कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा..
घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत..
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सावळा गोंधळ माहिती अधिकार कार्यकर्ते जय यांना ५ जानेवारी २०२६ रोजी जन माहिती अधिकारी तथा प्रभारी मुख्य स्वच्छता अधिकारी अगस्टीग घुटे हे स्वतःला मुख्य स्वच्छता अधिकारी समजतात यांनी दिलेल्या बनावट व दिशाभूल करणाऱ्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दैनंदिन साफसफाई रस्ते गटार कचरा उचलणे चौक गल्ली आणि पर्यावरणातील प्रदूषण थांबवणे इत्यादी कामे केली जातात. याकरिता नागरिकांकडून युजर चार्जेस घेतली जातात याकरिता नागरिकांना दर्जेदार स्वच्छता देणे गरजेचे आहे. परंतु महानगरपालिकेचा पगार घेऊन सफाई कर्मचारी नियमित आणि दैनंदिन साफसफाई करणे गरजेचे आहे. याकरिता महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना सफाई कामगारांचे फायदे दिले जातात. उदाहरणार्थ सफाई कामगारांचे मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या मुलांना वारस हक्काने नोकरी दिली जाते. कर्मचारी स्वच्छ रहावे याकरिता धुलाई भत्ता दिला जातो कर्मचारी यांना कामाच्या तासात सवलत दिली जाते. परंतु काही कर्मचारी याचा फायदा घेऊन घाणीचे काम न करता इतर खात्यात काम करण्याचे पसंत करतात.
यातूनही काही कर्मचारी बाहुबली असून राजकीय वरदहस्त याचा फायदा घेणे, साफसफाईचे काम न करणे आरोग्य निरीक्षकांना दमदाटी करणे मारहाण करणे मोठ्याने बोलणे तसेच कामावर न येणे यामुळे दैनंदिन साफसफाईच्या कामात व्यत्य येत असून घाणीचे साम्राज्य पसरून ठिकठिकाणी कचरा साठणे गटारी भरणे ओला सुखकचरा व्यवस्थित न होणे इत्यादी बाबी निदर्शनास येतात.
वास्तविक पाहिले तर ४०० ते ५०० कर्मचारी इतर खात्यात काम करत आहेत सदर कर्मचाऱ्यांना प्रशासनाने सरसकट सफाई कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करून इतर खात्यात वर्ग करावा आणि चारशे ते पाचशे कर्मचारी नवीन भरती करावे जेणेकरून साफसफाई नियमित आणि दर्जेदार होईल.
नुकतेच आता माहिती अधिकारात पंधरा दिवसापेक्षा जास्त गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागितली असता एकूण १० प्रभागात ४९ कर्मचारी गैरहजर असल्याची माहिती मिळाली आहे. सदर कर्मचाऱ्यांवर कोणत्या स्वरूपात कार्यवाही केली जाते असे विचारणा केले असता महापालिका अधिनियम १९४९ कलम ५६ अन्वये शिस्तभंगाची कारवाई केली जाते असे मुख्य स्वच्छता अधिकारी घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी माहिती दिली आहे. वास्तविक पाहता कलम ५६ अन्वये कारवाई केल्यास एकही कर्मचारी गैरहजर राहण्याची हिंमत करणार नाही. परंतु सदर कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन थातूरमातूर कारवाई करून कर्मचाऱ्यास अभय दिले जाते.
यामध्ये असा एक कर्मचारी निदर्शनास आला आहे. विनोद वसंत वाघेला घनकचरा व्यवस्थापन विभागात काम न करता दमदाठी करणे एसीबी कडे तक्रार देणे आणि काही वर्षापूर्वी एका अधिकाऱ्याला यांनी ऑन ड्युटी मारहाण केली. त्यासाठी सदर कर्मचाऱ्यास निलंबित केले होते.
निलंबित होऊन देखील सदर कर्मचाऱ्यावर कुठलाही फरक पडलेला दिसून येत नाही. सदर कर्मचारी फेरीवाला हटाव पथकात बदली मिळणे करिता चुकीचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करून काही अधिकाऱ्यांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न देखील केलेला दिसतो. त्यानंतर अद्याप सदर कर्मचारी कामावर हजर झालेला नाही. म्हणजेच प्रशासनाची कर्मचाऱ्यांवरती धाक दिसून येत नाही. महापालिकेत लागणे म्हणजे सेवा नसून केवळ कमाईचे एक साधन झालेले दिसते त्यातल्या त्यात २ फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या आदेशामध्ये सुरेश परमार मालती देसले सुमन चव्हाण इत्यादी कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्याने खाडे करण्याचे आदेश पारित केले आहेत.तरीही हे कर्मचारी हजर न होता बदलीसाठी प्रयत्न करतील कामावर रुजू होणार नाहीत. म्हणजेच कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज दिसून येत नाही अशा कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून रिक्त जागेवर नवीन कर्मचारी भरती केल्यास स्वच्छतेत मोठ्या प्रमाणात फरक जाणवेल असे वाटते.
नुकतेच महापालिकेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड झाली असून जनता यांच्याकडून नक्कीच बदल होईल या आशेने पाहत आहेत.
No comments:
Post a Comment