Thursday 2 May 2024

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एकाच छताखाली सर्वांना स्थळे मिळून वेळ व पैशांची बचत व्हावी ह्या उद्देशाने कल्याणात सकल धनगर समाज वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
      कल्याण पश्चिमेतील महापालिकेसमोरील स्वामी नारायण हॉल येथे रविवार दिनांक ५ मे रोजी श सायंकाळी ५ वाजता धनगर समाज वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अरुण मनोरे यांच्या हस्ते ह्या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाज विकास मंडळाचे अध्यक्ष देवराम कंखरे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून याप्रसंगी सर्वश्री समाधान मोरे, विलास तायडे, संजय लाळगे, समीर मानकर, योगेश घोलप, राहुल परदेशी, गजानन सोनवणे, रमाकांत पाटील, ज्ञानेश्वर कंखरे, कौतिकराव बस्ते, शांताराम माने, ज्ञानेश्वर काटकर, सुधाकर बाविस्कर, दिलिप सुर्यवंशी, श्यामभाऊ सोनवणे, लालचंद कंखरे, रघुनाथ पाटील, रावण धनगर, सुनिल वैदय, अशोक धनगर, सतिश हडपे, शंकर लांडगे, विनोद सावळे, महेश सावळे, हर्षद ठोके, संगिता बाविस्कर, प्रतिभा ठोके, मिनाक्षी खराटे, लता मनोरे, शितल घोलप, सुरेखा बोरसे, कविता बागुल, अर्चना खांगटे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून अधिक माहितीसाठी आयोजक अनिल काकडे भ्रमणध्वनी 9324552963 /8104211818 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Wednesday 1 May 2024

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जातेच त्याच मूळ कारण  आपल्या एका रक्तदानाने तिघांना जीवनदान मिळते, कधी कधी जिथं रक्ताची नाती सुद्धा रक्तदानासाठी तयार होत नाहीत तिथं अनेक अनोळखी रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्याकरता तत्पर असतात हे म्हणावं लागेल. वर्षभर अनेक ब्लड कॅम्प तसेच नवनवीन रक्तदात्यांना प्रेरित करुन रक्तदान करण्यास प्रवृत्त केले जाते. म्हणूनच जय बजरंग व्यायाम शाळा (भटवाडी, घाटकोपर) व घाटकोपर प्रतिष्ठान, यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबीरला घाटकोपर मधील युवक -युवती, महिला -पुरुष यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
            कमी वेळेत अनेक रक्तदाते तयार करून अनेकवेळा रक्तदान शिबिरे आयोजित करून मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातील रक्तपेढीना आणि गरजवंत रुग्णांना रक्ताची उपलबध्दता करून देणे हे कार्य मोठ्या शिताफीने ही  संस्था करत असते. अपघात, बाळंतपण, डायलेसिस रुग्ण, सिकलसेल रुग्ण, थेलेसेमीयाच्या रुग्णांना आणि अन्य शस्त्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लागते. मुंबई सारख्या शहरात दररोज हजारोंच्या संख्येत रक्त युनिटची गरज लागत असते आणि त्या मानाने रक्त संकलन खूप कमी प्रमाणात होत असताना दिसते. कारण अजूनही रक्तदानाच्या गैरसमजुतीमुळे लोक रक्तदान करण्यास टाळत असतात. ते गैरसमज दूर करून अनेकांनी रक्तदानाकडे वळले पाहिजे. रक्तदाते परिवाराला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या हॉस्पिटल, ब्लड बँक यांना मनःपूर्वक धन्यवाद देत त्यांचे आभार व्यक्त केले. रक्ताचा थेंब थेंब आहे मौल्यवान, जो वाचवतो रुग्णांचे प्राण, याची असावी सर्वांना जाण म्हणूनच करावे निःस्वार्थ रक्तदान असा संदेश यानिमित्ताने वृत्त पत्रलेखक सुभाष कोकणे यांच्यातर्फे देण्यात

घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश जंगम यांच्यातर्फे जय बजरंग व्यायाम शाळेला विभागलातील जनतेच्या वापरासाठी व्हील चेअर व स्ट्रेचेरची भेट !!

घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश जंगम यांच्यातर्फे जय बजरंग व्यायाम शाळेला विभागलातील जनतेच्या वापरासाठी व्हील चेअर व स्ट्रेचेरची भेट !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.निलेश नामदेव जंगम यांच्यावतीने, व्हील चेअर व स्ट्रेचेर, जय बजरंग व्यायाम शाळा (भटवाडी, घाटकोपर) या संस्थेला विभागलातील जनतेच्या वापरासाठी भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी व सभासद,श्री.भावेश चव्हाण,श्री.अजित चव्हाण,संतोष कोंकटी, राजेश चव्हाण, चंदू राणे, बाळू काकडे, संदेश खापरे, उदय चव्हाण, रमेश सुर्वे, सुरेश शिर्के, सागर सुर्वे आणि सुभाष कोकणे आदी उपस्थित होते. यानिमिताने घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.निलेश नामदेव जंगम यांचे स्थानिक जनतेकडून कौतुक होत असून त्यांचे अनेकांनी आभार मानून त्यांना पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :

            शिवसेना सचिव, प्रवक्ता, मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली "महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे" औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर  स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई - येथे कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कामगार सोहळ्याला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांची तातडीची बैठक असल्याकारणाने कार्यक्रमास उपस्थित राहू शकले शकले नव्हते. मात्र  त्यांनी या कार्यक्रमला शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य गुमास्ता माथाडी ट्रान्सपोर्टचे श्री.महेंद्र जाधव यांनी मा.मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी प्रेमाची भेट म्हणून चांदीचा हुक/आरी आणि शाल आणली होती. ती त्यांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांना तमाम माथाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने दिली. यावर बोलताना मा. श्री. किरण पावसकर यांनी सर्व माथाडी कर्मचाऱ्यांना सांगितले तुम्ही दिलेली ही प्रेमाची भेट मी मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना तुमच्या सर्वांच्या वतीने देईन. बाळासाहेब भवन येथे मा.मुख्यमंत्री शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मा. श्री किरण पावसकर यांनी सर्व माथाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने  ही प्रेमाची भेट, माथाडी चे प्रतीक म्हणून चांदीचा हुक/आरी  आणि शाल मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब  यांना देण्यात आले.

श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्र कोचरी बेंद्रेवाडी यांच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !!

श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्र कोचरी बेंद्रेवाडी यांच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !!

लांजा (केतन भोज) : आत्मबुद्धी निश्चयाची | तेचि दशा मोक्षश्रीची || मी आत्मा आहे हे कधीच विसरू नये हे ब्रीद वाक्य घेऊन आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्र कोचरी बेंद्रेवाडी यांचा यंदा पन्नासवा सुवर्ण महोत्सवी उत्सव साजरा होत आहे. त्या निमित्त दि.०७ मे ते १० मे २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ६.०० वाजता काकड आरती त्यानंतर ९.०० वाजता सकाळचे भजन सायंकाळी ४.०० वाजता सांप्रदायिक भजन असा दिनक्रम असून मंगळवार दि.०७ मे रोजी सकाळी १०.०० वाजता क्रिकेट स्पर्धा ( वाडी मर्यादित) सायं-६.०० वा.हरिजागर आणि किर्तन (किर्तनकार श्री.चंद्रकांत पवार महाराज), लांजा यांचे किर्तन, रात्रौ-९.०० वाजता आरती व शेजारती त्यानंतर ९.३० वा. महाप्रसाद व तद्नंतर १०. वाजता बैठी भजन- श्री काडसिद्धेश्वर सांप्रदाय भजन मंडळ,देवरुख तसेच बुधवार दि.०८ मे रोजी सकाळी १२.०० ते.२.०० या कालावधीत हळदीकुंकू (गावपातळीवर) सायं-५.०० वाजता गुणगौरव व सत्कार समारंभ (गुणगौरव गावपातळीवर हायस्कूल व मराठी शाळेतील मुलांचा सत्कार) (सत्कार समारंभ वाडीतील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार) रात्रौ ८.३० वाजता आरती व शेजारती रात्रौ.९.०० वाजता महाप्रसाद व तद्नंतर रात्रौ १०.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुवार दि.०९ मे रोजी सायं-४.०० वाजता पालखी मिरवणूक, रात्रौ-६.३० वाजता किर्तन (किर्तनकार श्री.नामे बुवा), रात्रौ-९.०० वाजता महाप्रसाद व तद्नंतर रात्रौ १०.०० वाजता बैठी भजन (तिवरे मेढे भजन मंडळ व शेवटी शुक्रवार दि.१० मे रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत श्री काडसिद्धेश्वर आध्यत्मिक केंद्र, कोचरी, बेंद्रेवाडी संलग्न सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिचर्स सेंटर कणेरी मठ, कोल्हापूर आयोजित मोफत आरोग्य शिबीर असून यामध्ये रक्तदान, हाडांचे आजार तपासणी, डोळे तपासणी, ईसीजी, शुगर तपासणी वैद्यकीय सल्ला यांचा समावेश आहे, सायं-५.०० वाजता पालखी रिंगण भजन, सायं-६.३० वाजता दिप प्रज्वलन व सायंकाळी ७.०० वाजता प.पूज्य श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांचा प्रवचन सोहळा आयोजित केला आहे तद्नंतर रात्रौ १०.०० वाजता महाप्रसाद अशा प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित केले असून, सर्व भक्तांनी उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन श्री काडसिद्धेश्वर आध्यात्मिक केंद्र, कोचरी बेंद्रेवाडी, लांजा यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे यांना न्यू हिंदुस्थान कामगार सेनेने समाज रत्न पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित केले. कल्याण पश्चिम येथील मराठा मंदिर सभागृहात न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्यावतीने कामगार दिनानिमित्त एक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात निलेश सांबरे यांना न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या मते, निलेश सांबरे याचं व्यक्तिमत्व समाजातील विविध स्थरातील रत्नांपैकी एकमेव आहे. तसेच सांबरे यांनी जिजाऊ संघटनेमार्फत केलेल्या समाजकार्याचा सार्थ अभिमान असल्याचंही पुरस्काराच्या प्रमाणपत्रात नमूद केले आहे. निलेश सांबरे यांच्या समाजसेवेचा आदर्श इतरांनीही घ्यावा आणि समाजात सुसंस्कृत व सुशिक्षित वर्ग निर्माण होण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा गौरव प्रदान केल्याचं न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमामध्ये जिजाऊ संघटनेचे अनेक पदाधिकारी निलेश सांबरे यांच्यासोबत उपस्थित होते. तसेच न्यू हिंदुस्थान कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष समीर पिंपळे, सरचिटणीस हर्षवर्धन साईवाला आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य कार्यक्रमात हजर होते.

Tuesday 30 April 2024

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

** आदित्य ठाकरे यांचा रॅलीत सहभाग, जितेंद्र आव्हाड व वरुन देसाई यांची प्रमुख उपस्थिती 

डोंबिवली, सचिन बुटाला ::महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कार्यकर्त्या वैशाली दरेकर - राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताना युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, माजी आमदार सुभाष भोईर, संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, काँग्रेसचे नेते संतोष केणे, प्रवक्ते महेश तपासे, उपजिल्हा संघटक हर्षवर्धन पालांडे, युवा नेते वरूण सरदेसाई, जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, राष्ट्रवादीचे वंडार पाटील उपस्थित होते. 

कळवा, मुंब्रा, कल्याण पूर्व, डोंबिवली, दिवा, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, गाव परिसर येथून हजारो शिवसैनिक दरेकर यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते. ढोल ताशांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली. उमेदवार वैशाली दरेकर यांनी डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेत आशिर्वाद घेतला तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीत सहभागी झाल्या. 

यावेळी शिवसेनेचे (उबठा) युवा नेते आदित्य ठाकरे रॅलीत सहभागी झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात वेगळाच उत्साह पहायला मिळला. ही रॅली मध्यवर्ती शाखा येथून चार रस्ता, टिळक रोड, शेलार नाका, घरडा सर्कल मार्गे र्रली मार्गस्थ झाली. यावेळी इंडिया आघाडीतील घटकपक्षांची मोठी गर्दी दिसून आली. जमलेले शिवसैनिक व नागरिकांचा उत्साह पहाता ही निवडणूक विद्यमान खासदारांना सोपी जाईल असे दिसत नाही.

सामान्य महिला विरुद्ध धनशक्ती मशाल पॉवर अशी ही लढत होणार आहे. त्यामध्ये कल्याण लोकसभेचे जनता हे निष्ठावंत वैशाली दरेकर यांच्या सोबत उभी राहणार असल्याचे सांगितले. आमच्या पक्षात कोणतेही नाराजी नसून नाराजी असेल तर ते दूर करण्यात येईल असे देखील यावेळी वरून सरदेसाई यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या प्रति संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड सहानुभूती लोकप्रियतेची लाट आहेत. त्या लाटेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही परत एकदा जिंकू असे सांगितले. असे युवा नेते वरुन देसाई यांनी सांगितले.









रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...