मुरबाड शहापूर तालुक्यांना जोडणारा काळू नदीवरील "विकास सेतू" चे काम प्रगतीपथावर !
कल्याण (संजय कांबळे) : मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांना जोडणारा काळू नदीवरील ब्रिटिश कालीन पुल सन २०१८ रोजी पाडण्यात आला. मात्र यानंतर प्रशासनाने कामाला गती दिल्याने अवघ्या एक, सव्वा वर्षात हा विकास सेतू उभा राहिल्याने परिसरातील २०/३० गावाचा येण्याजाण्याचा प्रश्न सुटला आहे.
शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यासह नाशिक, कर्जत पुणे या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा काळू नदीवरील पुल ब्रिटिश कालीन पुल जिर्ण झाला होता. याचे संरक्षक कठडे तुटले होते. जागोजागी भेगा पडल्या होत्या. त्यामुळे तो धोकादायक बनला होता. मुरबाड तालुक्यात कुडवली येथे एम आय डि सी असल्याने अनेकानी येथे उद्योग सुरू केले होते. यामुळे अवजड वाहने येथे ये जा करित होती.तसेच काळु नदीच्या परिसरातील दहिवली गाव, दहिवली पाडा, शेंद्रूण, गोकुळ गाव, कळगाव, भालूक, चिंचवली, टेंबरा, मासवन, बावघर, किले, शेरा तर मुरबाड मधील सापगाव, सरलांबे, कुटघर, अनदाड, नडगाव, नेहरोली, कुडवली, कांबारे, गोटेघर, वाफे आदी गावातील शेतकरी, दुध व्यावसायिक हे या तालुक्यातून त्या तालुक्यात येजा करित असत व यासाठी हा पुल खूप महत्त्वाचा होता. यामुळे दोन्ही तालुक्याचा विकास झाला.
दहिवली पाडा या गावाजवळील काळू नदीवरील पुलाची लांबी १६० मिटर तर याचे गाळे २×२९,००,१×३६ :००,२×३३,००असे होते. ते जिर्ण झाले होते. काही महिन्यांपासून या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी नवीन पुलाची अंत्यत गरज निर्माण झाली होती.
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी मतदारसंघातील मुख्य तसेच गावोगावचे अंतर्गत रस्ते क्राॅक्रीटिकरन करण्याचा चंग बांधला होता. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक कर्जत पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे दोन पदरी क्राॅक्रीटिकरन करण्याच्या कामाला मंजुरी आणली. ते काम सध्या सुरू आहे सन २०१८ मध्ये हा पुल ब्लास्टिंग करून पाडण्यात आला. परंतु तितक्याच गतीने याचे काम सुरू केल्याने सध्या हा पुल ७०/८० टक्के पुर्ण झाला आहे. यासाठी ७ खांबावर तो उभा असून सरक्षक कठडे व पुलाच्या दोन्ही बाजूंनी काम बाकी आहे. दिवस रात्र चालू असलेले काम पाहता हा पुल अवजड वाहनांसाठी देखील लवकरच सुरू होईल असे वाटते. सुरु झाल्यावर या परिसराचा विकास होऊन हा पुल "विकास सेतू" ठरावा ऐवढीच माफक अपेक्षा आहे.


No comments:
Post a Comment