Thursday, 29 November 2018

कुळगाव-बदलापूर पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम

कुळगाव-बदलापूर पोलीस स्टेशन तर्फे पोलीस काका व पोलीस दिदी उपक्रम

काराव येथील आश्रम शाळांना मदत

बदलापूर - (जैनेंन्द्र सैतवाल)
            कुळगाव-बदलापूर (ग्रा) पोलीस स्टेशन तर्फे पोलीस काका व पोलीस दीदी या उपक्रमाअंतर्गत परिसरातील आश्रम शाळेतील मुला-मुलींना मदत करण्यात आली.
          या पोलीस स्टेशन चे एपीआय अविनाश पाटील यांच्या पुढाकाराने व आयोजनाने नकुल पाटील आश्रमशाळा काराव, डॉ. तोरसकर ज्युनियर कॉलेज काराव, आदिवासी आश्रम शाळा लावाहली येथील ५० मुला-मुलींना ब्लॅंकेट्स वाटप करण्यात आले.
       थंडीचे महिने म्हणजे हिवाळा सुरू झाल्याने येथील आश्रम शाळेतील मुलांना ब्लॅंकेट वाटप करून पोलीस काका व पोलीस दीदी हा उपक्रम आम्ही आयोजित करून या मुलांना पोलीस हे आपलेच वाटले पाहिजे व भीती न बाळगता मनसोक्त पोलीस काका व पोलीस दिदींशी बोलता यावे व संवाद साधता यावा या करिता असे उपक्रम आम्ही आयोजित करतो असे या वेळी एपीआय अविनाश पाटील म्हणाले.

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...