Friday, 13 March 2026

बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !!

बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !!

** उचल वजा करून मिळणार रक्कम, मागणी अखेर मान्य

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : अखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगारांना २०२०-२१ ते २५- २६ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी लागू होणारा बोनस करार झाला त्यानुसार उचल वजा करून उर्वरित रक्कम संबंधितांना मिळणार आहे .

    केंद्रीय श्रम आयुक्त यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या करारावर भारतीय मजदूर पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील, डी पी सोनवणे, ऑल इंडिया पोर्ट अँड डॉग वर्कर्स फेडरेशन, इंडिया फोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन, वॉटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन, पोर्ट डॉक अँड वॉटर फ्रंट फेडरेशन ऑफ इंडिया , इंडियन पोर्ट असोसिएशनचे चेअरमन सुशील कुमार सिंग, एम.डी.विकास नरवाल तसेच सर्व बंदरांचे चेअरमन, सर्व पदाधिकारी,नंदकुमार राणा, कृष्णमूर्ती, सत्यनारायण, सुधाकर अपराज, विद्याधर राणे, अबुलकर, सर्वनंद, प्रकाश या सर्वांच्या वतीने व सहा मान्यता प्राप्त महासंघांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या .

     या करारामुळे पी एल आर (बोनस)ची प्रलंबित मागणी मान्य झाली आहे. गेली चार वर्षे सर्व गोदी कामगारांना बोनस म्हणून उचल (ऍडव्हान्स) रक्कम दिली जात होती. आता करार झाल्यामुळे प्रत्येक पोर्ट प्रमाणे बोनसची टक्केवारी जाहीर होणार आहे हा बोनस करार इंडस्ट्रियल करार कोड प्रमाणे व्हावा ,अशी आयपीए व लेबर कमिशनर यांची सूचना होती. परंतु गोदी कामगार महासंघाचा त्यास विरोध असल्यामुळे अखेर मान्यता प्राप्त अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाच्या मागणीनुसार औद्योगिक कलह कायद्यानुसार करार मान्य करण्यात आला.

No comments:

Post a Comment

बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !!

बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !! ** उचल वजा करून मिळणार रक्कम, मागणी अखेर मान्य उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : ...