Friday 1 September 2023

भटक्या प्राण्याकरीता कल्याण डोंबिवलीतील पहिले ट्रिटमेंट सेंटर डोंबिवली (पश्चिम) येथे सुरू !!

भटक्या प्राण्याकरीता कल्याण डोंबिवलीतील पहिले ट्रिटमेंट सेंटर डोंबिवली (पश्चिम) येथे सुरू !!

डोंबिवली, प्रतिनिधी : फॅक्ट्स फॉरेव्हर ऍनिमल केअर ट्रस्टेड सोसायटी ( FACTS -Forever Animal Care Trusted Society ) या सामाजिक संस्थेने डोंबिवली पश्चिम येथे, भटक्या प्राण्यांना  अल्प दरात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी सुरू करत असलेल्या ट्रीटमेंट सेन्टरचे आज १ सप्टेंबर २०२३ रोजी उद्घाटन करण्यात आले. भटक्या प्राण्याकरीता हे कल्याण डोंबिवली परिसरातील पहिले असे सेंटर आहे.

सदर सेंटरचे उद्घाटन डोंबिवलीतील वरिष्ठ प्राणीमित्र सौ. अलका कुलकर्णी व सौ‌. शोभा नायर यांचे हस्ते करण्यात आले. सदर ठिकाणी भटके कुत्री मांजर यांचे अल्प दरात इलाज, त्यांची लोकसंख्या संतुलित राहावी या साठी सर्जेरीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेखा रेडकर यांनी दिली . 

प्राणीमित्र आपापल्या परिसरातील भटके कुत्री मांजर यांना  आपल्या सेंटर ला घेऊन येऊन मोफत एंटी रॅबीस चे लसीकरण करून घेऊ शकतात, सदर सेवा निशुल्क ठेवण्यात आलेली आहे असे संस्थेचे सल्लागार आकाश वेदक यांनी सांगितले  .

सदर उदघाटन सोहळ्यासाठी अध्यक्षा रेखा रेडकर ,उप अध्यक्ष रवी राणे, डॉ मोहन बळीराम गुट्टे प्राणीमित्र अलका कुलकर्णी, शोभा नायर, स्वप्नील नार्वेकर, आकाश वेदक, रचित देढिया उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क - आकाश वेदक (सल्लागार)
9930013926

4 comments:

  1. My compliments to the entire team of FACTS for establishing thus stray animals welfare centre at Dombivali. May God bless you all. .... G R Vora (Mumbai, Cell 9869195785).

    ReplyDelete
    Replies
    1. Correction.... not thus but "this". :)

      Delete
  2. God blessed Job You are doing .... Hatts off to you all...Was must Required at Dombivali.... Great Initiative

    ReplyDelete
  3. May god bless all your hard works and hatts off to your all efforts…
    Success is on your way…🙏🏻🙏🏻

    ReplyDelete

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...