Sunday 18 November 2018

कल्याणमध्ये सुरक्षा महावोकेथॉन ने जनजागृती

कल्याण येथे रस्ता सुरक्षा महावोकेथॉन चे आयोजन

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण चा उपक्रम

कल्याण - (जैनेंन्द्र सैतवाल )
             संपूर्ण जगभरात प्रत्येक वर्षातील नोव्हेंम्ब महिन्याचा तिसरा रविवार हा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहून त्यांची आठवण काढण्याचा दिवस. म्हणजे world day remembrance for road sefty victim म्हणून मानला जातो. १९९३ पासून ही प्रथा सुरू झाली. यास संयुक्त महासंघानेही मान्यता दिली आहे. अपघातात मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जनजागृती म्हणून या दिवसाचे आयोजन केले आहे.
           अतिवेगाने वाहन चालविणे, मद्यपान व अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालविणे, चार चाकी वाहन चालक हे सीट बेल्ट चा वापर न करता वाहन चालविणे, हेल्मेट शिवाय दुचाकी वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाइल वर बोलणे, एस एम एस व w up चा वापर करणे. या विषयांची जनजागृती
करण्यासाठी कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विविध ठिकाणी त्यांच्या अखत्यारीत सहा ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
            उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण  तर्फे " सुरक्षा महावोकेथॉन" चे आयोजन करण्यात आले होते. उपप्रादेशिक कार्यालय ते प्रेम ऑटो व परत वरील मार्गा वरून ही वोकेथॉन आयोजित केली होती. सदर रॅली मध्ये उपप्रादेशिक कार्यलयातील अधिकारी, कर्मचारी, मोटर वाहन वितरकांचे प्रतिनिधी, मोटर प्रशिक्षण संस्थानचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, कर्मचारी, रिक्षा चालक-मालक संघटनेचे प्रतिनिधी, गुरुकृपा विद्यालयाच्या प्रचार्या व विद्यार्थी व १५५ नागरिक सहभागी झाले होते. यावेळी हेल्मेट वापरणे व हॉर्न न वाजविणे या विषयी जनजागृती करण्यात आली.
           उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण येथील विविध महाविद्यालयांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या सर्व विद्यार्थ्यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी उपस्थित राहून सहभागाबद्दल कौतुक केले

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...