राज्यात आज पुन्हा रुग्णसंख्येत घट ! लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम !! तरी मृत्यूचा आकडा चिंताजनक !!!
मुंबई : महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. राज्यात रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 34 हजार 389 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर 59 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. असे असले तरी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 974 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलाय. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 81 हजार 486 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 53 लाख 78 हजार 452 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 48 लाख 26 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. राज्यात सध्या 4 लाख 68 हजार 109 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
जासई जिल्हा परिषद गटात व चिर्ले पंचायत समिती गणात महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात !!
जासई जिल्हा परिषद गटात व चिर्ले पंचायत समिती गणात महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : र...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा.... *** आम्ही नगरकरांच्या वतीने "रस्ता व दरीच्या संरक्षक भिंतीं"वर रिफ्लेक्टर (परावर्तक ) ल...
-
"करकरे साहेब क्षमस्व" मा.करकरे साहेब आणि शहिद साथी, आम्ही दिलगीर आहोत, निर्दयी आहोत, कृतघ्न आहोत, नालायक आहोत, पात्रता...

No comments:
Post a Comment