Wednesday 14 November 2018

मांडा-टिटवाळा येथे जनसुनावणीचा उडाला फज्जा

टिटवाळा येथे पर्यावरण विभागाच्या जनसुनावणीचा झाला फज्जा

टिटवाळा येथील होणाऱ्या डंपिंग ग्राऊंडला सर्व स्तरातून विरोध

सर्व पक्षीयांचा सुद्धा डंपिंग ला विरोध

टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल)
             टिटवाळा हे श्री क्षेत्र व पर्यटन स्थळ असून देखील महाराष्ट्र प्रदूषण विभागाने येथे बुधवारी जनसुनावणी डंपिंग ग्राउंड बाबतीत ठेवली होती. या डंपिंग ग्राऊंडला सर्व टिटवाळा-मांडा परिसरातील नागरिक विविध संघटना , पक्ष यांनी  विरोध करीत या पर्यावरण विभागाच्या पदाधिकाऱ्यांची जन सुनावणी उधळून लावून त्यांचे म्हणणे ऐकूनच न घेता फक्त नागरिकांचे म्हणणे ऐका असे उपमहापौर व येथील नागरिक सौ. उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी ठणकावून सांगत यावर अधिकाऱ्याना जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यास भाग पाडले.व यात सर्व पक्षीय पदाधिकारी एकत्र येऊन या डंपिंग ग्राऊं ग्राऊंडला विरोध दर्शविला.
           येथील स्थानिक नगरसेविका व उपमहापौर सौ.उपेक्षा शक्तिवान भोईर याही बऱ्याच वर्षांपासून या मांडा-टिटवाळा येथे होणाऱ्या डंपिंग ला विरोध करीत आहेत. तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक हेही विरोध करून ठीक-ठिकाणी मिटिंग घरून निषेध व्यक्त केला. आज पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी येथे आले असता त्यांनी विद्यामंदिर शाळेत ही जनसुनावणी स.१२ वा.आयोजित केली होती. सकाळ १० वाजेपासूनच येथे मांडा-टिटवाळा येथील नागरिक, विविध संघटनेचे कार्यकर्ते व सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते हजर होत होते. जनसुनावणी शाळेच्या वरील हॉल मध्ये होती पण वरील हॉल मध्ये जमलेले नागरिक येण्यास तयार नव्हते. प्रचंड जनसुमुदाय येथे जमल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. शेवटी अधिकाऱ्यानी नमते घेऊन जनसमुदायासमोर खालील पटांगणात जनसुनावणी सुरू केली.
           जनसुनावणी सुरू करण्याअगोदर येथील स्थानिक नागरिकव कंडोमनपाच्या उपमहापौर सौ.उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी अधिकाऱ्यानं सांगितले की, तुम्ही जे सांगणार आहात व स्क्रीन वर जे दाखविणार आहात ते आम्हाला माहीत आहे. आम्हाला तुमचे काहीच ऐकायचे नाही. जनसुनावणी मध्ये तुम्ही नागरिकांचे म्हणणे अगोदर ऐकून घ्या व या प्रकल्पाला आमचा पूर्णपणे विरोध आहे. म्हणून आम्ही तुमचे काहीच ऐकून घेणार नाही. त्यानुसार नागरिकांनी त्यांचे मत व्यक्त करून त्याची नोंद पर्यावरण अधिकाऱ्यानी घेतली.
              या जनसुनावणी मध्ये, प्रस्तावित प्रकल्प हा नदीजवळ असल्याने पुरकालीन स्थिती येथे आल्यास प्रकल्प पूर बाधित होऊ शकतो. हे क्षेत्र भारत सरकारच्या केंद्र शासनाच्या बी एम टी सी सी च्या प्रकाशित नकाशा नुसार हे क्षेत्र भूकंप बाधित आहे. येथून ३०० मी. चया आसपास नागरी वस्तीला ५५ डेसीबील आवाज झाल्यावर पर्यावरण नियमांचे उल्लंघन होते. व विशेष म्हणजे मांडा-टिटवाळा हे श्री क्षेत्र व पर्यटन क्षेत्र मंजूर असल्याने येथे डंपिंग प्रकल्पाला विविध संघटना, पक्ष व दक्ष नागरिक या मुद्द्यांवर अधिकाऱ्याचे लक्ष वेधले. शेवटी अधिकाऱ्यानी सांगितले की या ज सुनावणीच्या बाबतीत आम्ही आमचा अहवाल व हा निषेध शासनाला कळऊ.
                या जनसुनावणी मध्ये स्थानिक नागरिक व उपमहापौर सौ. उपेक्षा शक्तिवान भोईर, नगरसेविका सौ. अपेक्षा बंदेश जाधव, नगरसेविका सौ. नमिता मयूर पाटील, नगरसेवक संतोष काशीनाथ तरे, राष्ट्रवादी चे मोरेश्वर (अण्णा) तरे, शिवसेनेचे किशोर शुक्ला, संभाजी ब्रिगेड चे प्रभाकर भोईर,  एड. जयेश वाणी, मनसेचे सावंत, भूषण जाधव, भाजपचे परेश गुजरे, अमोल गुजरे, शक्तिवान भोईर, सन्नी जाधव, राम भोईर, मधुकर भोईर, सर्व पक्षीय नेते-कार्यकर्ते व हजारो महिला , पुरुष या जनसुनावणी मध्ये सहभागी होते.
          

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...