Sunday 25 November 2018

स्तुत्य उपक्रम, वापरा व परत करा

रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ!

विनामूल्य वैद्यकीय साहित्य लायब्ररी सुरू : गरजूंनी लाभ घेण्याचे नगरसेवक कैलास सोनवणे यांचे आवाहन

जळगाव, दि.२४ - (प्रतिनिधी)
              शहरासह जिल्ह्यात नेहमी नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे रुग्णांसाठी विनामूल्य वैद्यकीय साहित्य लायब्ररीची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांच्या नातेवाईकांनी लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक, संस्था अध्यक्ष कैलासआप्पा सोनवणे यांनी केले आहे.
           स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय साहित्य लायब्ररी सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले.
           अत्याधुनिक साहित्य उपलब्ध
         वैद्यकीय साहित्य लायब्ररीमध्ये रुग्णांचा पलंग, व्हील चेअर, सलाईन स्टँड, वॉकर, स्ट्रेचर, वॉटर-एअर बेड, शवपेटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या या वस्तू वापरा व परत करा या तत्वावर जिल्हावासियांसाठी उपलब्ध आहेत.
            विनामूल्य लायब्ररीचा लाभ घ्यावा
स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेने सर्व साहित्य वापर व परत करा या तत्वानुसार विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातील गरजू नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केले आहे.
कुठं साधणार संपर्क?
         सर्व वैद्यकीय साहित्य स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था, नगरसेवक कैलास सोनवणे यांचे कार्यालय, बालाजी प्लाझा, बालाजी पेठ, जळगाव फोन 0257 - 2234455 तसेच संजय शर्मा, कमलेश सोनवणे, किरण भालोदकर, संदीप पाटील, मधुकर कोळी यांच्याशी संपर्क साधावा, असे कैलास सोनवणे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...