Saturday, 3 June 2023

लाचखोर सुनीता धनगर यांच्या घराची झडती - सोनं आणि कॅश बघून अधिकारी चक्रावले !!

लाचखोर सुनीता धनगर यांच्या घराची झडती - सोनं आणि कॅश बघून अधिकारी चक्रावले !!


नाशिक, प्रतिनिधी - निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी ५५ हजारांची लाच स्वीकारतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह शिक्षण विभागाचे लिपिक नितीन जोशी यांना रंगेहाथ पकडले होते.

काल एसीबीने शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी करत अटक केली होती. यानंतर त्यांच्या घराची एसीबीने झाडाझडती घेतली असता त्यात ८५ लाख रुपये रोख व ३२ तोळे सोने, २ फ्लॅट आणि एक प्लॉट व आडगाव येथे एक प्लॉट मिळून आले. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, त्यांचे घर सील करण्यात आले असून एसीबीचे पथक पुढील तपास करत आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...