Wednesday 24 July 2019

सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस तब्बल आठ दिवस बंद. _______________________________ पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक ही तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या तब्बल आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद असल्याने याकाळात काही ट्रेनचे मार्ग हे बदलण्यात आले आहेत. कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस या मुंबईहून सुटतात मात्र या कालावधी दरम्यान त्या पुण्याहून सुटणार आहेत. पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच पुणे-भुसावळ ट्रेन ही मनमाड मार्गे धावणार आहे. प्रवाशांनी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस तब्बल आठ दिवस बंद.
__________________________________

पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक ही तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या तब्बल आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद असल्याने याकाळात काही ट्रेनचे मार्ग हे बदलण्यात आले आहेत. कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस या मुंबईहून सुटतात मात्र या कालावधी दरम्यान त्या पुण्याहून सुटणार आहेत. पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच पुणे-भुसावळ ट्रेन ही मनमाड मार्गे धावणार आहे. प्रवाशांनी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...