"अॉनलाईन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित नकाे : मासूची मागणी"!
कल्याण: (अण्णा पंडीत) महाराष्ट्र राज्य सरकार पुर्व प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्याचा विचार करत असुन त्या अनुषंगाने महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु ) या अराजकीय विद्यार्थी संघटनेकडुन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना अॉनलाइन ट्विटर द्वारे निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात मासु ने महाराष्ट्रातल्या सरकारी शाळा किंवा शासकीय अनुदानावर चालणाऱ्या शाळा यांचा बारकाईने विचार केला तर अशा शाळांमधील जवळपास सर्वच विद्यार्थी हे अतिशय गरीब कुटुंबातील आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाकीची आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने निर्णय घेतले आहेत की, जेथे कोरोना बाधित रुग्ण कमी आहेत किंवा नाहीत अशा ठिकाणी शाळा सुरु करण्याचा निर्णय विद्यार्थी हिताचा अजिबात नाही.जर दुदैवाने शाळेतील एखाद्या विद्यार्थ्यांला कोरोना ची लागण झाली तर त्याचा संसर्ग शाळेतील इतर विद्यार्थ्यांना होऊन अनेक विद्यार्थ्यांवर पर्यायाने त्यांच्या कुटुंबांवर संकट ओढवू शकते. म्हणून शासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये असे मत मासूचे राज्य उपाध्यक्ष सुनिल देवरे यांनी मांडले आहे.
मासुने निवेदनात अशीही मागणी केली आहे की,महाराष्ट्रांतील ग्रामीण भाग असो वा शहरी (काही अपवाद वगळता) सरकारी शाळा आणि शासन अनुदानित शाळांचा शिक्षणाचा दर्जा हा नियोजित पद्धतीने ढासळवण्यात आला आहे. अशा शाळांमध्ये मजुरांची आणि अत्यंत गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात.म्हणुन अॉनलाइन शिक्षण घेणे त्यांना शक्यच होणार नाही. भारतीय संविधानानुसार शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. म्हणुन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु ) ने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना मागणी केली आहे की,देशाचे भविष्य विद्यार्थी आहेत म्हणुन त्यांचे माय-बाप बनुन शासनाने त्यांना अॉनलाइन शिक्षणासाठी संपुर्ण यंत्रणा मोफत उपलब्ध करुन द्यावी. अशी मागणी मासूचे राज्य सहसचिव श्री.प्रशांत जाधव यांनी केली आहे. राज्य शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम दर्जाचे मोफत टॅब वितरित करावे आणि त्यामध्ये अॉफलाइन लेक्चर लोड करावेत, प्रत्येक शाळेत टोल फ्री क्रमांक असावा आणि त्यावर शिक्षकवर्ग शाळेच्या वेळेत तेथे त्या क्रमांकावर हजर राहतील अशी सुविधा करावी. जेणेकरुन विद्यार्थ्याना काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर त्यावरुन त्यांचे निरसन केले जाईल.अॉफलाइन लेक्चर कसं असावं याचं रेकाँर्डींग डेमो ( मासु ) संघटना शासनास देण्यास तयार असुन त्यासाठी शासनाने त्यांना संधी द्यावी अशीही विनंती आणि मागणी मासु ने आपल्या निवेदना द्वारे शासनास केली आहे.सदर निवेदनावर मासुचे राज्य उपाध्यक्ष सुनील देवरे आणि राज्य सहसचिव प्रशांत जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments:
Post a Comment