Wednesday 29 March 2023

नवोदय कुणबी सेवा संघ शाखा : तळा -रोहा यांची वार्षिक सभा संपन्न !

नवोदय कुणबी सेवा संघ शाखा : तळा -रोहा यांची वार्षिक सभा संपन्न !

*कोकण : उदय दणदणे*

नवोदय कुणबी सेवा संघ संलग्न शाखा तालुका (तळा) रोहा यांची वार्षिक सभा रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी, मु.पढवन येथे प्रमुख मान्यवर व बहुसंख्य  कुणबी बांधव तसेच महिला यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

जनार्दन गणपत भौड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघाचे प्रमुख पदाधिकारी व सभासद नानासाहेब भौड, मनोहर जाधव, सहदेव घडशी, मंगेश शिगवण, दामोदर चव्हाण, दत्तात्रय शिगवण, पांडुरंग भेकरे, गणपत लोंढे, गणेश शिगवण तसेच पढवण गावातील पदाधिकारी अशोक सुर्वे, अशोक हुमणे, हिरामण कदम, रामचंद्र घाणेकर, नामदेव भौड,भावेश जाधव, देवजी कदम, पांडुरंग भौड यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणबी समाज बांधवांच्या ह्या महत्वपूर्ण सभेला सुरुवात करण्यात आली. 

उपस्थितांना समाज प्रबोधनपर मार्गदर्शन करताना संघाचे  अध्यक्ष जनार्दन भौड यांनी लग्न समारंभात दिला जाणारा कपड्याचा व भांड्यांचा आहेर तसेच दुःखद प्रसंगी खांद्यावर टाकले जाणारे कपडे या रूढीपरंपरेने चालत आलेल्या  परंपरा  पुन्हा एकदा बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. 

समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जेष्ठ समाजसेवक नाना भौड तसेच मनोहर जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नवतरुणांनी समाजाच्या विकासासाठी एकजूट होऊन काम करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन गोविंद भौड यांनी केला.समाजकार्यात सुशिक्षित तरुणांनी सहभाग घ्यावा यासाठी युवा पिढीने सज्ज व्हावे असे मत पढवन मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष हिरामण कदम यांनी व्यक्त केले.युवा कार्यकर्ते संदेश गवेकर यांनीही अल्पशा भाषणात उत्तम प्रबोधन केले.उपस्थित सर्व समाजबांधवानी आपण सारे एक संघटित असल्याचे व  समाजाप्रती समाजिक बांधिलकी जपण्याचा दृढ विश्वास व्यक्त केला.

सदर सभेचे सूत्रसंचालन - अमिश भौड व काशिनाथ कदम यांनी केले. उपस्थितांचे आभार व्यक्त करून समाजासाठी अश्याच प्रकारे एकत्र येऊन नवनवीन उपक्रम राबवून समाजाचा विकास साधावा असे आवाहन करून सभेची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

एम. बी. लॉ. असोसिएट तर्फे 'ॲड. विशाल राजे - निंबाळकर आणि ॲड. कामेश हरिश्चंद्र पाटील यांचा वाढदिवस "कमलधाम वृद्धाश्रमात साजरा**

एम. बी. लॉ. असोसिएट तर्फे 'ॲड. विशाल राजे - निंबाळकर आणि ॲड. कामेश हरिश्चंद्र पाटील यांचा वाढदिवस "कमलधाम वृद्धाश्रमात साजरा**  ...