मुलाच्या अपघाताचा धसका अन् आईने जीव सोडला, माय-लेकाचं प्रेम पाहून सारं हळहळलं..
*मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची नाईक कुटूंबास सांत्वन भेट...*
नालासोपारा, प्रतिनिधी ता, ४ : आईचं आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असते. ती कधीच आपल्या मुलांना त्रास झालेला पाहू शकत नाही. पण, जेव्हा एका आईला आपल्याच मुलाचा अपघात झाल्याचे कळताच त्यापेक्षा वेदनादायी या जगात काही नाही असं म्हणतात. हे दु:ख पचवणं जवळपास अशक्य असतं. असंच काहीसं नालासोपारा येथिल समेळपाडा येथे घडलं आहे. जिथे आपल्या मुलाच्या अपघाताचा आईने इतका धसका घेतला की आपले प्राण त्यागले
शिवसेनेच्या माजी शहरप्रमुख रूचिता नाईक यांचे पती अमित नाईक वय ३२ याचा उमराळे रोड नालासोपारा येथे अपघात झाला हे त्यांच्या आईला कळताच मयुरा ( माई ) नाईक वय ६२ यांची प्रकृती आधीच खालावली असताना अपघात घटनेची माहिती मिळताच व मुलाला बघताच आईनेही आपले प्राण सोडले. अशाप्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेने एकच शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मनसेचे अविनाश जाधव यांनी नाईक कुटूंबाची सांत्वन भेट घेत आधार दिला.
यामुळे नुकत्याच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या रूचिता नाईक यांच्या कुटूंबाची मनसेचे अविनाश जाधव यांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत वैभव पवार यांनी मोफत रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देत व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले.
No comments:
Post a Comment