Tuesday 30 April 2024

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

** आदित्य ठाकरे यांचा रॅलीत सहभाग, जितेंद्र आव्हाड व वरुन देसाई यांची प्रमुख उपस्थिती 

डोंबिवली, सचिन बुटाला ::महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कार्यकर्त्या वैशाली दरेकर - राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताना युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, माजी आमदार सुभाष भोईर, संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, काँग्रेसचे नेते संतोष केणे, प्रवक्ते महेश तपासे, उपजिल्हा संघटक हर्षवर्धन पालांडे, युवा नेते वरूण सरदेसाई, जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, राष्ट्रवादीचे वंडार पाटील उपस्थित होते. 

कळवा, मुंब्रा, कल्याण पूर्व, डोंबिवली, दिवा, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, गाव परिसर येथून हजारो शिवसैनिक दरेकर यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते. ढोल ताशांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली. उमेदवार वैशाली दरेकर यांनी डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेत आशिर्वाद घेतला तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीत सहभागी झाल्या. 

यावेळी शिवसेनेचे (उबठा) युवा नेते आदित्य ठाकरे रॅलीत सहभागी झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात वेगळाच उत्साह पहायला मिळला. ही रॅली मध्यवर्ती शाखा येथून चार रस्ता, टिळक रोड, शेलार नाका, घरडा सर्कल मार्गे र्रली मार्गस्थ झाली. यावेळी इंडिया आघाडीतील घटकपक्षांची मोठी गर्दी दिसून आली. जमलेले शिवसैनिक व नागरिकांचा उत्साह पहाता ही निवडणूक विद्यमान खासदारांना सोपी जाईल असे दिसत नाही.

सामान्य महिला विरुद्ध धनशक्ती मशाल पॉवर अशी ही लढत होणार आहे. त्यामध्ये कल्याण लोकसभेचे जनता हे निष्ठावंत वैशाली दरेकर यांच्या सोबत उभी राहणार असल्याचे सांगितले. आमच्या पक्षात कोणतेही नाराजी नसून नाराजी असेल तर ते दूर करण्यात येईल असे देखील यावेळी वरून सरदेसाई यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या प्रति संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड सहानुभूती लोकप्रियतेची लाट आहेत. त्या लाटेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही परत एकदा जिंकू असे सांगितले. असे युवा नेते वरुन देसाई यांनी सांगितले.









भिवंडी लोकसभा मतदारसंघात आमचा विजय निश्चित - निलेश सांबरे

भिवंडी लोकसभा मतदारसंघात आमचा विजय निश्चित - निलेश सांबरे 

** भिवंडी लोकसभा मतदारसंघात आईवडीलांचा आशिर्वाद घेऊन निलेश सांबरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल 


भिवंडी, सचिन बुटाला : भिवंडी लाेकसभा मतदारसंघातून आज (मंगळवार) जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टी तर्फे निलेश सांबरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.


त्यांनी उमेदवारी अर्ज भरायला जाण्याआधी आपल्या मूळ गावी झाडपोली येथे आई वडिलांचा आशिर्वाद घेतला. आज अर्ज भरायला जात असताना लाखोंचा जनसमुदाय सोबत होता. निलेश सांबरे यांच्या सामाजिक कार्याने प्रभावित होऊन आज संपूर्ण लोकसभा मतदारसंघांतील सर्व जाती धर्माची जनता उपस्थित होती. प्रत्येकाच्या मुखी एकच ""निलेश सांबरे साब आप आगे बढो हम तुम्हारे साथ" हैं. 


यावेळी निलेश सांबरे यांनी माध्यमांशी बोलताना मी कॉंग्रेस कडे उमेदवारी मागितली होती व ती जवळजवळ अंतिम होती पण काय झाले हे माहीत नाही, ज्या पक्षाची या मतदारसंघात फारशी ताकद नसताना कोणीतरी सुपारी घेऊन त्या पक्षाला उमेदवारी दिली, पण ही देऊन त्या पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचा बळी देण्यात आला. आमच्या संस्थेचे संपूर्ण मतदारसंघातील सामाजिक कार्य त्यामुळे आमच्या वर असलेला विश्वास, आम्हाला न्याय देऊन या मतदारसंघाचा विकास फक्त सांबरे साहेबच करु शकतात हा भरवसा व जनतेचा असलेला पाठिंबा यामुळे आमचा विजय निश्चितच आहे तसेच अजूनही कॉंग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिला तर आपण कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार असे सांगितले.






Monday 29 April 2024

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे 


डोंबिवली, सचिन बुटाला : कल्याण पूर्वेतील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते संवाद मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण पूर्वेत मागील दहा वर्षात झालेली विकासकामे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पर्यंत पोहोचवावीत असे सांगितले.

कल्याण पूर्व येथील मॉडेल शाळेच्या मैदानात रविवारी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्यात बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाची विकासकामे झाली असून त्यात प्रामुख्याने कल्याण पूर्वेत चक्की नाका-मलंगगड रोड, कल्याण शीळ रोड, पत्री पूल, अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे रस्ते अशी अनेक कामे झाल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग हा 800 कोटींचा प्रकल्प, नवी मुंबई - कल्याण मेट्रो हे प्रकल्प सुरू आहेत. 

तसेच कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती, पण आपण त्यापलीकडे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक भव्य स्मारक कल्याण पूर्वेत उभारले व गोरगरिबांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून खोणी आणि शिरढोण येथे घरे बांधण्यात आली. माननीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी व देशाला विकासाच्या मार्गावर राहण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून आपणास कल्याण लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याची जबाबदारी आपली आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, कल्याण जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे, रमेश हनुमंते, भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, प्रशांत काळे यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


धावत्या ट्रेन मधून पडून डोंबिवलीतील २६ वर्षीय तरुणीचा मृत्यु !!

धावत्या ट्रेन मधून पडून डोंबिवलीतील २६ वर्षीय तरुणीचा मृत्यु !!

भिवंडी, दिं.२९,अरुण पाटील (कोपर)
      धावत्या ट्रेन मधून पडून डोंबिवलीतील एका २६ वर्षीय तरुनीचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना आज सोमवार दिं,२९ रोजी सकाळी.घडली आहे.या घटनेमुळे प्रवाशांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
       सविस्तर हकीगत अशी की, मृत तरुणी रिया श्यामजी रजगोर हि डोंबिवली पूर्व येथे आपल्या कुटुंबासह राहत होती. आई-वडील आणि भाऊ असा तरुणीचा परिवार होता. रिया ठाण्यातील  एका कन्स्ट्रक्शन कार्यालयात कार्यरत होती. दररोज ती ठरल्याप्रमाणे मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडून ठाण्यात जायची. आज सकाळी ठरल्याप्रमाणे तिने डोंबिवली रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडली.
         लोकलच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत होती मात्र लोकलमधील गर्दीमुळे ती दरवाजाजवळच उभी. मात्र गर्दीमुळे डोंबिवली ते कोपर स्थानका दरम्यान तिचा तोल गेल्या. तोल गेल्यानंतर लोकल खाली पडून तिचा दुर्देवी मृत्यू झाला. तात्काळ प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
          या आधी देखील अनेक प्रवासी डोंबिवली ते कोपर दरम्यान गर्दीचा बळी ठरलेत. त्यामुळे रेल्वे या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रवाशांकडून अनेकदा डोंबिवलीहून सोडण्यात येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाते.मात्र अद्याप ही ही मागणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे लोकल सेवा कधी वाढवणार असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

Sunday 28 April 2024

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :
        बूड़ोकन कराटे चॅम्पियनशिप -२०२४ दुबई ही स्पर्धा रविवार दि.२८ एप्रिल २०२४ रोजी पार पडली. या चॅम्पियनशिप-२०२४ मध्ये विक्रोळी पार्क साईट येथील डॉ.सुहास भोसले, शिक्षिका सौ.रीता सु.भोसले यांची कन्या कु. रितिका सु.भोसले हिने उल्लेखनीय कामगिरी करत दोन गोल्ड मेडल (सुवर्ण पदक) पटकावले. वय वर्ष २०पेक्षा अधिक मध्ये रितिका भोसलेने काता व कुमिते या प्रकारात दोन गोल्ड मैडल मिळवली आहेत.
               स्पर्धेत एकूण  १६ देशातील ८२८ खेळाडू  सहभागी झाले होते. दुबई, भारत, क़ज़ाकिस्तान, चीन, जपान, नेपाल, श्रीलंका, पाकिस्तान, इंडोनेसिया, कुवेत, ओमान, फिलिपिंन्स, भूटान, इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया, सऊदी अरेबीया या देशाचे स्पर्धेक सहभागी झाले होते.रितिका हिने २० वर्षावरील या मुलींच्या वयोगटात हे यश मिळवले.क्वाटर फाइनल-ऑस्ट्रेलिया, सेमी फाइनल-कुवेत, फाइनल-सऊदी अरेबियाच्या प्लेयरला रितिका भोसलेनी हरवले. इंटरनेशनल इन्दो रयू कराटे दो फेडरेशनचे कोच फ्राज सर यांच्या मार्गदर्शनखाली तिने ही  गोल्ड मॅडल जिंकली. आजवर रितिका भोसले हिने अनेक सुवर्ण, रजत व कास्य पदक मिळवली आहेत.रितिका भोसलेच्या या यशाबद्दल तिला अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे 


** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची कामे घराघरात पोहोचायचे आहे...

डोंबिवली, सचिन बुटाला : उल्हासनगर येथे आयोजित कल्याण लोकसभेच्या महायुतीच्या संवाद मेळाव्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली होती. याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची निवडणूक आहे, त्यामुळे पुढील २० दिवस आपण सर्वांनी मिळून प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आपण केलेली कामे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवायची आहेत, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

उल्हासनगर शहरात गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. भुयारी गटार योजना, सिमेंट काँक्रिटचे रस्ते, कॅशलेस हॉस्पिटल, कामगार हॉस्पिटल अशा अनेक सुविधा आपण आत्तापर्यंत पुरवल्या आहेत. उल्हासनगरमधील अनधिकृत इमारतींचे नियमितीकरण आणि पुनर्विकास यासाठी नियम बदलून राज्य सरकारने आणलेले धोरण हा सर्वात महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने उल्हासनगरसाठी घेतला आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान होणे गरजेचे आहे. त्यामुळेच महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी २० मे रोजी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, साई पार्टीचे अध्यक्ष जीवन इदनानी, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव भरत गंगोत्री, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे, शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, दिलीप गायकवाड, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर, रमेश चव्हाण, शिवसेना महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, माजी महापौर राजश्री चौधरी, लिलाबाई आशान, मीना कुमार आयलानी, राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव सोनिया धामी यांच्यासह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अजून ही तळ्यात मळ्यात !!

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अजून ही तळ्यात मळ्यात !!

भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत कॉंग्रेसचा मतदारसंघ असून आजपर्यंत झालेल्या सर्व निवडणुकीत २०१४ व २०१९ चा अपवाद वगळता कॉंग्रेस विजयी झाली आहे.

यावेळी सुध्दा महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कॉग्रेसला जाणार असे नक्की झाले असताना, स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी हा मतदारसंघ भिवंडी येथील पत्रकार परिषदेत काँग्रेसला मिळाला आहे व‌ जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली होती.

हा मतदारसंघ काँग्रेसला जाणार म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचे या संपूर्ण मतदारसंघात (ग्रामीण व शहरी भागात) असलेले कार्य यामुळे त्यांनी सुध्दा कॉंग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.

मतदारसंघात स्थानिक खासदारांची निष्क्रियता तसेच त्यांच्या विषयी असलेली नाराजी यामुळे महाविकास आघाडीचा विजय सोपा झाला होता पण अचानक हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना गेला त्यामुळे कॉंग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे व जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांची नाराजी, कॉंग्रेसची या मतदारसंघात असलेली ताकद अशातच निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे रहाण्याचा केलेला निर्धार यामुळे महाविकास आघाडीला सोपा वाटणारा विजय कठीण होऊन ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचा निवडणूक जवळ आली असताना सुद्धा बराचसा वेळ नाराजी दूर करण्यातच जात असल्याने प्रचारात पाहिजे तसा जोर दिसत नाही याव्यतिरिक्त महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे पण कॉंग्रेसची साथ नाही मिळाली तर सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तपणे होणार साजरा !!

देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तपणे होणार साजरा !!

** विशेष योगदान दिलेल्या कर्तृत्ववान महिलांना लोकनिर्माण हिरकणी सन्मान २०२४ आणि कामगार क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार होणार प्रदान 

मुंबई (शांताराम गुडेकर) :

           लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे जागतिक घडामोडींवर अनेक उपक्रम साजरे करण्यात येतात. गेली तीन वर्षे  हे उपक्रम संयुक्तपणे साजरे केले गेले. याही वर्षी १ मे २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहर येथील पार्वती पॅलेस हाॅटेल सभागृहात सकाळी ११ वाजता जागतिक महिला दिन आणि कामगार दिन संयुक्तपणे साजरा करण्यात येणार आहे.‌या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. संजय मंगला गोपाळ (राष्ट्रीय समन्व्यक) जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्व्यय (N. A. P. M), पूर्व अध्यक्ष व विश्वस्त साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक तसेच साप्ताहिक लोकनिर्माण संपादक श्री. बाळकृष्ण कासार (अध्यक्ष -लोकनिर्माण प्रतिष्ठान) याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित रहाणार आहेत. या दिवशी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कर्तृत्ववान महिलांना लोकनिर्माण हिरकणी सन्मान २०२४ आणि कामगार क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 
       विशेष म्हणजे २०२३ या वर्षी दीपावली निमित्ताने महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकनिर्माण न्युज चॅनल च्या माध्यमातून "दिवाळी आनंदाची, मेजवानी फराळाची" हे विषय घेऊन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी पाच ते दहा मिनिटात आणि दिलेल्या मुदतीत कृतीसह रेसीपीचे व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला साथ देत अनेक महिलांनी नाव नोंदणी केली होती. यापैकी आठ महिलांनी दिलेल्या मुदतीत रेसिपी चे व्हिडिओ पाठवले होते. स्पर्धेचा निकाल हा ज्यांचे व्हुज आणि लाईक जास्त आले अशा तीन स्पर्धकांचे क्रमांक जाहीर करण्यात आले. त्यातील प्रथम क्रमांक सौ. साक्षी चव्हाण - राजापूर, द्वितीय क्रमांक सौ. मानसी चांदोरकर - चांदोर, तृतीय क्रमांक सौ. आदिती भावे - रत्नागिरी, आणि उत्तेजनार्थ सौ. रुता पंडित रत्नागिरी असून या पुरस्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि लोकनिर्माण चे सहसंपादक युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
  
         महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे. एन. पी. टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. गावदेवीची यात्रा चैत्र शुद्ध कृष्ण पक्ष-१ बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झाली. तर  पालखी सोहळा गुरुवार दि. २५ एप्रिल २०२४ रोजी थाटामाटात पार पडला.अनेक गावामधील ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेतले व हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला. ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी केली होती.
        ग्रामसुधारक मंडळ न्हावे, कमिटी गजानन पांडुरंग म्हात्रे -अध्यक्ष, जयेंद्र जनार्दन पाटील -उपाध्यक्ष, निलेश हरिश्चंद्र भोईर -उपाध्यक्ष, प्रेमनाथ नामदेव म्हात्रे -उपाध्यक्ष, सतीश दत्ताराम भोईर -उपाध्यक्ष, विनोद एकनाथ पाटील -खजिनदार,
अनंत लहु म्हात्रे -सहखजिनदार, सदानंद जगजीवन पाटील -सहखजिनदार, विशाल लक्ष्मण ठाकूर -सहखजिनदिर, विजेंद्र गणेश पाटील -सरपंच, राजेश गणेश म्हात्रे -उपसरपंच, हिरालाल हरी पाटील, सुहास पाटील, मनीष गणेश भोईर, अशोक दामू भोईर आणि सदस्य, तसेच इत्यादी पदाधिकऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पाहावे .सर्व भक्तांनी आरोग्य, सुख, शांती प्रदान करण्याची विनंती देवीला केली असे सदर गावचे सुपुत्र अशोक दामू भोईर यांनी बोलताना सांगितले.

Friday 26 April 2024

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
          लांजा तालुका मधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे, लांजा पंचायत समितीचे माजी उपसभापती व संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुभाष रामाणे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.अमोल मिस्त्री संस्थेचे सदस्य श्री महादेव पाटील यांच्या प्रयत्नाने उच्च न्यायालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी सौ.समिधा शाम पाटील मॅडम यांच्याकडून रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समिती यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.यावेळी रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीचे प्रमुख जिल्हाध्यक्ष श्री. आनंद त्रिपाठी, तालुका अध्यक्ष श्री.संजय सुर्वे उपाध्यक्ष श्री.दीपक बाईंग, सचिव श्री.मयूर जाधव आदी मान्यवर  व दिव्यांग सभासद उपस्थित होते.

Thursday 25 April 2024

महाआघाडीत विसंवाद व मतदारसंघातील कार्य यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा सोपा विजय !!

महाआघाडीत विसंवाद व मतदारसंघातील कार्य यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा सोपा विजय !!

डोंबिवली, सचिन बुटाला : कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली व कळवा- मुंब्रा सहा मतदारसंघ येतात यातील पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार असून फक्त एक कळवा -मुंब्रा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहे.

अशातच शिवसेना (उबठा) गटाने अननुभवी वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात अनेक त्यांच्या परिवाराशी निष्ठावंत असलेले शिवसैनिक असताना सुद्धा मनसेतून शिवसेनेत आलेल्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्याने अनेक त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, अशातच कॉग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते शकील यांनी उमेदवार विश्वासात घेत नाही असे सांगत नाराजी व्यक्त केली.

कल्याण येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत कल्याण पुर्वेतील कॉग्रेसचा एक नेता सोडल्यास कल्याण लोकसभा मतदारसंघातून कॉग्रेस, राष्ट्रवादी (शरच्चंद्र पवार,) एक ही जनमानसात ताकद असणारा नेता उपस्थित नव्हता. महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे.

संपूर्ण मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेले कार्य मेट्रो रेल्वे, पलावा उड्डाणपूल, मुंब्रा उड्डाणपूल, शिळफाटा सहा पदरी उड्डाणपूल, कल्याण शिळफाटा रस्ता सहा पदरी, ऐरोली काटई फ्री वे, कल्याण रिंगरोड, मोठागाव माणकोली उड्डाणपूल, मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका यांच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे, कॉंक्रिटीकरण, अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर व खिडकाळी मंदिर यांचा कायापालट करण्याचा निर्धार, श्री मलंगगड परिसरात विकास, वंदेमातरम ट्रेन ला कल्याण स्टॉप, अंबरनाथ स्थानक हेरिटेज म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न, रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प कामे मार्गी लागली असून काही सुरू आहेत.

याशिवाय  उल्हासनगर येथे अत्याधुनिक कामगार रुग्णालय, कल्याण पूर्व येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ज्ञान केंद्र, बेतवडे गाव दिवा येथे आगरी कोळी वारकरी भवन, मेट्रो मॉल, कल्याण पूर्व हिंदी भाषा भवन उभारण्याचा संकल्प, उल्हासनगर अनधिकृत इमारती व घरे दहा टक्के भोगवटा शुल्क भरून अधिकृत करण्याचा निर्णय, अंबरनाथ उल्हासनगर येथे क्रिडा संकुल, मिनी स्टेडियम, शुटिंग रेंज, अंबरनाथ ऑलिंपिक दर्जाचा तरण तलाव, कळवा रामा तरण तलाव नूतनीकरण व क्रीडा सुविधा, डोंबिवली येथे क्रिडा सुविधांची उभारणी, अंबरनाथ येथे नाट्यगृह तसेच पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान अंबरनाथ येथे स्पर्धा परीक्षा केंद्र, चिखलोली अंबरनाथ लोटस तलाव संवर्धन, अंबरनाथ वुलनचाळ येथे बेघर निवारा केंद्र, कल्याण अंबरनाथ टाटांचे कौशल्यवर्धन केंद्र, खारेगाव उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूलांची उभारणी, चिखलोली रेल्वे स्थानक लवकरच सेवेत, लोकग्राम पादचारी पूल, आई तिसाई देवी उड्डाणपूल, उल्हासनगर मल्टीस्पेशालिटी मोफत रुग्णालय, डोंबिवली सुतिकागृह आणि कॅन्सर रुग्णालय उभारणी, मतदारसंघात विविध आरोग्य सुविधा, कळवा शासकीय रुग्णालयात विवीध सुविधा सुरु केले, सुरळीत पाणीपुरवठा यातील अनेक विकासकामे केली असून काही सुरू आहेत तर काही प्रस्तावित आहेत.

या मतदारसंघात महायुतीत आता आपसांत कोणतेही मतभेद दिसून येत नाही आहेत व या मतदारसंघात खासदारांनी केलेली विकासकामे तसेच मतदारसंघात कायम कार्यकर्ते व जनतेशी असलेला संपर्क यामुळे श्रीकांत शिंदे हॅटट्रिक साधतील यात काहीच दुमत नाही तर कमीतकमी तीन लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नागरिकांनी व्यक्त केला.




श्रीकांत शिंदे यांनी घेतला आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार !!

श्रीकांत शिंदे यांनी घेतला आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार !!

** स्वतःची औकात आरशात बघा


डोंबिवली, सचिन बुटाला‌ : आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हणाले, जसे ज्यांचे संस्कार असतात तसे ते टीका करत असतात. त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार त्यांच्यावरती तसे झालेले आहेत. म्हणून खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द आपली पात्रता नसताना वापरतात. संस्कार सर्वात महत्त्वाचे असतात. आमच्यावरती स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे, बाळासाहेबांचे आणि आमच्या आई-वडिलांचे संस्कार आहेत. आम्ही कोणाला शिव्या शाप, खालचे शब्द वापरू शकत नाही.

खासदार श्रीकांत शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व येथील साकेत कॉलेजमध्ये शिक्षकांसोबत बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करत त्यांचा समाचार घेतला आहे.

त्यांच्यावरती ज्यांचे संस्कार झालेत त्यांना देखील जाऊन विचारलं पाहिजे असे कसे संस्कार केले ? असे म्हणत खासदार शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील अप्रत्यक्षपणे टोला हाणला आहे.

Wednesday 24 April 2024

**"घरपण नाही घराला" दोन अंकी नाट्यकृतीचा आज पार्ल्याच्या मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शुभारंभ प्रयोग !

**"घरपण नाही घराला" दोन अंकी नाट्यकृतीचा आज पार्ल्याच्या मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शुभारंभ प्रयोग !

मुंबई - ( दिपक कारकर )

आपल्या माणसांच्या सहवासाने, प्रेमाने आणि आपुलकीने सजतं ते घर आणि आणि ज्या घरात अशी आपुलकी प्रेम नसेल त्या घराला घरपण कधीच येतच नाही. अशाच एका घराची घरपण दाखवणारी नाट्यकलाकृतीचा नाट्यप्रयोग मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी श्री माऊली एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‌अदिश्री फोटोग्राफी ( अविनाश मांजरेकर ) निर्मीत, मिलिंद रेश्मा विनायक ठिक लिखित व अविनाश मांजरेकर दिग्दर्शित एक हृदयस्पर्शी दोन अंकी नाट्य कलाकृती "घरपण नाही घराला" आज गुरूवार  दि.२५ एप्रिल २०२४ रोजी रात्रौ ०८.०० वा. मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले ( पूर्व ) मुंबई येथे आयोजित केला आहे.सदर नाट्यकृतीत मयुरी निकम, स्नेहा गोलांबडे, साक्षी डोंगरे, प्रकाश गोरे, प्रशांत पाष्टे, स्वरुप सावंत, दत्ता पुनवत हे कोकणातील नवोदित कलाकार विशेष भूमिकेतून पहायला मिळतील. ह्या नाट्यप्रयोगाला प्रेम देण्यासाठी, कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी अविनाश मांजरेकर - ७०४५१६२५०९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Monday 22 April 2024

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजन !!

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजन !!

पुणे, प्रतिनिधी : भारतीय शालेय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्याद्वारे २३ ते २८ एप्रिल या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्धाटन २३ एप्रिल रोजी सायं ५.३० वाजता संकुलातील वॉर्मअप ट्रॅकवर क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक संजय सबनीस, सुहास पाटील, महाराष्ट्र रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा मीनल पटसाला, सचिव नासिर हुसेन आदी उपस्थित राहणार आहेत.

२३ व २४ एप्रिल रोजी १९ वर्षाखालील मुले व मुली तर २७ व २८ एप्रिल रोजी १७ वर्षाखालील मुले व मुली गटाच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगढ, गुजरात, बिहार, तामीळनाडू, राजस्थान, दिल्ली, जम्मू काश्मिर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांसह विद्याभारती, आयपीएससी, सिबीएसई अशा १५ संघांचे ७०० खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी होण्यासाठी क्रीडानगरीत दाखल झालेले आहेत.

राष्ट्रीय पातळीवरील रग्बीच्या शालेय स्पर्धा प्रथमच पुणे शहरात होत असून स्पर्धेस संपूर्ण तांत्रिक सहकार्य इंडियन रग्बी फुटबॉल युनियन यांनी दिलेले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघामधून एशिया रग्बी चॅम्पियनशिप स्पर्धेतील रजतपदक विजेते यश जाधव व नम्रता पाटील हे आंतरराष्ट्रीय खेळाडू हे प्रतिनिधित्व करतील. बिहार राज्याकडून आंतरराष्ट्रीय खेळाडू गुरिया कुमारी व अंशु कुमारी, दिल्लीकडून राष्ट्रीय खेळाडू शहबाज अन्सारी तसेच तामीळनाडूकडून राष्ट्रीय खेळाडू आकाश कुमार हे स्पर्धेमध्ये सहभागी होतील.

स्पर्धेच्या निमित्ताने देशातील विविध राज्यामधून आलेल्या खेळाडूंचे स्वागत पुणे शहरातील क्रीडाप्रेमी नागरीकांनी करावे तसेच जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडु व नागरीकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धा पहाण्यासाठी उपस्थित रहावे असे, आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केलेले आहे.

रायगड लोकसभा (३२) मतदारसंघासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात !!

रायगड लोकसभा (३२) मतदारसंघासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात !!
*८ जणांनी  घेतली माघार*

** मतदार संघात एकूण १६ लक्ष ६८ हजार ३७२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क 

रायगड, दि.२२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी  ३२ -रायगड लोकसभा मतदारसंघात आजच्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समक्ष स्वतः उपस्थित राहून एकूण २१ वैध उमेदवारांपैकी ८ जणांनी माघर घेतली आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिये बाबत माहिती देताना पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी श्री. जावळे बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.

*रायगड लोकसभा मतदारसंघात १३ उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत* होणार असून उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे--

1) श्री.अनंत पद्मा गिते (अपक्ष) (गळ्याची टाय)
2) श्री.अनंत बाळोजी गिते (अपक्ष) (चिमणी),
3) श्री.अनंत गंगाराम गिते, (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल),
4) श्री.नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष) (पत्रपेटी),
5) श्री. मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष) (मनुष्य व शिडी युक्त नाव),
6) श्री.प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (भारतीय जवान किसान पार्टी) (भेट वस्तू)
7) श्री.पांडुरंग दामोदर चौले, (अपक्ष) (जहाज),
8) श्री.सुनिल दत्तात्रेय तटकरे, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)(घड्याळ),
9) श्री. श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती, (अपक्ष) (हिरा),
10) श्री.अजय यशवंत उपाध्ये, (अपक्ष) (ऑटो रिक्षा),
11)श्रीमती अंजली अश्विन केळकर, (अपक्ष) ( बेल्ट),
12) श्री.अमित श्रीपाल कवाडे, (अपक्ष) (फुलकोबी),
13) श्रीमती कुमोदिनी रविंद्र चव्हाण, (वंचित बहुजन आघाडी)(प्रेशर कुकर)
 
  
*माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे* पुढीलप्रमाणे आहेत.

1) श्री.सुनिल दत्ताराम तटकरी, (अपक्ष)
2) श्री.आस्वाद जयदास पाटील, (Peasants and Workers Party of India)
3) श्री.अभिजित अजित कडवे, (अपक्ष)
4) श्री.नंदकुमार गोपाळ रघुवीर, (लोकराज्य पार्टी )
5) श्री.मिलिंद काशिनाथ कांबळे, (बहुजन समाज पार्टी आंबेडकर)
6) श्री.विजय गोपाळ बना, (अपक्ष)
7) श्री.गोपाळ यशवंतराव तंतरपाळे, (अपक्ष) 
8) श्री.अस्मिता एकनाथ उंदिरे, (अपक्ष)

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ३२  रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस्कारांची पायाभरणी करणे गरजेचे आहे. अनेक कलावंताना घडविण्याचे महतकार्य सार्वजनिक वाचनालय कल्याणने केले आहे. १६० वर्षाची वाचन परंपरा जपण्याबरोबरच या बालशिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीशीही नाळ वाचनालयाने जोडून ठेवली आहे. झगमगाटी दुनियेत चमकणारे कलावंत आपल्याला दिसतात पण त्यामागे त्यांनी घेतलेले अविरत श्रमही लक्षात घेतले पाहिजेत. पालकांनीही या पिढीच्या मनापर्यंत पोहचण्याकरिता त्यांना आपुलकीने जवळ घेतले पाहिजे तरच या पिढीतले अंतर कमी होईल असा मोलाचा सल्ला सुप्रसिद्ध निवेदक, मराठी कलाकार प्रणव भांबुरे यांनी सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित “चला ऐकुया गोष्टी आजींच्या” या बालशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बालगोपाळांना दिला. प्रसंगी सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या विविध उपक्रमांची माहिती व बालशिबिर आयोजनाचा मानस सह्ग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.  

                 सोम. दि. २२ एप्रिल २०२४ ते ३० एप्रिल २०२४ पर्यंत चालणाऱ्या शिबिरात प्रार्थना, गाणी, गोष्टी, मातीकाम, कापडी/कागदी फुले बनविणे, पॉट पेंटिंग, फुलांची रांगोळी तसेच इतर विविध प्रकारचे पारंपरिक खेळ घेण्यात येणार आहेत. प्रचंड उत्साहात ६० ते ७० बाळगोपाळांनी शिबिरात सहभाग नोंदविला आहे. वाचनालयाचे सरचिटणीस 'मा. श्री. भिकू बारस्कर' यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, ज्येष्ठ वाचक सभासद विजयसिंह परदेशी, ज्येष्ठ नागरिक संघ, सुभाष मैदान, कल्याण अध्यक्षा सुनिता मोराणकर, शुभदा जोशी, अनुष्का गोलिपकर, वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी देवळे, ग्रंथसेविका, पालक वर्ग, वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या शिबिराचे प्रमुख कु. वर्षा माने आहेत. 

आठवणीत रंगला १९८८-८९ च्या दहावीच्या बॅचचा ३५ वर्षांनी स्नेह मेळावा !!

आठवणीत रंगला १९८८-८९ च्या  दहावीच्या बॅचचा ३५ वर्षांनी स्नेह मेळावा !!

              आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा..!शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई -वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते.ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाही हे सत्य आहे.
      जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते... मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना आजचे नाही उरत भान.... क्षण ते परत ना येतील आता... तीच होती सुखाची खाण...आठवणी असतात अनेकांच्या, तुमच्या. माझ्या.. सर्वांच्या..प्रत्येकांची असते एक तरी आठवण...!
             शाळेतील  मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते.निमित्त होते जनता विद्यालय आंगवली विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह  मेळाव्याचे....रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु. पो.आंगवली गावातील जनता विद्यालय आंगवली  मधील सन १९८८-८९ ची बॅच मधील मित्र-मैत्रिणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येऊन  तब्बल ३५ वर्षांनी एकत्र येण्याचे ठरले.जनता विद्यालय आंगवली या स्कुलची एस.एस.सी १९८८- १९८९ ची बॅच मुंबई मध्ये प्रथमच सभा आणि स्नेह संमेलन रविवार दि. २१ एप्रिल २०२४रोजी सायं. ठिक ४ ते ७ या वेळेत सद्गुरु  क्लासेस,११० पहिला माला ,पर्ल सेंटर सेनापती बापट मार्ग, येवले चहाच्या दादर ( पश्चिम ) मुंबई -२८ येथे पार पडला.
              यामध्ये ११ मित्रमंडळीनी हजेरी लावली होती.यावेळी बालपणीच्या आठवणी तसेच स्वयं परिचया मधुन आपल्या कुटुंबाची माहिती आदान प्रदान केली. थट्टा मस्करी यात वेळ रंगून गेला होता.श्री. संतोष करंबळे, सौ. वैशाली बुरटे (गोंधळी ) दिलीप करंबळे, सुभाष सनगले, जयश्री मांगले  (लाड ), शांताराम गुडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.संतोष करंबळे यांनी यानिमित्ताने आपल्याला सोडून गेलेल्या (निधन ) मित्र -मैत्रीण यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.सौ.जयश्री मांगले (लाड), सौ.वैशाली बुरटे (गोंधळी ), सौ.जयश्री करंबेले (टेंगडे), सौ.मांगले अंजना तसेच सर्वश्री संतोष करंबेळे, शांताराम गुडेकर, दिलीप करंबेळे, विलास भोसले, सुभाष सनगले, सुनील परशराम, प्रकाश गोरुले यांनी या स्नेह मेळाव्यात सहभाग घेतला. ३५ वर्ष भेट न झालेले मित्र -मैत्रीण भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. वाढत्या वयानुसार सर्वांमध्ये बदल दिसला. त्या वेळचे मित्र -मैत्रीण पटकन ओळखुन येत नव्हतं. प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. कौटूबिक स्थिती सांगितली. मुले काय करतात. सहचरणी /पती काय काम करतात वगैरे... वगैरे...!हे सर्वं करत असताना जिवाभावाच्या मित्र -मैत्रीण बरोबर काही आपले सुख -दुःख व्यक्त करून मनमोकळे केले.जणू काही त्यांनी मनातील ओझे मोकळे केले असं म्हणता येईल.यावेळी सर्वांनी एक निर्धार केला आणि ठरवलं की, दरवर्षी एकदा तरी आपण भेटायचं आणि शाळेच्या जीवनातील तो आनंद परत मिळवायचा. शिवाय आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेत आवश्यकता असलेल्या काही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, काही शालेय उपक्रमना हातभार लावणे. कमी होतं चाललेला शाळेचा विद्यार्थी पट कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणे यावर श्री. दिलीप करंबळे, संतोष करंबळे, सुभाष सनगले यांनी सविस्तर चर्चा केली.

            क्षण ते आता उडून गेले... आठवणीं आठवाव्या लागत नसतात.आपोआप त्या आठवत असतात. पालटून गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात. परतीच्या प्रवासाला निघताना  सर्वांच्या डोळ्यात पाणी होते कारण एवढ्या वर्षांनी झालेली भेट काही क्षणातच संपणार होती.प्रत्येकाच्या मुखी एकच वाक्य होते पुन्हा कधी भेटायचे...!

श्री. शांताराम ल. गुडेकर 
विक्रोळी पार्क साईट, विक्रोळी (प.)
मुंबई -४०० ०७९
मोबाईल -९८२०७९३७५९

ठाणे जिल्ह्यातील ३२ हजार सरकारी कर्मचारी करणार टपाली मतदानाद्वारे मतदान !!

ठाणे जिल्ह्यातील ३२ हजार सरकारी कर्मचारी करणार टपाली मतदानाद्वारे मतदान !!

भिवंडी, दिं,२०, अरुण पाटील (कोपर) :
          शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांवर मतदान झालं. आता निवडणुकीच्या कामावर नेमलेले ठाणे जिल्ह्यातील ३२ हजार अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
         ठाणे जिल्हयातील  लोकसभा २०२४ निवडणुकीच्या कामावर नेमलेले ठाणे जिल्ह्यातील ३२ हजार अधिकारी, कर्मचारी. आणि पोलीस कर्मचारी टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणं शक्य नसल्यानं त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील अधिकारी आणि कर्मचारी टपालाच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
         ठाणे लोकसभा निवडणूक २०२४  मध्ये भिवंडी, कल्याण तसेच ठाणे या लोकसभा मतदार संघामध्ये पाचव्या टप्पात निवडणुका होणार आहेत. या अनुषंगानं ठाणे जिल्ह्यामध्ये निवडणूक कामासाठी नेमणूक झालेले 32 हजार अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या आहे. यामध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.
         भारतीय निवडणूक आयोगाकडील सुचनेनुसार निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी आणि कर्मचारी, तसेच अत्यावश्यक सेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचारी, तसेच पोलीस कर्मचारी यांना पोस्टानं मतपत्रिका न पाठविता पोस्टल फॅसिलिटेशन सेंटर तसेच पोस्टल वोटिंग सेंटरमध्ये मतदान करुन घेता येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर फॉर्म १२ आणि फॉर्म १२ डी उपलब्ध केले आहेत. अद्याप बऱ्यांच कर्मचाऱ्यांचं टपाली मतपत्रिकेचं अर्ज येणं बाकी आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम त्यांच्या मतदार संघामध्येच मिळणार आहे, असं कर्मचारी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचा वापर करून आपल्या पोलिंग बूथवर मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती, निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आली.
           मतदानाच्या कामासाठी अधिकारी याचं मत वाया जाऊ नये, म्हणून सरकारनं निवडणूक आयोगाचं मदतीनं कर्मचाऱ्यांसाठी केलेली ही विशेष व्यवस्थेचा फायदा घेऊन तीस हजार कर्मचाऱ्यांना मतदान करण्याचा हक्क बजावता येणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण देशभरात व्यवस्था करण्यात आली असून मतदानाचा टक्का यामुळं वाढण्यास मदत होणार आहे.

Sunday 21 April 2024

आम्हाला कोणाचेच आव्हान नाही, जनतेलाच नकोत निष्क्रिय खासदार - सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा)

आम्हाला कोणाचेच आव्हान नाही, जनतेलाच नकोत निष्क्रिय खासदार - सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा)

विरोधी पक्षातील नेत्यांचे सुध्दा आम्हाला सहकार्य - वैशाली दरेकर 


कल्याण, प्रतिनिधी : कल्याणमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांची संयुक्त पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातून काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश या प्रश्नाला उत्तर देताना सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक जवळ आली की अशा घटना घडत असतात, प्रत्यक्षात महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाही. जे गेले त्या पेक्षा जनतेलाच बदल हवाय हे महत्त्वाचे असे सांगितले.

महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही पण महायुतीतील कार्यकर्त्यांमध्येच नाराजी दिसून येत आहे, पहिल्यांदाच स्वतः खासदार आज संपूर्ण मतदारसंघात फिरताना दिसत आहेत यावरून लक्षात येते की मतदारसंघात त्यांच्या विषयी किती नाराजी आहे, दोन्ही मतदारसंघांत कोणतेही ठोस असे विकासाचे काम झाले नाही, गेले दहा वर्ष सत्तेत असूनही अजूनही विकासावरच बोलतात, मग गेले दहा वर्षात तुम्ही काय केलेत, कॉग्रेस पक्ष आमच्या सोबतच आहे. 

महाविकास आघाडीच्या भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभा या दोन्ही लोकसभा मधून उमेदवारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रवक्ते महेश तपासे, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद पाटील पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण लोकसभेत मतदारांना हवेत श्रीकांत शिंदेच पुन्हा खासदार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


कल्याणी लोकसभेत मतदारांना हवेत श्रीकांत शिंदेच पुन्हा खासदार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

** दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या विकासाची 

डोंबिवली, प्रतिनिधी : आज डोंबिवली येथे श्रीकांत शिंदे यांच्या कामाचा कार्यअहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे पुन्हा खासदार होतील, असे म्हटले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवाल प्रकाशित झाला. गेल्या १० वर्षांत जी प्रगती झाली, कल्याण लोकसभा मतदारसंघाचा जो सर्वांगीण विकास झाला, त्याची माहिती या अहवालात देण्यात आलेली आहे. भविष्यात या लोकसभा मतदारसंघाची गरज लक्षात घेऊन त्याचाही विचार या ठिकाणी होईल. अनेक वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघात जी कामे झाली नाही, ती गेल्या १० वर्षांत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत देशाचा विकास केला, त्याप्रमाणे कल्याणमध्येही वेगाने विकास झाला, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.


कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचा निर्णय, निश्चय आणि संकल्प केलेला आहे. फिर एक बार, श्रीकांत शिंदे खासदार, असा निर्धार मतदारांनी केला आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. मतदारांनाही शुभेच्छा देतो, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला.

यावेळी आमदार राजू दादा पाटील, आमदार बालाजी किणीकर, आमदार कुमार आयलानी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, सुलभा गणपत गायकवाड, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष, तसेच सर्व महायुतीतील नेते उपस्थित होते. यावेळी श्रीकांत शिंदेच कल्याण लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Saturday 20 April 2024

समेळगावातील नैसर्गिक नाल्याला स्थानिक महिलांकडुन एकत्र येत भावपूर्ण श्रध्दांजली....

समेळगावातील नैसर्गिक नाल्याला  स्थानिक महिलांकडुन एकत्र येत भावपूर्ण श्रध्दांजली....

***'नैसर्गिक नाला संवर्धन साठी महिला करणार आंदोलन...

         नानालासोपारा, प्रतिनिधी :- शहरातील उमराळे समेळपाडा, साई  नगर परिसरातील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहणारा ४० वर्षापासुनचा नैसर्गिक नाला बुजवण्यात आला असुन नगर रचना विभाग यांच्याशी संगणमत करून  त्याठिकाणी भव्य मोठे कॉलेज बांधण्याचे काम चालु आहे.
समेळपाडा उमराळे येथिल रहिवासी भाग वाढत चाललेला आहे. ज्यांनी नालाकाठी जागा घेतल्या, त्यांनी आपल्या आवश्‍यकतेप्रमाणे जागा वाढवून नाल्याचे पाणी वळविले.
काहीनी चक्क नालाच बुजवुन आरसीसी पाईप टाकुण त्याजागी बांधकाम केले आहे.

वास्तविक अंतिम लेआउट मंजूर करताना स्थळपाहणी करून मंजुरी देणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी न करता कार्यालयात बसूनच भुमाफीया यांना लेआउटला मंजुरी दिली आहे.

महापालिका नगर रचना विभागाचे अधिकारी व भुमी अभिलेख चे अधिकारी यांनी भुमाफीया यांचा आर्थिक फायद्यासाठी नकाशावरून नाला गायब करणे व पाहणी न करता बांधकाम करण्यास परवानगी देवून कायदेभंग केला आहे.

नैसर्गिक नाल्याचे रूपांतर नाली मध्ये झाले असुन सांडपाणी साचले आहे व येणारया पावसाळ्यात उमराळे, समेळपाडा व साई नगर परिसर पाण्याखाली जाणार असल्याची नागरीकांकडुन चिंता व्यक्त केली जात आहे.

अनेकवेळा मागणी करून हि कोणतेही कारवाई व नैसर्गिक नाल्याचे संवर्धन होत नसल्याने अखेर स्थानिक महिला एकत्र येत याचा विरोध करत आज नैसर्गिक नाल्याला श्रध्दांजली वाहिली व नैसर्गिक नाल्यावर बांधलेल्या कॉलज चा विरोधात मोठे आंदोलन करणार असल्याचे महिलांकडुन सांगण्यात आले. ....

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा २४ एप्रिलला गावक-यांकडून जय्यत तयारी; यात्रेचा लाभ घेण्याचे अशोक भोईर यांचे आवाहन !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा २४ एप्रिलला गावक-यांकडून जय्यत तयारी; यात्रेचा लाभ घेण्याचे अशोक भोईर यांचे आवाहन !!

मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
            देवाप्रति श्रद्धा ज्यांच्या मनात वास्तव्य करते अशा व्यक्तीना आपण आस्तिक म्हणून ओळखतो, खरे पाहिले तर मनात भाव व देवापरी भक्ती मनापासून जोपासली तर मनुष्याच्या हृदयातच देवाचे स्थान आहे. असे म्हटले जाते. या बाबी श्रद्धाळू माणसांना पटण्याजोगा नसतात. म्हणूनच ते जेथे देवाचे मंदिर आहे तेथेच देव दर्शनाला जातात. देशभरात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. त्यातही महाराष्ट्रात तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे.एन.पी.टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा नावाचे गाव आहे. न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.
           या गावाधील गावदेवीची यात्रा चैत्र शुद्ध कृष्ण पक्ष-१ बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.तसेच पालखी सोहळा गुरुवार दि. २५ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. गावामधील ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी झाली आहे. ग्राम सुधारक मंडळाचे __
गजानन पांडुरंग म्हात्रे -अध्यक्ष
जयेंद्र जनार्दन पाटील -उपाध्यक्ष
निलेश हरिश्चंद्र भोईर -उपाध्यक्ष
प्रेमनाथ नामदेव म्हात्रे -उपाध्यक्ष
सतीश दत्ताराम भोईर -उपाध्यक्ष
विनोद एकनाथ पाटील -खजिनदार
अनंत लहु म्हात्रे -सहखजिनदार
सदानंद जगजीवन पाटील -सहखजिनदार
विशाल लक्ष्मण ठाकूर -सहखजिनदार, 
विजेंद्र गणेश पाटील -सरपंच, 
राजेश गणेश म्हात्रे -उपसरपंच, ग्रामसुधारक मंडळ न्हावे, कमिटी आणि सदस्य, सभासद तसेच संबंधित अन्य पदाधिकऱ्यांनी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी- कोळी बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात.गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पहावे. असे आवाहन पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक दामू भोईर यांनी केले आहे.

Friday 19 April 2024

राष्ट्रीय कर्मचारी सेनेची महत्त्वाची बैठक राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयजी क्रिकेट क्लब बांद्रा येथे संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेची महत्त्वाची बैठक  राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयजी क्रिकेट क्लब बांद्रा येथे संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :
        राष्ट्रीय कर्मचारी सेनेची महत्त्वाची बैठक मा.आमदार शिवसेना सचिव, प्रवक्ता आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मान. श्री. किरण पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१९ एप्रिल २०२४ रोजी एमआयजी क्रिकेट क्लब बांद्रा येथे पार पडली. यावेळी मा.श्री.किरण पावसकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकी संदर्भात पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला की, प्रत्येक पदाधिकारी हा स्वतः उमेदवार आहे असे समजून कामाला लागा आणि जास्तीत जास्त महायुतीचे उमेदवार निवडून आणून आपण आपले लाडके मुख्यमंत्री मान.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे हात अधिक बळकट करूया. उपस्थित सर्वं मान्यवर आणि सर्वं उपस्थित पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांनी एकमुखाने त्याला पाठींबा दिला.

Thursday 18 April 2024

भिवंडी मतदारसंघात बदलाचे वारे !!

भिवंडी मतदारसंघात बदलाचे वारे !!

** सर्व सामान्यांचे नेतृत्व सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना वाढता पाठिंबा

भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात शहापूर, मुरबाड, वाडा तसेच मतदारसंघांतील ग्रामीण परिसरात कुणबी व आगरी समाज मोठ्या प्रमाणात आहे, भिवंडीचे दोन्ही मतदारसंघांत मुस्लिम मतदार जास्त संख्येने आहेत. 

मुळात हा मतदारसंघ कॉग्रेसचा गड मानला जातो तरी या मतदारसंघात यावेळी महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना देण्यात आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) तर्फे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना उमेदवारी दिली आहे.
.
आमच्या प्रतिनिधीनी मतदारसंघातील सर्व विधानसभेत अभ्यास केला असता व मतदारांची मते जाणून घेतली त्यात यावेळी स्वपक्षातील नेते व कार्यकर्ते यांचा विरोध असतानाही विद्यमान खासदार यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली त्यामुळे असलेली स्वपक्षीय नाराजी तसेच आज प्रचारात विद्यमान खासदारांनी आघाडी घेतली असली तरी मतदारांत त्यांच्या विषयी उत्साह दिसून येत नाही पण आज मा. शरदचंद्र पवार व मा. उध्दव ठाकरे यांच्या विषयी असलेली सहानुभूती तसेच विद्यमान खासदार यांची मतदारसंघातील निष्क्रियता व त्यांच्या विषयीची नाराजी, महाविकास आघाडीचा परंपरागत मतदार व सर्व सामान्य माणसांना आपलेसे वाटणारे नेतृत्व सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यामुळे बदल निश्चित होईल असे दिसत आहे.

श्री पाणबुडी देवी कलामंच तर्फे "श्री पाणबुडी चषक - २०२४" चे आयोजन ; प्रतीवर्षाची मानाची स्पर्धा !

श्री पाणबुडी देवी कलामंच तर्फे "श्री पाणबुडी चषक - २०२४" चे आयोजन ; प्रतीवर्षाची मानाची स्पर्धा !

मुंबई : (  दिपक कारकर  )

मुंबई सारख्या शहरात कोकणची लोककला जाखडी नृत्य/नमन/नाटक तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे दोन दिवसीय भव्य-दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार-रविवार २७/२८ एप्रिल २०२४ रोजी ही स्पर्धा शिरगाव मैदान, विरार ( पूर्व ) येथे होणार असून एकूण ३२ संघाचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.ही स्पर्धा खुला गट १६ संघ तर वाडी मर्यादित गट १६ संघ अशा स्वरूपाची असेल.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास ₹ ५०,००० /- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ₹ २५,००० /- व आकर्षक चषक,तर तृतीय व चतुर्थ क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघास प्रत्येकी ₹ ७०००/- व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.प्रत्येक सामन्यातील सामनावीर खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आदर्श संघ व उदोन्मुख खेळाडू अशी अनेक बक्षिसे समाविष्ट आहेत. स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवर व टेनिस क्रिकेट मधील अनेक नामांकित सितारे ह्या स्पर्धेतून खेळताना दिसतील. MCA पंच ह्या स्पर्धेचे खास वैशिष्ट्ये आहे. मंडळाचे अतिशय स्तुत्य व दर्जेदार आयोजन असून खेळाडू, प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, प्रोत्साहित करावे असे प्रतिपादन मंचाचे संस्थापक/अध्यक्ष संतोष घाणेकर व संपूर्ण मंचाने केले आहे.

स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी व अधिक माहितीसाठी महेश वीर - ९६९९२१५०३५, प्रदिप कातकर - ८८५०४३४९८८, श्रीनाथ केंबळे - ८६५२६०२७७५, निलेश हुमणे - ९७७३६७३०२१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री पाणबुडी देवी कलामंचतर्फे करण्यात आले आहे.

Wednesday 17 April 2024

जातीय सलोख्यासाठी भाकप ला मतदान करा.. काम्रेड देसले

जातीय सलोख्यासाठी भाकप ला मतदान करा.. काम्रेड देसले
 
परभणी, प्रतिनिधी.. भारतीय कम्युनिस्ट पक्ष देशात ज्या ज्या वेळी कष्टकरी अल्पसंख्यांक जनतेवर सरकारने दडपशाही, मनमानी, अन्याय, अत्याचार केला आहे, त्या वेळी त्यांचे सोबत सर्वसामान्यांच्या हितासाठी भाकप लढतो हा सार्वत्रिक अनुभव परभणीच्या जनतेला आहे. दुसरीकडे ६००/७०० किलोमीटर अंतरावरील नेते यांना केवळ जातीची मते जास्त आहेत म्हणून त्याच निकषावर महायुतीने परभणी मतदार संघाची उमेदवारी देणे हा मतदारांचा अपमान आहे, ते महाआघाडी चे उमेदवार सत्तेसाठी मांडवली करणार नाहीत त्याची गॅरंटी कोण देणार? 

त्यासाठी आपल्या मतदार संघातून ऊस कामगार, किसान, माथाडी कामगार यांचे नेते  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ उमेदवार का राजन क्षीरसागर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन पक्षाचे राज्य सह सचिव का राजू देसले यांनी रहीम नगर येथे आयोजित प्रचार सभेत केले.

सभेच्या अध्यक्षस्थानी का मेहबूब शेख होते, सभेचे दुसरे वक्ते मराठवाड्याचे शेतमजूर संघटनेचे नेते प्रा. राम बाहेती म्हणाले की, सी ए ए, एन आर सी लादून हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी यांना त्रास देणे शिवाय दुसरे उद्दिष्ट काय? विचारणा करून म्हणाले की, महागाई बेरोजगारी महिला अत्याचार या प्रश्नांना बगल देऊन मोदी सरकार जनतेला आणखी छळत आहे म्हणून ते बदलणे गरजेचे आहे.

या सभेत स्थानिक माजी नगरसेवक बशीर भाई म्हणाले की , कारवाईचे शस्त्र ज्या वेळेवर मुस्लिम तरुणांवर उभारले तसेच इस्रायलचे मुस्लिमांना वरील अत्याचार झाले  त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व राजन क्षीरसागरच धावून आले. असा कृतज्ञ पूर्वक उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला परभणी मतदार संघाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी आपल्या दहा-बारा मिनिटांच्या भाषणात मोदी सरकारने रन अँड हिट कायद्यात ड्रायव्हर लोकांना भरडण्याचा प्रयत्न केला तसेच संविधानाचे संकेत जाणून मनमानी तीन कायदे केलेत ते म्हणजे संविधानाला तिलांजली देण्याच्या प्रकारच होय सांगून भारतीय संविधान जातीय सलोखा कष्टकरी जनतेचा आवाज  उठवण्यासाठी माझी उमेदवारी आहे तरी मतदाराने साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

.                                         कॉम्रेड अमृत महाजन 

या सभेचे सूत्रसंचलन कॉ अब्दुल शेख यांनी केले सभेला बराच मोठा जनसमुदाय उपस्थित होता ** कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राज्य सचिव कॉ सुभाष लांडे यांचे नेतृत्वात माजी सचिव तुकाराम भस्मे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ हिरालाल परदेशी, कॉ नामदेव चव्हाण जळगाव चे शेतमजूर नेते कॉम्रेड अमृत महाजन, औरंगाबादचे माजी नगरसेवक कॉम्रेड अशपाक सलामी, नाशिकचे भास्कर शिंदे, द्वारका एम्बडवार, वर्धा, मुंबईचे कॉ प्रकाश बागवे, सूर्यकांत देसाई, लाल बावटा कलापथकाचे रवी देवांग, शाहीर अमीर शेख, कू प्राजक्ता कापडणे, सोनाली थवकर, तलहा शेख आदी राज्यभरातील नेते आदि खेडोपाडी प्रचार करीत असून मतदार संघ पिंजून काढत आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्याबाबत नियोजन करा - डॉ. सुहास दिवसे

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्याबाबत नियोजन करा - डॉ. सुहास दिवसे

पुणे, प्रतिनिधी : आपत्कालीन परिस्थितीत दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील  तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. सर्व संबंधित विभागाने नागरिकांना सोप्या भाषेत परंतू अद्ययावत माहिती देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.  

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर, शास्त्रज्ञ डॉ. मेधा खोले, एनडीआरएफचे दीपक तिवारी, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), तसेच सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

डॉ. दिवसे म्हणाले, पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित करुन त्याची माहिती प्रशासनाला, महापालिकांना द्यावी. त्याप्रमाणे पूररेषेखाली येणाऱ्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी.  सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पुल, रस्ते, पूरबाधित गावे आदीबाबतची माहिती सर्व संबंधित विभाग तसेच नागरिकांना माहिती द्यावी. पूरबाधित गावाच्या अनुषंगाने आपत्कालीन यंत्रणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व विभागांच्या समन्वयाने सज्ज ठेवावी.

आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालिन परिस्थितीचा विचार करुन नागरिकांना तात्काळ सेवा मिळेल, याबाबत नियोजन करावे. तालुकानिहाय रुग्णालय, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे, साधनसाहित्य तयार ठेवावे. साथीचे रोग व उपचारपद्धती आदीबाबत स्वतंत्रप्रणाली विकसित करावी. मान्सून काळात सर्पदंशाचे प्रमाण लक्षात घेऊन पुरेसा सर्पविष प्रतिबंधक लस साठा उपलब्ध ठेवावा. कृषी विभागाने  खरीप हंगामात पेरणीची वेळ लक्षात घेता आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करावी. 

पुणे महानगर व पिंपरी चिंचवड महानगर पालिकाक्षेत्रात मेट्रो रेल्वेमार्गिकेच्या व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. नदीपात्र तसेच रस्त्याच्या बाजूस मेट्रो रेल्वेमार्गिकेच्या कामांमुळे निर्माण होणारा मलबा लवकरात लवकरात काढून घेण्याची मेट्राने कार्यवाही करावी. पवना नदीपात्रात असलेली अतिक्रमणे, मलबा काढण्याची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करावी. दोन्ही महानगरपालिकाक्षेत्रात पावसाळ्यात कोसळणारी झाडे, मार्गिकेच्या बाजूस असणारा कचरा, झोपडपट्टीतील कचरा काढून घेण्याची कार्यवाही करावी. 

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर लक्षात घेता सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात. भीमा नदीच्या पात्राच्या परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील याकरीता परिसरातील मलबा काढण्याची कायवाही करावी. दौंड आणि नीरा- नरसिंगपूर येथे पूरपरिस्थिती निर्माण होते त्यामुळे पाटबंधारे, महसूल, पोलीस आदी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची तुकडी पुणे जिल्ह्यात असणे ही आपल्यादृष्टीने मोठी मोलाची बाब असून वेळोवेळी त्यांच्याकडून विविध विभागांनी प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. आपत्तीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणेने सामाजिक जाणीव ठेवून संवेदनशील राहून कामे करावे, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या. 

श्री. पाटील म्हणाले, मान्सून काळात हवामान खाते, पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने कामे करावीत.  

श्री. होसाळीकर म्हणाले, हवामान खात्याने १५ एप्रिल रोजी पर्जन्यमानाबाबत पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर केला. यानुसार सुमारे १०६ टक्के पर्जन्यमान होणार असून तो सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान आहे. उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने हवामान विभागाचा इशाऱ्याची वाट न पाहता आपल्या परिसरात ४० सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास नागरिकांनी खबरदारी घ्यावी.  नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता हवामान विभाग किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. होसाळीकर यांनी केले. 

यावेळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने करीत असलेल्या तयारीबाबत माहिती दिली. 

मी मतदान करणारच… इतरांनाही सांगणार ; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा वकील संघटने कडून जनजागृती !!

मी मतदान करणारच… इतरांनाही सांगणार ; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा वकील संघटने कडून जनजागृती !!

ठाणे, प्रतिनिधी - लोकसभेच्या ठाणे मतदारसंघात मतदारसंघात ७५ टक्केपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. याच उद्देश्याने ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून ठाणे जिल्हा कोर्ट येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. 

ठाणे जिल्हा कोर्ट परिसरात मतदान जनजागृती होर्डिंग्ज लावण्यात आले होते. ‘चुनाव का पर्व, देश का गौरव’ या टॅग लाईनखाली मी मतदान करणारच… इतरांनाही सांगणार, ‘आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा’ असा संदेश स्वीप टीमने सर्व वकिलांना दिला. 

वकिलांनी आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व येणाऱ्या अशिलाना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन उपस्थित वकिलांना स्वीप पथकाच्या वतीने करण्यात आले. 
     
मतदान जनजागृती कार्यक्रम १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या नियोजनाखाली आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात विशेष मोहिम मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज दाखले करण्याचे आवाहन !!

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात विशेष मोहिम मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज दाखले करण्याचे आवाहन !!

अलिबाग, प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात दि. 10 ते दि. 25 एप्रिल 2024 या कालावधीत समता पंधरवडयात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे.  

इ.11 वी व इ. 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या, तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये याकरिता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. 

ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरीत अर्ज सादर करावेत.  ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत, परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा विद्यार्थ्यांनी दि. 22  ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी.

वेळेत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा. तसेच वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने  प्रवेशापासून वंचित राहण्याची परिस्थिती उद्भवते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर असा बिकट प्रसंग येऊ नये. यास्तव ही मोहिम राबविण्यात येत आहे असे आवाहन विशाल नाईक, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात पडताळणी समिती, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

लोकसभेत जनतेचा खरा खुरा आवाज उठवणेसाठी भाकपला संधी द्या.. खा.पाशा

लोकसभेत जनतेचा खरा खुरा आवाज उठवणेसाठी भाकपला संधी द्या.. खा.पाशा

जिंतूर, प्रतिनिधी.. सध्याच्या राजकारणात सत्ताधारी पक्षाला विरोध करणारे कोणी राहू नये म्हणून भाजप मोदी सरकार विरोधी पक्षांना फोडून जनतेचा आवाज दाबून टाकत आहे. त्यातच निवडलेले लोकप्रतिनिधी त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक राहतीलच अशी खात्री नाही परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्ष याबाबतीत अपवाद आहे तसेच इलेक्शन बॉण्ड मध्ये भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे नाव नाही.. इलेक्शन बॉण्ड मध्ये सत्ताधारी पक्षाला जास्त निधी देणारी कोण आहेत ? याचीही नाव जाहीर झालेली आहेत.. 

अशा स्थितीत लोकशाहीचे भवितव्य व भारताचे संविधान धोक्यात आलेले आहे. लोकसभेमध्ये जनतेचा आवाज मजबूत करण्यासाठी परभणी मतदार संघातून भाकपाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांना लोकसभेत पाठवा असे आवाहन जिंतूर येथे काँ आसाराम बुधवंत यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सभेचे खासदार कॉम्रेड अजित पाशा यांनी केले त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार काँग्रेस राजन क्षीरसागर यांनी परभणी जिल्ह्याचे मागासलेला विकास, शेतकऱ्यांचे दैण्यवस्था त्याचप्रमाणे सध्याच्या राजकीय परिस्थिती कदल बदलू राजकारण यावर प्रकाश पाडला व माजी उमेदवारी का? याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले या सभेत महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष हिरालाल परदेशी कर्नाटक किसान सभेचे सचिव का मौलवी मुल्ला तसेच आयटक राज्यसह सचिव का माधुरी  क्षीरसागर आधी नेत्यांनी आपली मनोगत व्यक्त केली

२०२४ लोकसभा सभा निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत.. 'भाकप'

२०२४ लोकसभा सभा निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत.. 'भाकप'

.                                           कॉर्मेड अमृत महाजन 

परभणी, प्रतिनिधी.. या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप छायेत असून नक्की  पराभव होणार ! हे नरेंद्र मोदी यांच्या वृत्त वाहिन्यांवरील चेहऱ्यावरील दिसत असलेल्या  तणाव ग्रस्त चेहऱ्याने स्पष्ट दिसून येत आहे. असे भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवार कॉ. राजन क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना पक्षाचे माजी खा. अजीज पाशा यांनी सांगितले 

ते पुढे म्हणाले की भाजपाने श्रीधरन यांना पुढे करून  केरळमध्ये पाय जमवण्याचा प्रयत्न केला काही उपयोग झाला नाही म्हणून खोटी केरळ स्टोरी दाखवून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. शेवटी माफी मागावी लागली सांगून आखाती देशात वाघाच्या शिकारीत दोषी ठरलेल्या  केरळी मुलाचा दंड 'सात कोटी' दंड भरणेसाठी हिंदू मुस्लिम जनतेने रोज एक कोट रु निधी गोळा करून मुलाची सुटका केली ही खरी केरळी स्टोरी आहे पण गोदी मीडिया हे दाखवटणार नाही असे स्पष्ट केले.  सभेचे प्रमुख वक्ते पक्षाचे सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले की, डावे पक्ष ७० /७५ जागा लढवीत आहेत. देश पातलीवर पर्याय निर्माण करणेसाठी डाव्यांनी देशभर वातावरण निर्मिती केली. त्यातून इंडिया आघाडी आकारास आली सांगून केरळ मध्ये काँग्रेस विरुद्ध डावे पक्ष असाच मुकाबला होत असला. तरी भाकप  लोकशाही संविधान धर्मनिरपेक्षता साठी धर्मनिरपेक्ष कटिबध्द आहे असे स्पष्ट केले ते पुढे असेही म्हणाले की, गेल्या दहा वर्षातील भारतीय जनता पार्टी आरएसएस मोदी सरकार काळात जगभरातील भारताचे स्थान घसरत आहे. उदाहरणार्थ भूक निर्देशांकात  आपले स्थान अधिकार नेपाळ बांगलादेश पेक्षा खाली पातळीवर आहे. भाषण स्वातंत्र्य तसेच जीडीपी अल्पसंख्यांक यांचे अधिकार याबाबत खालच्या पायरीवर आहे. असे उदाहरणे दिली.

परभणीच्या गजबजलेल्या अपना कॉर्नर जवलील आपला दवाखाना शेजारी झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे होते. त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील राजकारण.. खोके, मराठा विरुद्ध ओबीसी हिंदू विरुद्ध अल्पसंख्यांक असे जातीय वादात परिवर्तन करून  राजकारणात विष कालवण्याच्या भाजप आरएसएस चे निती चा भांडाफोड केला .या सभेत कर्नाटक किसान सभेचे नेते मौला मुल्ला व औरंगाबाद येथील तांजीमे इन्साफ संगटनेचे नेते का अश्फाक सलामी यांचेही दणदणीत भाषणे झाली .सभेचे सूत्रसंचालन ऍड माधुरी क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शनाचे भाषणात काँ अब्दुल शेख यांनी केले ते म्हणाले की, गेल्या 2 वर्षापासून नगरपालिका जिल्हा परिषद निवडणूका तहकुब झाले आहेत अशा तऱ्हेने 2024 नंतर पुढील लोकसभा विधानसभा निवडणुका तहकुब होतील असा इशारा त्यांनी दिला व कॉ. राजन क्षीरसागर यांना निवडून देण्याचे आवाहन केले.सभेला चांगला जनसमुदाय जमला होता........

.का अमृत महाजन 9860520560

एमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल पुणे आयोजित CSR पुरस्कार २०२४ मध्ये पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी CSR उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित !!

एमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल पुणे आयोजित CSR पुरस्कार २०२४ मध्ये पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी CSR उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित !!

       बोरघर / माणगाव, (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिक्षण, पर्यावरण, आरोग्य तसेच इतर कल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवत असते तसेच आसपासच्या परीसातील स्थानिक लोकांचे जीवनमान उचंविण्यावर आणि सक्षमीकरण करण्यावर कंपनीने नेहमीच भर दिला आहे. 
     एमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल पुणे आयोजित CSR पुरस्कार २०२४, पुरस्कार सोहळा १६ एप्रिल रोजी पुणे येथे पार पडला यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कंपन्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये सुमारे १०० हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता आणि या पुरस्कारामध्ये पोस्को महाराष्ट्राची पहिल्या दहामध्ये निवड झाली होती. पहिल्या दहा मधील सर्व निवडलेल्या कंपन्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 
     एमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल पुणे CSR पुरस्कार २०२४ चा हेतू व्यवसायांमध्ये सामाजिक जबाबदारीची संस्कृती वाढवणे तसेच अनुकरणीय CSR पद्धती प्रदर्शित करणे तसेच इतर कंपन्यांना प्रेरणा देणे आणि कंपनी प्रतिनिधींना समाजाला परत देण्याचे महत्त्व समजून देणे हा होता.
     पोस्को कंपनीने CSR उपक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतल्या बद्दल निवड समितीने कौतुक केले. हा पुरस्कार केवळ आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीचीच कबुली देत नाही तर एक चांगला समाज निर्माण करण्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतो, अशी भावना यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...