Thursday 29 November 2018

कल्याण येथे राजाभाऊ पातकर यांचे न्यूटेक डायगनोस्टिक सेंटर सुरू होणार

कल्याण येथे अत्याधुनिक न्यूटेक डायगनोस्टिक सेंटर सुरू होणार

२ डिसेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री करणार उद्घाटन

कल्याण - (जैनेंन्द्र सैतवाल)
              येथील सुप्रसिद्ध असे उद्योगपती राजाभाऊ पातकर यांनी आरोग्य क्षेत्रात एक नवीन मुहूर्त मेढ रोवली आहे. फिलिप्स कंपनी ने जगात प्रथमच लॉंच केलेली अत्याधुनिक अशी ३ टेलसा अल्ट्राफास्ट डिजिटल एम आर आय व १२८ स्लाईस अल्ट्राफास्ट सी टी स्कॅन मशीन भारतात प्रथमच कल्याण शहरात, शेलार पार्क, खडकपाडा सर्कल जवळ कल्याण येथील  न्यूटेक डायगोनिस्टिक सेंटर च्या माध्यमातून दि. २ डिसेंबर २०१८ पासून सुरू होत आहे.
         दि.२ डिसेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या न्यूटेक सेंटर चे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्र्या सोबत जवळपास ५ ते ६ कॅबिनेट मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, मुंबई येथील नामांकित हॉस्पिटल चे डीन, डॉक्टर, उपस्थित राहणार असल्याचे राजाभाऊ पातकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...