भिवंडी लोकसभा आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार आणि खासदार भाजपाचाच - खा कपिल पाटील!
कल्याण (संजय कांबळे) : भारतीय जनता पार्टीत अध्यक्ष, उपाध्यक्षापेक्षा सरचिटणीस हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. जो तो सरचिटणीस पदच मागतो कारण ही सरांची पार्टी आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात विकास केला आहे. त्यामुळे कोणी काही बोललं तरी भविष्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघातील आमदार हे भारतीय जनता पक्षाचे असतील असे भविष्य खासदार कपिल पाटील यांनी गोवेली येथील भाजपा च्या ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यकारणी नियुक्ती सोहळ्यात व्यक्त केले.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा कपिल पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणारे राहिले नाहीत. केवळ आणि केवळ विकास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले. त्यामुळे ते असे पर्यंत केंद्रात सरकार भाजपाचे असणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये. आपल्या वर पक्षाने जी जबाबदारी सोपविली आहे ती योग्यता पाहूनच म्हणून आपण देखील तसेच काम करायला पाहिजे. कारण तूमची योग्यता तूम्हाला आमदार, खासदार बनवू शकते. आमची खासदार व आमदारकीवर मक्तेदारी नाही. असेही पाटील यांनी सांगितले.
तर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले पदाधिकाऱ्यांनी राज्यात सरकार नाही म्हणून काळजी करू नये. कारण केंद्रात आपले सरकार आहे. पदाधिकाऱ्यांनी कामाकडे लक्ष दिले पाहिजे. ठाणे जिल्ह्यात ५३ जिल्हा परिषदेचे गट असून प्रत्येक गटात पदाधिकाऱ्यांनी लोकांची कामे करायला हवी. असे सांगून पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बहुतांश गावातील रस्ता झाला आहे. तसेच झेडपीच्या ताब्यातील मोठे रस्ते हे पी डब्ल्यू डि कडे घेण्यात येतील असे सांगून राज्याचे मुख्यमंत्री हे गेल्या पाच महिन्यांपासून मंत्रालयात आले नाहीत असे मुख्यमंत्री काय कामाचे असे ते म्हणाले. शिवाय काही महिन्यांनंतर शहापूर, मुरबाड आणि बदलापूर नगरपंचायतीच्या निवडणूका येत आहेत त्यामुळे येथे भाजपा जिंकला पाहिजे असे पदाधिकाऱ्यांना सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या ठाणे ग्रामीण कार्यकारणी नियुक्ती सोहळा गोवेली येथील जीवनदिप महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मुरबाड, शहापूर कल्याण येथील पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment