लोकांचे दोस्त तर्फे," सरकार विरुद्ध सर्व समाज "परिषदेचे आयोजन
--------------------------------
मुंबई,दिनांक ११(प्रतिनिधी):
लोकांचे दोस्त संघटनेतर्फे विविध भारतीय जाती,जमाती,समाज संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची,"सरकार विरुद्ध सर्व समाज परिषद"आयोजित करण्यात आली आहे.या परिषदेला मुंबई,ठाणे,पालघरसह राज्याच्या अनेक भागातून विविध समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
रविवार १८ नोव्हेम्बर रोजी गोरेगाव,आरे कॉलनी येथील न्यूझीलंड होस्टेलमध्ये दुपारी २ ते संध्याकाळी ७ या वेळेत ही परिषद होत आहे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकरने सर्वच जाती,जमाती आणि समाज समूहांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे.या पार्श्वभूमीवर सर्वच समाजांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या परिषदेला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन लोकांचे दोस्तचे अध्यक्ष रवि भिलाणे,प्रमुख आयोजक संजय शिंदे,बाळासाहेब उमप,भानुदास धुरी,काशिनाथ निकाळजे,ममता अडांगळे ,संजीवनी नांगरे,नसीम शेख,ज्ञानेश पाटील,राजा आदाटे,विनायक साळुंखे,शशी सोनावणे, फिरोज मिठीबोरवाला आदींनी केले आहे.
Wednesday, 14 November 2018
"सरकार विरुद्ध सर्व समाज" परिषद होणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!
नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा.... *** आम्ही नगरकरांच्या वतीने "रस्ता व दरीच्या संरक्षक भिंतीं"वर रिफ्लेक्टर (परावर्तक ) ल...
-
"करकरे साहेब क्षमस्व" मा.करकरे साहेब आणि शहिद साथी, आम्ही दिलगीर आहोत, निर्दयी आहोत, कृतघ्न आहोत, नालायक आहोत, पात्रता...
No comments:
Post a Comment