथे प्रमुख मान्यवर व बहुसंख्य  कुणबी बांधव तसेच महिला यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

जनार्दन गणपत भौड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघाचे प्रमुख पदाधिकारी व सभासद नानासाहेब भौड, मनोहर जाधव, सहदेव घडशी, मंगेश शिगवण, दामोदर चव्हाण, दत्तात्रय शिगवण, पांडुरंग भेकरे, गणपत लोंढे, गणेश शिगवण तसेच पढवण गावातील पदाधिकारी अशोक सुर्वे, अशोक हुमणे, हिरामण कदम, रामचंद्र घाणेकर, नामदेव भौड,भावेश जाधव, देवजी कदम, पांडुरंग भौड यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणबी समाज बांधवांच्या ह्या महत्वपूर्ण सभेला सुरुवात करण्यात आली. 

उपस्थितांना समाज प्रबोधनपर मार्गदर्शन करताना संघाचे  अध्यक्ष जनार्दन भौड यांनी लग्न समारंभात दिला जाणारा कपड्याचा व भांड्यांचा आहेर तसेच दुःखद प्रसंगी खांद्यावर टाकले जाणारे कपडे या रूढीपरंपरेने चालत आलेल्या  परंपरा  पुन्हा एकदा बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. 

समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जेष्ठ समाजसेवक नाना भौड तसेच मनोहर जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नवतरुणांनी समाजाच्या विकासासाठी एकजूट होऊन काम करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन गोविंद भौड यांनी केला.समाजकार्यात सुशिक्षित तरुणांनी सहभाग घ्यावा यासाठी युवा पिढीने सज्ज व्हावे असे मत पढवन मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष हिरामण कदम यांनी व्यक्त केले.युवा कार्यकर्ते संदेश गवेकर यांनीही अल्पशा भाषणात उत्तम प्रबोधन केले.उपस्थित सर्व समाजबांधवानी आपण सारे एक संघटित असल्याचे व  समाजाप्रती समाजिक बांधिलकी जपण्याचा दृढ विश्वास व्यक्त केला.

सदर सभेचे सूत्रसंचालन - अमिश भौड व काशिनाथ कदम यांनी केले. उपस्थितांचे आभार व्यक्त करून समाजासाठी अश्याच प्रकारे एकत्र येऊन नवनवीन उपक्रम राबवून समाजाचा विकास साधावा असे आवाहन करून सभेची सांगता करण्यात आली.

नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री ना. संदीपान भुमरे यांच्या हस्ते !

नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री ना. संदीपान भुमरे यांच्या हस्ते !

सिल्लोड, अखलाख देशमुख‌, दि २९ : सिल्लोड येथील पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवास्थान इमारत बांधकामाचे भूमिपूजन तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या जवळपास 3 हजार लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप पालकमंत्री ना. संदीपान भुमरे व कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी रोहयोचे मुख्य सचिव श्री. नंदकुमार, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची प्रमुख उपस्थिती होती. आज मंगळवार ( दि.28 ) रोजी शहरातील नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

       यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, न.प. तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी श्री. आहिरे, मुख्याधिकारी सय्यद रफिक, डॉ. संजय जामकर, राजेंद्र ठोंबरे, रमेश साळवे, भाऊसाहेब तायडे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, दीपाली भवर, मेघा शाह, सुमानबाई तांगडे, नगरसेवक प्रशांत क्षीरसागर, राजू गौर , राजू बाबा काळे, मारुती वराडे आदींची उपस्थिती होती.

बँक सखीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी बँकांनी तत्परतेने कार्यवाही करावी - जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय !

बँक सखीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी बँकांनी तत्परतेने कार्यवाही करावी -    जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. २८ : ग्रामीण भागात बँक सखीच्या  माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी बँकांनी तत्परतेने कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय  बँक समितीच्या  बैठकीत जिल्हाधिकारी पाण्डेय बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रबंधक महेश डांगे, रिझर्व बँकेचे प्रादेशिक अधिकारी श्री कल्याणकर, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर, जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, जिल्हा अग्रणी बँकेचे अध्यक्ष मंगेश केदार, जिल्हा उद्योग केंद्रच्या करूणा खरात, स्टेट बँकेचे सुनील धामणकर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक गणेश कुलकर्णी, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व सर्व बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय म्हणाले, केंद्र  व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा. यासाठी बँक सखीच्या माध्यमातून नागरिकांना ग्रामीण भागात योजनेबाबत मार्गदर्शन आणि बँकेसंदर्भातील मदत उपलब्ध करून द्यावी, असेही जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले.  

कृषीवर आधारित योजनाबाबत लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला बँकांनी तात्काळ मंजुरी द्यावी. शेतकरी, महिला अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीय घटकाच्या विभागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेऊन त्रुटीची पूर्तता करावी व नागरिकांना गतीने लाभ मिळवून द्यावा. आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यात शासनाच्या योजनेच्या लाभाची रक्कम जमा होत आहे, आधार एनेबल  असणाऱ्या बँकेच्या खात्यातही शासनाच्या योजनाची रक्कम जमा होते ही रक्कम ज्या बँकांमध्ये प्रस्ताव सादर केलेले आहेत त्याच बँकांनी लाभार्थ्यांना मिळण्याबाबत कारवाई करावी. सर्व बँकेच्या शाखेमध्ये खात्याचे एनपीए होणाऱ्या खात्याचा पाठपुरावा घेऊन सविस्तर माहिती जिल्हा  प्रशासनाला सादर करावी. खातेदाराच्या सिबिलचा दर्जा वाढवण्यासाठी  प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले. 

प्रधानमंत्री किसान योजना, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना याचा तालुका व योजनानिहाय आढावा घेण्यात आला. 31 मार्च पर्यंत सर्व बँकांनी विविध योजनेच्या उर्वरित लक्ष्यांक पूर्ण करून अहवाल सादर करावा असे निर्देशही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिले.
उमेद अभियाना अंतर्गत ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या समूह बचतगटाच्या माध्यमातून बँक सखी आणि भिशी सखी यांच्या माध्यमातून बँकांनी आपली बँकिंग सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवावी. बँक, शासन आणि नागरिक यांच्या समन्वयाने नागरिकांना कर्जासारख्या विविध सुविधा बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात मदत होईल. सर्व बँकांनी बँक सखीची नियुक्ती करण्याचे निर्देशही  देण्यात आले. 
शासनाच्या विविध महामंडळाचे यात महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, इतर मागास व बहुजन कल्याण विकास महामंडळ अशा विविध महामंडळाच्या लक्ष्याकांची माहिती या बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे अध्यक्ष मंगेश केदार यांनी दिली. 

उमेदच्या बँक सखीशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधून  बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शिक्षण, महिला सक्षमीकरण व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास महत्त्वाचा सहभाग असल्याचे सांगत सुरू असलेल्या कामाबाबत  कौतुक केले.
 
जिल्ह्यात विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संबंधित बँकांचे प्रतिनिधी यांचे अभिनंदन केले.

प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योगात जिल्ह्याला देशात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी महाराष्ट्र ग्रामीण व्यवस्थापक मनाहेर वाडकर, एसबीआयचे शाखा व्यवस्थापक सतीशकुमार सिन्हा, एसबीआयचे शाखा व्यवस्थापक स्वामी भास्कर भोयर यांचे  अभिनंदन करण्यात आले. बँक सखी म्हणून काम करणाऱ्या विविध महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. विविध तालुक्यातील महिलांनी सहभाग नोंदविला. गंगासागर पडूळ लाडसांगवी ,गंगा बांबर्डे तालुका फुलंब्री, मंदाकिनी चव्हाण  यांनी आपले अनुभव बैठकीत सांगितले.

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !! ** आदित्य ठाकरे यांचा रॅलीत सहभाग, जितेंद्र आव्हाड व ...