Tuesday 31 May 2022

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी !!

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी !!


नवी दिल्ली, बातमीदार, दि. ३१ : प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज उभय महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 



कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात आमदार तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 


महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांना अभिवादन.... 

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांच्यासह कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर ! "महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली"

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर ! "महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश
यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली"


नवी दिल्‍ली, बातमीदार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण ६८५ उमेदवारांपैकी ६० हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारापैकी जवळपास १० टक्के महाराष्ट्रातून आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूस-या क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार या दोघी १३ व्या आणि ४४ व्या क्रमांक आहेत. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२१ च्या परिक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील ५ पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये प्रियंवदा म्हडाळकर  (१३) अंजली श्रोत्रीय (४४),  श्रध्दा गोमे (६०), शुभम अशोक भैसारे (९७), अंकित हिरडे (९८), आदित्य काकडे (१२९), शुभम भोसले (१४९), विनय कुमार गाडगे (१५१), ओंकार पवार (१९४), रामेश्वर सब्बनवाड (२०२), अक्षय वाखरे(२०३), अक्षय महाडिक (२१२), तन्मयी देसाई (२२४), अभिजीत पाटील (२२६), तन्मय काळे (२३०), विशाल खत्री (२३६), संचित गुप्ता (237), उत्कर्ष खंडाळ (२४३), मृदुल शिवहारे (२४७), इशान टिपणीस (२४८), प्रतीक मंत्री (२५२), सुयश कुमार सिंग (२६२), सोहम मांढरे(२६७), अश्विन राठोड़ (२६५), अर्शद मोहम्मद (२७६), सागर काळे (२८०), रोहन कदम (२९५), रणजित यादव (३१५) गजानन बाळे (३१९), वैभव काजळे (३२५), अभिजीत पठारे (३३३), राहूल देशमुख (३४९), सुम‍ित रामटेके (३५८), विनायक भोसले (३६६),आदित्य पटले (३७५), स्वप्न‍िल सिसळे (३९५), सायली म्हात्रे (३९८), हर्षल महाजन (४०८), शिवहर मोरे (४०९), चेतन पंढेरे (४१६), स्वप्न‍िल पवार (४१८), पंकज गुजर (४२३), अजिंक्य माने (४२४), ओंकार शिंदे (४३३), रोशन देशमुख (४५१), देवराज पाटील (४६२), अनिकेत कुलकर्णी (४९२), शिल्पा खानिकर (५०६), अस्मर धनविजय (५५८), नितीश डोमले(५५९), निरज पाटील (५६०), आकांक्षा तामगाडगे (५६२),आशिष पाटील (५६३), शुभम नगराळे (५६८), अमीत शिंदे (५७०), स्वप्न‍िल माने (५७८), प्रशांत डगळे (५८३), अभय सोनारकर (६२०), अश्विन गोलपकर (६२६), मानसी सोनवणे (६२७), अमोल आवटे (६७८), पुजा खेडकर (६७९). 

एक नजर निकालावर :-

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आली. जानेवारी २०२२ मध्ये मुख्य लेखी परिक्षा घेण्यात आली असून एप्रिल- मे २०२२ महिण्यात मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण ६८५ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –२४४, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) ७३, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – २०३, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – १०५, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ६० उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये २६ दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने १२६ उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- ६३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- २०,  इतर मागास वर्ग -३६, अनुसूचित जाती- ०७, अनुसूचित जमाती  - निरंक  उमेदवारांचा समावेश आहे.  

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू ....
भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -१८० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – ७२, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  १८ इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –४९, अनुसूचित जाती (एस.सी.) – २७, अनुसूचित जमाती (एस.टी.) – १४ जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – ३७ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – १४, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०४,  इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – १०, अनुसूचित जाती (एस.सी.) – ०६, अनुसूचित जमाती (एस.टी.) – ०३ जागा रिक्त आहेत. 
भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – २०० जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – ८३,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०,  इतर मागास प्रवर्गातून - ५१, अनुसूचित जाती प्रवर्गातून - २६, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – २०  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. 

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - २४२ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - १०३, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) २३, इतर मागास प्रवर्गातून - ६८, अनुसूचित जाती प्रवर्गातून - ३१ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –१७ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल. 

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – ९०  जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - ३६, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०८  उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - २५, अनुसूचित जाती प्रवर्गातून – १५ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ०६ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.  

८० उमेदवारांची निवड तात्पुरती  असेल.
अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. 
---------------------
टिप : काही नावे सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कानसे ग्रुपचा कलाकार "अनिल घवाळी" काळाच्या पडद्याआड "सखे शेजारी" ग्रुपच्या वतीने मुबंईत भावनिक वातावरणात शोकसभा संपन्न !

कानसे ग्रुपचा  कलाकार "अनिल घवाळी" काळाच्या पडद्याआड "सखे शेजारी" ग्रुपच्या वतीने मुबंईत भावनिक वातावरणात शोकसभा संपन्न !


निवोशी / गुहागर, उदय दणदणे :

_अनेक कलाकार मान्यवरांच्या उपस्थितीत अंधेरीत शोकसभा संपन्न._


दि. १४ मे २०२२ शनिवार रोजी पहाटे स्वर्गीय- अनिल घवाळी आणि त्यांचा मित्र स्वर्गीय- निलेश सकपाळ हे दोघे मुंबई ते महाड गावी बाईकवरून प्रवास करत असताना विक्रोळी गांधी नगर येथे बाईक आणि ट्रान्झिट मिक्सर ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यूमुखी पडले आणि त्यांच्या कुटुंबासहित संपूर्ण कलाक्षेत्रात शोककळा पसरली. नाटक नमन कला क्षेत्रातील हा एक उमदा, हौशी, हरहुन्नरी कलाकार असा अचानक जाण्याने रंगभूमीचा एक सेवक आपल्यातून हरपल्याची खंत कलाक्षेत्रात व्यक्त केली जात आहे.


      स्वर्गीय: अनिल घवाळी यांच्या परिवाराच्या दुःखात  सखे शेजारी ग्रुप सहभागी होऊन त्यांना आधार देत सखे शेजारी ग्रुप (मुंबई) वतीने त्याचबरोबर कानसे ग्रुप आणि कोकण टॉकीज समूहाच्या सहकार्याने  दिनांक ३० मे २०२२ सोमवार रोजी बालविकास शिक्षण संस्था अंधेरी-पूर्व मुबंई  येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. 


       शोकसभेची सुरुवात स्वर्गीय अनिल घवाळी यांचे प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तद्नंतर उपस्थित जनसमूहातून अनेकांनी शोकसभा चिंतनपर श्रद्धांजली अर्पण करून आपल्या मनोगतातून स्वर्गीय अनिल घवाळी यांच्या आठवणीनां उजाळा दिला. अनेकांच्या नयनी अश्रू मनी कंट दाटून आला. 
       साई श्रद्धा कलापथक- मुबंई कानसे ग्रुप मधील एक स्मितहास्य, हुन्नरी कलाकार कलाक्षेत्रातील सर्वांचे लाडके भावोजी देवाने हिरावून घेतले. स्व.अनिल घवाळी ( भावोजी ) यांच्या अचानक जाण्याणे कानसे ग्रुपमध्ये पडलेली पोकळी कधीच भरून न येणारी आहे. स्वगिॅय-अनिल घवाली तालुका/ जिल्हा -रत्नागिरी गाव - उंडी 
कानसे ग्रुप मध्ये सक्रीय सहभाग घेऊन नमननाट्य निर्माते- लेखक दिग्दर्शक - संदिप कानसे यांच्या 
मार्गदर्शनाखाली नमननाट्य कलाकृतीतून अभिनय करत 
२००४ साली रंगमंचावर पदार्पण केला होता. पहिला प्रयोग "बळीचा अंत", "शेर गर्जाला चंबळखोरीचा ", रंगला सैतानी फास", "बंदुप्रेम", "जागा हो मराठ्या", "रत्तात रंगली राजगादी", "हिंदुस्थान जिंदाबाद", "हरहर महादेव", आणि शेवटच्या आठवणीतला यावर्षी चा वगनाट्य "चित्ता फाडला जावळीचा" , ..अशा वगनाट्यात भाग घेतला होता, स्व .अनिल घवाळी यांचा कलाक्षेत्रातील वावर पाहता त्यांचा चाहतावर्ग मित्रपरिवार खूप मोठा आहे. 
        सदर शोकसभेला त्यांचे कुटुंबीय भाऊ ,मेहुणे, मुलगा तसेच कलाक्षेत्रातील नामवंत शाहीर  -दिलीप नामे, दामोदर गोरीवले, चंद्रकांत साळवी, रमाकांत जावळे, अमोल भातडे, नितीन मास्कर, संदेश पालकर, सुभाष बांबरकर, सुशीला जावळे, तसेच शिवन्याताई  मांडवकर, विजय साळवी, राकेश जिमन, तसेच कानसे ग्रुपचे सर्वेसर्वा - लेखक /दिग्दर्शक- संदिप कानसे,  सुधाकर मास्कर- सचिव (नमन लोककला संस्था -भारत) उदय दणदणे - सदस्य (नमन लोककला संस्था -भारत ) समीर बलेकर आदी कलाकार, कवी , लेखक, आयोजक मंडळी उपस्थित होती.

मैत्रकुलच्या संकल्प मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद !! "जागा घेण्यासाठी मदत करण्याचे मैत्रकुल संस्थापक किशोर जगताप यांचे आवाहन" *मैत्रकुल माझ्यासाठी मंदिर आहे*, उद्योजक संतोष जाधव यांचे प्रतिपादन...

मैत्रकुलच्या संकल्प मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद !! "जागा घेण्यासाठी मदत करण्याचे मैत्रकुल संस्थापक किशोर जगताप यांचे आवाहन"

*मैत्रकुल माझ्यासाठी मंदिर आहे*, उद्योजक संतोष जाधव यांचे प्रतिपादन...


कल्याण, संदीप शेंडगे : बापगाव येथे भरविण्यात आलेल्या मैत्रीकुलच्या पाचव्या संकल्प मेळाव्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली. कल्याण मधील एकही मुलगा व्यसनाधीन होवू नये या करीता किशोरदादा गणाई व मैत्रकुल अट्टाहासाने कल्याण मध्ये काम करीत आहेत. 

मैत्रकुलने कल्याण मधील काही मुलांचे जगणे तर बदलले पण कल्याणच्या नावाचा करिश्मा वाढवायला मैत्रकुलची मदत झाली असे कार्यक्रमाच्या उद्घाटनीय भाषणात माजी नगरसेवक व कल्याण विकासिनीचे अध्यक्ष उदय रसाळ यांनी व्यक्त केले व मैत्रकुलच्या हक्काच्या जागेसाठी पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावेन असे गौरवोद्गार काढताच उपस्थितानी टाळ्यांचा कडकडाट केला. 

छात्रशक्ती संचालित मैत्रकुल या आधुनिक गुरुकुलास पाच वर्ष झाल्या निमीत्त बापगाव, कल्याण-भिवंडी येथे 29 मे या दिवशी "संकल्प मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले, त्यास अनेक मैत्रकुल प्रेमींनी हजेरी लावली होती. त्यावेळी संस्थापक "किशोरदा गणाई (जगताप )" यांनी या वर्षात स्वतःच्या हक्काच्या जागेत जाण्याचा संकल्प जाहिर करताच मैत्रकुल प्रेमींनी त्यास जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला व अनेकांनी मैत्रकुलदुत म्हणून निधी उभी करण्यासाठी तन मन धनाने काम करण्याचे आश्वासन दिले. पाच हजार लोकांनी एकदाच दोन हजार रुपये दिल्यास एक कोटी रुपये उभे राहतील व स्वतःची जागा घेण्यासोबत बांधकामही आपण एका वर्षात उभे करू. किशोरदा गणाई यांचा हा विश्वास आपण प्रत्यक्षात आणू ही खात्री अनेकांनी या निमीत्त आपल्या भाषणात दिली.

आजवर मी फक्त धार्मिक ठिकाणीच मदत करत होतो पण आजपासून सदैव पॉजिटीव एनर्जी देणाऱ्या मैत्रकुलला मी प्रायोरीटीने मदत देणार असे सांगून मैत्रकुलसाठी पन्नास हजारांची देणगी प्रसिद्ध उद्योजक संतोष जाधव यांनी जाहीर केले .
  
"प्रबोधनात्मक गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली व  पुढे मैत्रकूल च्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य मैत्रकूल मुळे कसे घडले व बदलले याची ग्वाही दिली तसेच असंख्य हितचिंतकांनी मैत्रकूल बद्दल भरभरून भाष्य केले अशी माहिती कार्यक्रम प्रमुख श्रेया निकाळजे यांनी दिली. 

गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी गुरुकुल पध्दतीने सुरू झालेले मैत्रकूल बघता बघता ०५ वर्षाचे झाले. मैत्रकूल "जीवन विकास केंद्र" ही अत्यंत आगळीवेगळी संकल्पना अनेक वर्षे वस्तीतील मुलांच्या शिक्षणासाठी बागशाळा चालवणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते "किशोर जगताप" यांच्या द्वारे १० मे २०१७ रोजी  सुरू झाली. मैत्रकूल ने  असंख्य गोरगरीब, होतकरू, ध्येयवादी विद्यार्थ्यांना एका अर्थाने विद्येच्या, मायेच्या, माणुसकीच्या सावलीखाली मोठं केलं आहे करत आहे आणि करत राहील. अशी माहिती ॲड. पूजा बडेकर यांनी दिली. 

एकेकाळी एक टोप, वाटी, चमचा, ताट घेऊन कल्याण मधील बापगाव येथील गायकर कंपाऊंड मध्ये ह्या प्रकल्पाची सुरुवात झाली. सुरुवातीला १५ मग ३० नंतर ५६ विद्यार्थी आणि बघता बघता कल्याण, पुणे, रायगड, सातारा अश्या विविध ठिकाणी मैत्रकूल च्या शाखा सामाजिक भान असलेल्या माणुसकी जपणाऱ्या अनेक लोकांनी आपली जागा काही वर्षाच्या करारावर देऊन  इथे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उभे राहत आहे अशी माहिती छात्रशक्ती खजिनदार विजेता भोनकर यांनी दिली. 

मैत्रकूल कडे स्वतःची जागा नसल्यामुळे वाचनालय, प्रयोगशाळा, स्टुडिओ, क्रिएटिव्ह झोन, टॉय लायब्ररी, मैदान अश्या विविध गोष्टी उभारता येत नाहीत. आज असंख्य विद्यार्थ्यांना इच्छा असूनही मैत्रकूलला आणता येत नाही कारण जागा लहान आहे. पण आम्हाला विश्वास आहे जर आपण सर्वांनी मोठ्या मनाने मदत केली तर हे सर्व शक्य आहे. अशी आशा छात्रशक्ती सेक्रेटरी स्मिता साळुंखे यांनी व्यक्त केली. 

मैत्रकूल च्या विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने  विविध क्रिएटिव्ह सेल्फी पॉईंट, रांगोळी बनवून तसेच गाणी, गीत व नृत्यांनी कार्यक्रम हसत खेळत पार पाडले.. अशी माहिती मैत्रकूल उपप्रमुख संचालिका मंजिरी धुरी यांनी दिली व मैत्रकुलला एकदाच दोन हजार रुपयांची मदत करण्याचे आवाहन केले या मोळाव्याच्या निमित्ताने ७,५०,००० रुपये जमा झाल्याचे घोषणा करताच मैत्रकुलच्या नावाने जोरदार घोषणा देण्यात आल्या.

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय सहसंघटक पदी दिपक मांडवकर यांची निवड !!

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय सहसंघटक पदी दिपक मांडवकर यांची निवड !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

       महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असलेल्या लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पद नियुक्ती दरम्यान सहसंघटक पदी श्री. दिपक मांडवकर यांची निवड झाली. बालपणापासून अन्यायाच्या विरोधात उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी उभे ठाकलेले दिपक मांडवकर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका येथील खानवली गावचे सुपुत्र आहेत. अगदी गरीब परिस्थितीत आपले शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबईतील धगधगत्या जीवनाचे निखारे शेवटी चटके देत असताना जनसेवेचे वसा उराशी बाळगून गेले वीस वर्षे मुंबईत विविध प्रकारच्या गरजूनच्या अडचणी साठी व नागरिकांना, प्रसंगी समाज बांधवांना प्रत्येक वेळी अनमोल अशी साथ देत आहेत. विविध वर्तमान पत्रात वृत्त लेखन व सामाजिक अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून दिला व सामाजिक बांधिलकी जपली. अनाथ मुले व वृद्धाना विविध पध्दतीने सहकार्य केले. मुंबई ते केंद्रीय सदस्य पदभार सांभाळत असताना विविध संघटना स्थापन करून कार्य करत आहेत. अंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना ते ग्लोगल पीस कोन्सिल भारतीय महाक्रांती सेना, माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना, महाराष्ट्र सुपर फास्ट न्युज, जन पहारा वृतपत्र, कुणबी समाजोन्नती संघ, सांस्कृतिक कला क्रीडा, सामाजिक संघटना, रेल्वे प्रवाशी मंडळे, साई एकदंत रहिवासी सेवा संघ अंतर्गत तेवीस इमारती ते सामाजिक क्षेत्रात सर्वात पुढे येऊन गरजूना अधिकार मिळवून दिला आहे. या कामाची दाखल घेऊन विविध मंडळ, संघटना, प्रसारमाध्यमे, संस्था यांनी मांडवकर यांना विविध पुरस्कार, कोरोना योद्धा सन्मानपत्रने सन्मानित केले आहे आणि याच गतीच्या बळावर आज विविध क्षेत्रात ते  परीचीत आहेत. आज ३१ मे २०२२ रोजी त्यांची लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय सहसंघटक पदी निवड झाली. ही निवड झाल्याने यांचे संपूर्ण श्रेय आई बाबा व पत्नी आणि गुरुजनांना अर्पण करून मिळालेल्या पदाचा योग्य वापर करून लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या मा. अध्यक्ष सचिनजी बोंबले यांचे व पदाधिकारी मंडळींचे आभार मानले. जनसेवेला पुनच्छ नव्याने प्रारंभ करून माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे सोनं करून आवश्यक ती मदत करण्यासाठी मी सदैव तयार असेन असे श्री. दीपक तुकाराम मांडवकर यांनी मत व्यक्त केले. श्री. दीपक मांडवकर यांचे विविध संस्था, संघटना, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष पदाधिकारी आणि मुंबई, उपनगर तसेच ग्रामीण भागातून अनेकांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

संदीप माळी व काषिनाथ पाटील यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे कॉंक्रीटीरण !!

संदीप माळी व काषिनाथ पाटील यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे कॉंक्रीटीरण !!


डोंबिवली, वैष्णवी माळी : लोढा हेरिटेज येथील चंदेष पार्क को-ऑप-हौ. सोसायटीच्या मोकळया जागेत समाजसेवक व भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संदीप माळी तसेच काटईचे माजी सरपंच काषीनाथ पाटील यांच्या पुढाकार व प्रयत्नातून कॉंक्रीटीकरण करण्यात आले. नागरिकांना पावसाळयात होणारा त्रास दूर व्हावा यासाठीही स्वखर्चाने संदीप माळी व काषिनाथ पाटील यांनी सदर काम करण्याचा निर्णय घेतला.भाजपा व मनसे या दोन्ही पक्षांनी एकत्र येवून या रहिवाषांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण व मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्षनाखाली व भाजपाचे ग्रामीण अध्यक्ष नंदू परब यांच्या सहकार्याने येथील रहिवाषांच्या समस्या सोडवण्यासाठी संदीप माळी, सचिन म्हात्रे व काषिनाथ पाटील व अन्य मान्यवर पदाधिकारी एकत्र आले असल्याचे यावेळी संदीप माळी यांनी सांगितले.
सदर प्रसंगी भाजप ग्रामीणचे अध्यक्ष नंदू परब, काटईचे माजी सरपंच काषिनाथ पाटील तसेच अमर माळी, डोंबिवली ग्रामीण व परिवहन सदस्य प्रसाद माळी यांच्यासह सोसायटीचे उपाध्यक्ष सचिन म्हात्रे, रमेष वाघेला, रामकुमार कुसाळकर, दत्ता फाटे, राजेष सोनावणे, महादेव कावळे, सागर पाटील, अनंता नाईक, नम्रता साफळे, व अन्य मान्यवर उपस्थित होते. येथील सर्व रहिवाशांनी त्यांचे आभार मानले.

पक्ष बाजूला ठेवून नागरिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी आम्ही असेच प्रयत्न करु व सोडवू असा विष्वास यावेळी संदीप माळी यांनी यावेळी व्यक्त केला.

मुरबाड पोलिसांची सर्व क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी !! **बेकायदेशीर दारू हातभट्टी विरुद्ध समूळ नष्ठ अभियांन जोरात **

मुरबाड पोलिसांची सर्व क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी !! **बेकायदेशीर दारू हातभट्टी विरुद्ध समूळ नष्ठ अभियांन जोरात **


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कायद्याचे रक्षक असणाऱ्या पोलिसांनी कंबर कसली असुन, मुरबाड पोलिसांनी गेल्या ८/९ महिन्या पासून मुरबाड शहरात "रिंग राउंड, गस्त अमलात आणून अनेक चोरीचे, घरफ़ोडी चे गुन्हे उघडकीस आणले
    तसेच बँग कटिंग करून चोरी करणारी गँग पकडली. कल्यांण तालुका, मुरबाड, टोकावडे, किन्हवली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेले गुन्हे उघडकीस आणून आरोपींना कोर्टात हजर करून मा. न्यायालयात सुनावणीत आरोपींना शिक्षा झाली.
     गावपातळीवर पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्राम सुरक्षा रक्षक दल निर्माण करून रात्री गस्त चालू केली.
      ह्या सर्वांचा परिणाम प्रभावी गुन्हे प्रतिबंध होऊन रात्रीचे गुन्हे चोरी, घरफ़ोडी, मारामारी, महिलांची छेडखाणी असे गुन्हे बंदच झाले आहेत.
       मुरबाड पोलिसांच्या ह्या उत्तम कामगिरी मुळे मुरबाड नागरिक, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते पोलिसांचे कौतुक करत आहेत व त्यांना समर्थन देत आहेत.
       आता परत मुरबाड पोलीस स्टेशनकडून दारूभट्टी भस्म अभियांन राबवण्यात येत आहे त्यात नारिवली/ उचले जंगल, कोरावळे, खाटेघर परिसरातील बेकायदेशीर दारू हातभट्टी विरोधात तूफ़ान कायदेशीर कारवाई करून भट्ट्या नष्ठ करून गुन्हे दाखल करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्या मुळे दारू भट्टी चालवणाऱ्या मध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे व पळती भूमी कमी झाली आहे.
     मुरबाड पो. स्टे .कडून करण्यात येणाऱ्या हातभट्टी दारू विरुद्ध च्या कारवाईचे महिला वर्गा कडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे व पोलिसांना दारूभट्टी व दारू विक्रेत्यांची माहिती पूरवत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या ह्या कारवाईला लोकसहभाग प्राप्त झाले आहे. परिणामी दारू भट्टी समूळ नष्ठ अभियांनास मोठे यश मिळत आहे व मुरबाड पोलिसांचे कौतुक होत आहे.


        बेकायदेशीर दारूभट्टी अभियान मध्ये कारवाई करणाऱ्य सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
        सदर कारवाई मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो.नि. प्रसाद पांढरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक निंबाळकर, पो. उप.नि. कदम, पो.हवा. निचिते, कैलास पाटील, चतूरे,भोसले यांच्या संपूर्ण टिमने अतिशय मेहनत घेतली. सोबत 1500 लिटर रसायन उद्ध्वस्त केले.

यूपीएससी परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावचा चेतन पंदेरे चमकला !!

यूपीएससी परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावचा चेतन पंदेरे चमकला !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
          नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून रत्नागिरी जिल्हामधील संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावाचे चेतन पंदेरे आयपीएस अधिकारी झाले आहेत.संगमेश्वर तालुक्यातील वांझोळेसारख्या खेडेगावातून पुढे येऊन शिक्षण घेतलेल्या चेतन पंदेरे यांनीही युपीएसी परीक्षेत ४१६ वी रँक घेत बाजी मारली आहे. युपीएससीमधून ते आयपीएस अधिकारी झाले असून त्यांच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे.चेतन पंदेरे यांचे वडील नितीन सीताराम पंदेरे हे रत्नागिरी पोलीस खात्यात सेवेत सहाय्य्क पोलीस निरीक्षक आहेत.चेतन पंदेरे यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरीतील कॉन्हेन्ट स्कूलमध्ये घेतले. त्यांनतर गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.पुढे मुंबईतील आयसीसी कॉलेजमधून केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्याने रोज दिवसातून १० ते ११ तास अभ्यास केल्याने हे यश प्राप्त केले आहे. ४ वर्ष मेहनत घेत चेतन पंदेरे हे वयाच्या २५ व्या वर्षी आयपीएस अधिकारी झाले आहेत.त्यांच्या या यशामुळे त्याचे व त्याचे आईवडील श्री.व सौ. पंदेरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कृश्णा पाटील व रसिका पाटील यांच्या माध्यमातून मोफत पियूसी शिबिर संपन्न !!

कृश्णा पाटील व रसिका पाटील यांच्या माध्यमातून मोफत पियूसी शिबिर संपन्न !!


कल्याण, वैष्णवी माळी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाजपा युवा मोर्चा डोंबिवली पश्चिम मंडळाचे अध्यक्ष कृष्णा बाळाराम पाटील व समाजसेविका रसिका कृष्णा पाटील यांनी दिनांक 29 मे रोजी अस्तित्व प्रतिष्ठान नेमाडे गल्ली, जुनी डोंबिवली रिक्षा स्टँड क्रमांक 2 येथे सर्व प्रकारच्या पेट्रोल, सीएनजी, एलपीजी आणि डिझेल वाहणांसाठी मोफत पीयुसी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी टू व्हीलर, फोर व्हीलर, रिक्षा अशा सर्व गाडयांनी मोफत पियुसी शिबिराचा लाभ घेतला. 900 हून अध्िक गाडयांना पियुसी देण्यात आली आहे. आपले लाडके आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या मोफत पीयूसी शिबिराचे आयोजन करत आहोत कृष्णा पाटील यांनी कोरोना काळातही नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा अन्नधान्य, सॅनिटायझर, हॉस्पिटलमध्ये नागरिकांना वेळ उपलब्ध करून देण्यापासून अशा अनेक मदत केली आहे.
नागरिकांच्या कोणतीही समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. यावेळी युवा मोर्चा डोंबिवली मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील समाजसेविका रसिका पाटील समीर सुर्वे सपना सुर्वे आणि सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी आलेल्या वाहनचालकाने कृष्णा पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Monday 30 May 2022

पूरग्रस्त भवानीनगर येथील मुख्य नाल्याची दुरवस्था ! "कंत्राटदारांचा हातचलाखी की हलगर्जीपणा"

पूरग्रस्त भवानीनगर येथील मुख्य नाल्याची दुरवस्था ! "कंत्राटदारांचा हातचलाखी की हलगर्जीपणा"


कल्याण, बातमीदार : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ३१ मे पर्यंत सर्व नालेसफाई चे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदार व संबंधित विभागाला दिले आहेत, तरी प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून आपल्या विभागातील कंत्राटदार व संबंधित अधिकारी कसे काम करत आहेत याची जबाबदारी त्यांच्यावर असते.


कल्याण पश्चिम येथील भवानीनगर आधीच पूरग्रस्त विभाग म्हणून ओळखला जातो. येथील कंत्राटदारांकडून नालेसफाई मधे हलगर्जीपणा करण्यात आला आहे, भवानीनगर येथील मुख्य नाल्याची काय साफसफाई करण्यात आली हे वरील फोटो वरून दिसत आहे. हा हलगर्जीपणा  नुसता प्रभागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण करत नसून या मुळे रोगराई सुध्दा पसरत असते. तरी प्रभागाचे प्रमुख म्हणून प्रभाग क्षेत्र अधिकारी (सहायक आयुक्त) यांनी याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे, व संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी प्रभागातील नागरिक करत आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्नावर किसान सभा एल्गार पुकारणार *राज्य अधिवेशनात जळगाव जिल्ह्याचा भरीव सहभाग*

शेतकऱ्यांचे प्रश्नावर किसान सभा एल्गार पुकारणार *राज्य अधिवेशनात जळगाव जिल्ह्याचा भरीव सहभाग* 


चोपडा, बातमीदार..  अखिल भारतीय किसान सभाचे ३० वे राज्य अधिवेशन २८/२९ मे रोजी शिरपुरला '२८ जिल्ह्यांतील २३८ प्रतिनिधींच्या' भरभक्कम भागीदारीत पार पडले. 


अधिवेशनाची सुरुवात २८ मे ला प्रचंड रॅली नंतर न भूतो अशी जाहीर सभा झाली. नंतर स्मिता पाटील टाऊन हॉल (कॉ. नामदेव गावडे सभागृह) मध्ये दीड दिवस शेतकऱ्यांची गत काळातील आंदोलने प्रश्नांवर चर्चा झाली २९ मे रोजी दुपारी ३ वाजता अधिवेशनाचा प्रेरणादायक समारोप झाला. 



किसान सभेचे राष्ट्रीय सचिव कॉ. अतुलकुमार अंजान, भाकप राष्ट्रीय सचिव कॉ. भालचंद्र कांगो, राज्य सचिव तुकारामजी भस्मे यांनी मार्गदर्शन केले. २२ मागण्यांचे ठराव करण्यात येऊन ७ जून पासून संघर्ष करण्याचा निर्णय घेणे आला रॅलीसाठी जळगाव जिल्ह्यातून विशेषतः चोपडा, जळगाव, अमळनेर, एरंडोल, यावल, चाळीसगाव या तालुक्यातून १५ प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी दौलत पाटील, सल्लागार अमृत महाजन, लक्ष्मण शिंदे,  दिलीप महाजन, गंभीर महाजन, एकनाथ महाजन, रमेश पाटील, काळू कोळी, कॉ. एरंडे या सक्रिय प्रतिनिधींचा समावेश होता या अधिवेशनाला शेतकऱ्यांनी चांगला आर्थिक सहभाग ही दिला. 


राज्याच्या किसान सभेचा ठसा बऱ्यापैकी उमटला.. या अधिवेशनात ८७ शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी यांची कार्यकारिणी निवडण्यात आली राज्य अध्यक्ष कॉम्रेड ॲड.  हिरालाल परदेशी, धुळे व सचिव राजन क्षीरसागर परभणी यांचे नेतृत्वात ही कार्यकारिणी काम करणार आहे. तीत जळगाव जिल्ह्यातून दिलीप चौधरी विखरन, ता. एरंडोल यांना संधी मिळाली या अधिवेशनात खालील ठराव पास करण्यात आले :- १) शेती मालाला किमान पूरक हमी भाव ध्या, २) वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांची पिकाची नासाडी थांबवणेसाठी वनखात्याने उपाय योजना करावी काटेरी कुंपण उभारावे नुकसानीची एकरी ५०००₹ भरपाई द्यावी. ३) चोर्टकी धरणाची उंची वाढवावी. ४) जळगाव जिल्ह्यातील कांदा खरेदी साठी नाफेड चे केंद्र उभारावे. ५) सोयाबीन ला १०००₹भाव ध्या ६) शेतकऱ्यांना खाते बी बियाणे औषधी साहित्य खरेदी जी एस टी मुक्त करा, ७) पेट्रोल डिझेल दर जी एस टी कक्षेत घ्या ८) आदिवासींचे वणपत्ते नावे करा ९) उसाला ४०००₹ एफआरपी दर द्या, १०) केळीला बोर्डा प्रमाणे भाव द्या ११) कांद्याला २५००₹ क्विंटल प्रमाणे भाव द्या १२) शेतकरी असंघटित कामगार यांना १००००₹ पेन्शन सन्मान धन द्या आदीं ठरावांचा समावेश आहे.


बुलडाणा येथे रोजगार मेळाव्याचे 31 मे रोजी आयोजन ! "200 पदांसाठी होणार भरती"

बुलडाणा येथे रोजगार मेळाव्याचे 31 मे रोजी आयोजन ! "200 पदांसाठी होणार भरती"


बुलडाणा, बातमीदार, दि. 30 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. त्यानुसार सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार, दि. 31 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता स्कील पॅरामेडीकल कॉलेज, वेदीका बिल्डींग, वानखेडे ले आऊट, डॉ. मेहेत्रे हॉस्पीटल जवळ, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.

      बेरोजगार उमेदवारांना ग्रामीण व दुरक्षेत्रातील मेळाव्याबाबत माहिती होवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्याला उमेदवारांनी उपस्थित राहण्यासाठी अवश्यक कागदपत्र सेवायोजन कार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, 2 पासपार्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या मेळाव्यात महिंद्रा अँण्ड महिंद्रा लि. चाकण पुणे, बजाज इलेक्ट्रीकल लि. चाकण पुणे कंपन्या 200 पदांसाठी भरती करणार आहे. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10, 12 वी, आयटीआय, पदविका, पदवीधर असावा.  काही अडचण असल्यास दुरध्वनी क्र. 07262-242342 वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार दिलाय - जयंत पाटील

आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार दिलाय - जयंत पाटील 


मुंबई, आजाद श्रीवास्तव, दि. ३० मे - भाजपला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.


आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.


उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले.

साहित्य प्रचार - प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्वाचे : 'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी'

साहित्य प्रचार - प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्वाचे : 'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी'


मुंबई, आजाद श्रीवास्तव : पुस्तक समीक्षक आरस्याचे काम करतात. पुस्तक परीक्षणामुळे वाचकांची संख्या वाढते तसेच लेखकाला देखील लिखाणातील त्रुटी दिसून येते. परीक्षणा अभावी चांगली पुस्तके देखील दुर्लक्षित राहतात. त्यामुळे साहित्य प्रचार - प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. 


मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागातील वरिष्ठ प्राध्यापक करुणाशंकर उपाध्याय लिखित 'कथा साहित्य का पुनर्पाठ' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २९) राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 


अकॅडेमिस्तान, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आयोजित प्रकाशन सोहळ्याला समाज सेविका सुमिता सुमन सिंह, अकॅडेमिस्तानचे संस्थापक दीपक मुकादम, वीरेंद्र  याज्ञिक व ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.


मराठी, हिंदी, बंगाली यांसह भारतीय भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस साहित्य कृती निर्माण झाल्या आहेत. मराठी वृत्तपत्रे पुस्तक साहित्य परीक्षणाला विशेष महत्व देतात. अनेक महिला समीक्षक देखील मराठी वृत्तपत्रांमध्ये पुस्तक परीक्षणे लिहिताना दिसतात. त्या तुलनेत हिंदी वृत्तपत्रांमध्ये पुस्तक परीक्षणे कमी असतात असे मत नोंदवताना परीक्षणामुळे वाचकांमध्ये पुस्तक वाचनाची इच्छा जागृत होते असे राज्यपालांनी सांगितले. नुकताच गीतांजली श्री यांच्या 'रेत समाधी' या कादंबरीला साहित्य जगतातील प्रतिष्ठेचे बुकर पारितोषिक  मिळाले हा सर्व भारतीय भाषांचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी सांगितले. .


भारतात शास्त्रीय तसेच साहित्यिक समीक्षा - मीमांसेची एक मोठी परंपरा है. समीक्षक व टीकाकारांमुळेच साहित्य कृतींकडे वाचक व समाजाचे लक्ष जाते. समीक्षक लेखकाच्या साहित्यातील सारगर्भित अर्थ दर्शवतो, असे सांगताना 'कथा साहित्य का पुनर्पाठ' नेमके हेच कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  

भारतात उच्च कोटीचे साहित्य निर्माण होते. परंतु त्याची आंतर राष्ट्रीय पातळीवर समीक्षा होत नाही. भारतीय भाषांमधील पुस्तकांचा वेळेवर इंग्रजी भाषेत अनुवाद झाला तर आपल्या अनेक साहित्य कृतींना नोबेल पारितोषिक मिळेल असे मत लेखक डॉ करुणाशंकर उपाध्याय यांनी व्यक्त केले. 

देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना लिहिलेल्या या पुस्तकात सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर सुरु झालेल्या हिंदी पुनर्जागरणापासून समकालीन लेखक व कादंबरीकार यांच्या लिखाणाचे विश्लेषण करण्यात आले आहे, असे उपाध्याय यांनी सांगितले.

थकीत वेतनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी एक जून पासून काम बंद आंदोलन करणार !

थकीत वेतनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी एक जून पासून काम बंद आंदोलन करणार ! 


चोपडा, बातमीदार.., महाराष्ट्र सरकार तर्फे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 50% ते 100% पगाराचे अनुदान दरमहा मिळते ते मार्च 2022 पासून मिळालेले नाही. दुसरीकडे ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील वेतनाचा हिस्सा व राहणीमान भत्ता देतच नाही, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम भरतच नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार होत असून पगार संबंधित ग्राम पंचायत कर्मचारी महासंघाकडे वारंवार विचारणा करीत असतात. त्याचप्रमाणे मार्च 2021 ते मार्च 2022  काळातील फंडाचा हिशोब रक्कमा कर्मचाऱ्यांचे खाती पडलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नुकसानही होत आहे. महाराष्ट्र शासनाने 10 ऑगस्ट 2020 पासून जाहीर केलेली पगारवाढ तिच्यासाठी सुद्धा केलेली नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी covid-19 काळात जीव धोक्यात घालून अर्धवट पगारावर काम केले अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकार व ग्रामपंचायती पगारासाठी तरसवत आहेत ही बाब स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारला त्याच बरोबर जळगाव जिल्हा परिषदे ला लाजिरवाणी आहे. असे आम्हाला वाटते त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठा असंतोष असून कर्मचाऱ्यांना सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 31 मे 2022 पर्यंत पगार न मिळाल्यास एक जून 2022 पासून ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारतील ग्रामपंचायतीच्या कामांवर बहिष्कार टाकतील असा इशारा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव अमृतराव महाजन जिल्हाध्यक्ष संतोष खरे यांनी दिला आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेत मा. सह आयुक्त यांनी अधिकारी, कर्मचारी व मुंबईकरांना दिली तंबाखूमुक्तीची शपथ - "तंबाखूला नाही म्हणा" !!

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेत मा. सह आयुक्त यांनी अधिकारी, कर्मचारी व  मुंबईकरांना दिली तंबाखूमुक्तीची शपथ - "तंबाखूला नाही म्हणा" !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         "जागतिक तंबाखू विरोधी दिन" निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य समिती, कामगार विभाग व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ३० मे २०२२ रोजी या प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मा. मिलिन सावंत, सह आयुक्त, सामान्य प्रशासन, कामगार विभाग व मा. सहदेव मोहिते, प्रमुख कामगार अधिकारी यांच्या हस्ते सदर भव्य व्यसनमुक्ती पोस्टर्स प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. 


याप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त, सामान्य प्रशासन कामगार विभाग यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबईकरांना संदेश दिला की, 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन या दिवसाचे महत्त्व आज मोठ्या स्वरुपात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की, जर तंबाखूचे व्यसन थांबविले नाही तर सन 2020 ते 2030 पर्यंत जगातील सुमारे शंभर कोटी लोक तंबाखू पासून होणाऱ्या रोगांमुळे मृत्यू पावतील. त्यामध्ये 20 ते 30 वर्षे वयोगटातील 40 टक्के लोक असू शकतात. हा तंबाखूचा अतिरेकी हल्ला नाही का ? म्हणून या आयोजनात सर्वांनी सहभागी होऊन स्वतःला तंबाखू पासून दूर ठेवण्याची शपथ उपस्थित आधिकारी व कर्मचारी यांना व्यसनमुक्तीची शपथ त्यांनी दिली.


या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मुंबई तंबाखूमुक्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य समिती यांच्याद्वारे 31 मे पासून मुंबईत मोठ्या प्रमाणात तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात येत असून यासाठी मुंबईतील सर्व महानगरपालिकेमध्ये याच प्रकारची सामूहिक तंबाखू मुक्तीची शपथ अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येऊन तंबाखू मुक्त जीवन जगण्याचा संकल्प करण्यात येणार असल्याचे सांगितले. 


महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी 2011साली व्यसनमुक्तीचे धोरण बनवले आहे. 2020 महाराष्ट्र राज्याचे साठावे वर्ष आहे. महानगरपालिका तसेच महाराष्ट्र सरकारने या निमित्ताने व्यसनमुक्त महाराष्ट्र च्या दिशेने पाऊल उचलावे असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले. तसेच येणाऱ्या वर्षात शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, धार्मिक स्थळे यांच्या 100 मीटर पासून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद व्हावी या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती कायदा अंमलबजावणीची मोहीम नगरपालिका, नगरपरिषद यामध्ये मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. नशाबंदी मंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत याठिकाणी तंबाखू मुक्ती ची शपथ मंडळाच्या संघटकांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार असल्याचे सरचिटणीस यांनी मांडले. 


वाढते व्यसनांचे प्रमाण आणि त्यात अडकत झालेली तरुणाई यांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि शरीराची होणारी परवड लक्षात घेऊन या मुलांना परावृत्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात तंबाखूचा राक्षस प्रदर्शनी मांडण्यात आली होती. 


ही प्रदर्शनी बघण्यासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी व मुंबईकर यांचे लक्ष वेधुन घेऊन सर्वांना तंबाखूला नाही म्हणा असे संदेश देत होते. सदर कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिका, कामगार विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन, प्रजापिता ब्रह्मकुमारी, किन्नर मा या संस्थांनी सहभाग घेऊन कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शनीचे आयोजन करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. तंबाखूजन्य कायद्याची माहिती दर्शविणारे कटआऊट, प्रदर्शनी, पोस्टर्स, पत्रकांच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३ चा प्रचार, प्रसार व अंमलबजावणीसाठी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आपला सहभाग नोंदवत तंबाखू मतलब खल्लास तंबाखू मुक्त मुंबई महाराष्ट्र चा नारा देत तंबाखूजन्य पदार्थ पासून दूर राहण्याचा संकल्प केला अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी दिली. सदर कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या वतीने पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील, मुंबई शहर संघटक रवींद्र गमरे, प्रियांका सवाखंडे व मुंबई उपनगर संघाटिका दिशा कळंबे या सर्वांनी उपस्थिती दर्शवुन कार्यक्रम पार पाडला.

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना सेवानिवृत्तीनंतर एक रकमी लाभ मिळणेसाठी ७ जून रोजी बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना सेवानिवृत्तीनंतर एक रकमी लाभ मिळणेसाठी ७जून रोजी बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा !


चोपडा, (जळगाव).. जिल्ह्यात सुमारे ४०० अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सेवानिवृत्त होऊन चार वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु त्यांना महाराष्ट्र सरकारने मान्य केलेला सेवा निवृत्ती लाभ एक रकमी लाभ अद्याप मिळालेला नाही या सेवानिवृत्त सेविका मदतनीस काही वारल्या असून काही ६८/६९ वर्षाच्या वयोवृद्ध झालेल्या आहेत त्यांना पेन्शन नसल्यामुळे फक्त सेवानिवृत्ती चा एकरकमी लाभ वरच पुढील आयुष्य जगण्याची आशा आहे.


महाराष्ट्र सरकारने त्यांना गेल्या चार वर्षापासून यामुळे एकरकमी लाभ न दिल्याने त्या हलाखीचे जीवन जगत आहेत. महाराष्ट्र सरकारने १०० कोटी रुपये सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका ना एक रकमी लाभ भारतीय विमा जीवन विमा निगम कार्यालयामार्फत मिळावेत मंजूर केले आहेत. या मंजुरी ला एक दीडमहिन्याचा कालावधी लोटून सुद्धा सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना लाभ मिळत नाही. 

तरी या बाबतीत विशेष लक्ष घालून तसा लाभ त्वरित मंजूर करून द्यावा ही विनंती अन्यथा सेवालाल सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनीस जळगाव जिल्हा परिषदेसमोर सात जून २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता बोंबाबोंब आंदोलन करतील कृपया वयोवृद्ध महिला कर्मचारी यांचेवर तशी पाळी येऊ देऊ नये असा इशारा देण्यात आला. 

जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकचे अध्यक्ष अमृत महाजन, प्रेमलता पाटील, ममता महाजन, शशिकला निंबाळकर, सरलाबई देशमुख, मीराबाई पाटील, सयाबाई कोळी, कमलबाई पाटील आदींनी दिला आहे निवेदने मुख्यमंत्री महिला बालकल्याण मंत्री जळगाव जिल्हा परिषद आयुक्त एकात्मिक बाल विकास, मुंबई यांचेकडे देणेत आल्याचे जिल्हा आयटक ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे महत्वपूर्ण सभा संपन्न

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे महत्वपूर्ण सभा संपन्न 


मुंबई (शांताराम गुडेकर ) :
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे रविवार  दि.२९ मे  २०२२ रोजी संत तुकाराम बालवाडी, डगलाईन, राम नगर अ,घाटकोपर पश्चिम येथे विक्रोळी- घाटकोपर शाखेची महत्वाची सभा पार पडली. 


या सभेत शाखा वार्षिक जमाखर्च अहवाल सादर करण्यात आला.त्या अहवालाला चांगला प्रतिसाद  लाभला आणि सर्व सहमताने पास करण्यात आला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. याशिवाय काही पदाधिकारी मुंबई बाहेर रहायला गेले तर काही पदाधिकारी यांची आरोग्य समस्या निर्माण झाल्यामुळे ते शाखा सभा, अन्य कार्यक्रम यामध्ये आपले योगदान मनात असूनही देऊ शकत नव्हते. 


त्यामुळे शाखा कार्यकारणीचा विस्तार करणे आवश्यक होते.त्यानुसार सन २०२२-२३ साठी घाटकोपर -विक्रोळी शाखा पदाधिकारी विस्तार करण्यात आला. 


सन २०२२-२३ ची शाखा कार्यकारिणीमध्ये शाखा संस्थापक- आत्माराम बाईत, शाखा अध्यक्ष -सोनू रामचंद्र शिवगण, उपाध्यक्ष -वसंत राऊत, सदाशिव खांडेकर, शंकर मेणे, दत्ताराम थोरे, सेक्रेटरी- सुरेश मांडवकर, उपसेक्रेटरी -दिलीप बेलकर, सूर्यकांत सरफळे, अरविंद हरमळे, रमाकांत शिगवण, खजिनदार- चंद्रकांत भोज, उपखजिनदार -संतोष रांबडे, हिशोब तपासनीस -राजेश बने, संघ प्रतिनिधी- प्रकाश वालम, संघ कार्यकारिणी सदस्य -संजय जाधव, गणपत काजारे यांचा समावेश आहे. सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणी यांचे सर्व आजी -माजी पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांच्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या सभेला शाखा पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, युवक मंडळ, महिला मंडळ, विवाह मंडळ पदाधिकारी, सदस्य आणि सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.


Sunday 29 May 2022

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांसोबत पंतप्रधान 31 मे रोजी साधणार संवाद

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांसोबत पंतप्रधान 31 मे रोजी साधणार संवाद


बुलडाणा, बातमीदार : पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी शिमला (हिमाचल प्रदेश) येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य व जिल्हा स्तरावर स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या कुटूंबियांसह निवडक लाभार्थी यांचेशी संवाद साधार आहे.  त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरदेखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध योजनेचे लाभार्थी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटूंबीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 31 मे रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे सकाळी 9.45 ते दुपारी 12.10 वाजेदरम्यान करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

बारबालेचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न ; उलवे, पनवेल येथील घटना !!

बारबालेचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न ; उलवे, पनवेल येथील घटना !!


पनवेल, बातमीदार : उलवेमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय बारबालेच्या घरामध्ये घुसलेल्या अज्ञात व्यक्तीने तिचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.

बेशुध्दावस्थेत असलेल्या या बारबालेवर नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनेतील जखमी तरुणी बारमध्ये काम करणारी असून पूर्वी ती मीरारोड येथे राहण्यास होती. सदर तरुणी कोपरखैरणेतील बेला बारमध्ये कामाला असताना, तिची ओळख कळंबोली येथे राहणाऱ्या हॉटेल व्यावसायिक तरुणासोबत होऊन त्याच्यासोबत तिची चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये संपर्क वाढल्यानंतर हॉटेल व्यावसायिकाने या तरुणीला राहण्यासाठी उलवे, सेक्टर- १९ मधील इमारतीत भाड्याने घर घेऊन दिले होते.

या दोघांनी उलवे येथील घरामध्ये जेवण केल्यानंतर रात्री ९ च्या सुमारास हॉटेल व्यावसायिक कळंबोली येथे आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर मध्यरात्री २ च्या सुमारास हॉटेल व्यावसायिक तरुणाने सदर तरुणीला फोन केला असता, तिने फोन उलचला नाही. त्यानंतर दिवसभर त्याने तीन-चार वेळा तरुणीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने फोन न उचलल्याने सायंकाळी ७ च्या सुमारास हॉटेल व्यावसायिक आपल्या दोन मित्रांसह उलवे येथे गेला.

यावेळी त्याने आपल्याकडील चावीने दरवाजा उघडला असता, आतमध्ये तरुणी जखमी आणि बेशुध्दावस्थेत पडल्याचे निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी तिला तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये दाखल केले. दरम्यान, सदर तरुणी अद्याप बेशुध्दावस्थेत असल्याने तिला कुणी मारण्याचा प्रयत्न केला ते समजू शकले नाही. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.


महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !! ** आदित्य ठाकरे यांचा रॅलीत सहभाग, जितेंद्र आव्हाड व ...