नवनिर्माण महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष खरे यांना पीएच.डी.पदवी प्रदान !!
मुंबई (शांताराम गुडेकर)
नवनिर्माण कला,वाणिज्य व विज्ञान (एच एम) महाविद्यालय, संगमेश्वर (जि. रत्नागिरी) येथील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष नवनीत खरे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
श्री.खरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील 'अनाथ मुलांचा समाजशास्त्रीय अभ्यास' या महत्त्वपूर्ण विषयावर त्यांचा संशोधन प्रबंध सादर केला होता. यामध्ये अनाथ मुलांबाबत केलेल्या अभ्यासात सामाजिक दृष्टीकोनाचे तात्विक व सैद्धांतिक विश्लेषण प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. हे संशोधन कार्य शिवाजी विद्यापीठ सलग्न मार्गदर्शक प्रा. डॉ. महेंद्रकुमार आनंदराव जाधव, नाईट कला व वाणिज्य महाविद्यालय, कोल्हापूर येथील प्राध्यापक व समाजशास्त्र विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख, प्रा. डॉ. बी. एन. केंद्रे यांनी सदर प्रबंधाचे एक बाहिस्त परीक्षक म्हणून काम केले आहे.तसेच दुसरे बाहिस्त परीक्षक प्रा.डॉ. रमेश मकवाना सरदार पटेल विद्यापीठ, आनंद नगर, गुजरात, यांनी या संशोधनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.दोन्ही मान्यवरानी या प्रबंधाच्या दर्जेदार संशोधनाची प्रशंसा केली. प्रा. संतोष खरे यांच्या या यशाबद्दल मित्र, अभ्यासक, विद्यार्थी व संशोधकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment