Saturday, 3 June 2023

कल्याण येथे संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन !!

कल्याण येथे संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन !!


कल्याण, प्रतिनिधी दि. ०३ : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबत केलेल्या कृत्याचा आज (शनिवारी) शिवसेना शिंदे गटाकडून निषेध करून राऊत यांच्या पोस्टर्सला जोडो मारो आंदोलन करण्यात आले आहे.


कल्याणमधील शिवाजी चौकात शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांना श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी थुंकण्याची कृती केली होती. संजय राऊत यांच्या या कृतीविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, शनिवारी कल्याणमध्ये त्यांचा निषेध करण्यात आला. या वेळी अनिरुद्ध पाटील, छाया वाघमारे, नेत्रा उगले, कोटक भाभी, मोहन उगले, सुनील खारूक, जयवंत भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...