Friday 23 November 2018

कल्याण येथे लवकरच सुरू होणार न्यूटेक डायगणोस्टिक सेंटर

अत्याधुनिक न्यूटेक डायगणोस्टिक सेंटर लवकरच कल्याण मध्ये

२ डिसेंबर ला मुख्यमंत्री करणार उद्घाटन

कल्याण - ( जैनेंन्द्र सैतवाल)
             येथील प्रसिद्ध उद्योगपती व भाजप नेते राजाभाऊ पातकर यांनी आरोग्य क्षेत्रात एक नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आहे. अत्याधुनिक असे 3 telsa Ultrafast digital MRI मशीन व 128 Slice Ultrafast CT स्कॅन मशीन व जगातील प्रथमंच असे हे मशीन भारतात प्रथमच कल्याण शहरात न्यूटेक डायगणोस्टिक सेंटर च्या माध्यमातून येत आहे.
          दि.२ डिसेंम्बर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या न्यूटेक सेंटर चे उद्घाटन होणार आहे. हे सेंटर शेलारपार्क खडकपाडा सर्कल जवळ, कल्याण येथे आहे, मुख्यमंत्र्या सोबत जवळपास पाच ते सहा केबिनेट मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व सर्व पक्षांचे पदाधिकारी, मुंबई येथील नामांकित हॉस्पिटल साज डीन, डॉक्टर उपस्थित राहणार असल्याचे राजाभाऊ पातकर यांनी सांगितले.
          त्यानिमित्त नवीन वास्तूमध्ये सलग तीन दिवस पूजा, होम, शांती कार्यक्रम आयोजित केला आहे. गणेश याग, वास्तूशांती पूजा, नवचंडी होम अशा विविध पूजा राजाभाऊ सपत्नीक व संपूर्ण पातकर परिवारासह पूजेमध्ये सहभागी आहेत.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...