Monday, 5 July 2021

अखेर १९ तासानंतर सापडला बुडालेल्या तरुणाचा मृतदेह !

अखेर १९ तासानंतर सापडला बुडालेल्या तरुणाचा मृतदेह !


टिटवाळा, उमेश जाधव -: येथील रुंदे गावा जवळील काळू नदी पात्रात रविवारी ४ जुलै रोजी एक १८  वर्षीय गणेश शेरखाने नावाचा मुलगा पोहायला उतरेलेला असता नदी पात्रात बुडाला होता. याबाबत टिटवाळा पोलीस स्थानकात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास खबर मिळताच टिटवाळा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या सहकार्याने त्याचा शोध सुरु केला. 


मात्र उशिर झाल्याने रात्री अंधारामुळे शोध कार्यात अडचणी आल्याने शोध मोहीम थांबविली. अखेर १९ तासा नंतर सोमवारी सकाळी पुन्हा काळू नदी पात्रात बुडालेल्या गणेशचा शोध घेत असता सकाळी ८:४० च्या दरम्यान त्याचा मृतदेह पोलीसांच्या हाती लागला.


याबाबत सविस्तर वृत्त असे की घोटसई रोड येथील ए.टी. नगर येथे राहणारा गणेश शेरखाने (१८) याच्या वडिलांनी रूंदे गावाजवळील शिवसाई नगर येथे नवीन घर घेतले होते. त्याची डागडुजी करण्यासाठी ते  रविवारी रूंदे येथे आले होते. यावेळी गणेशच्या वडिलांनी  गणेश याच्यासह आणखी दोन मुले आणि दोन मुली यांना सकळी ११:३० च्या सुमारास रूंदे जवळील काळू नदीच्या पात्रात अंघोळीसाठी सोडून ते पुन्हा आपल्या घरी आले. दुपारी   पुन्हा ते दीडच्या सुमारास आपल्या मुलांना घेण्यासाठी काळू नदीवर आले असता इतर मुळे त्यांना नदीच्या काठावर बसले असल्याची दिसली. मात्र गणेश हा कुठेही दिसून आला नाही. तेव्हा त्यांनी विचारपूस केली असता इतर मुलांनी तो पाण्यात पोहताना बुडाला असल्याची माहिती गणेशच्या वडिलांना दिली. याबाबतची माहिती गणेशच्या वडीलांनी टिटवाळा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी आपल्या पथकासह अग्निशमन दलाच्या सहकार्याने नदी पात्रात शोध घेतला. मात्र तो सापडून आला नाही म्हणून पुन्हा सोमवारी सकाळी शोध मोहीम चालू केली असता सकाळी ८:४० च्या सुमारास गणेशचा मृतदेह गुरवली गावाजावलच्या पाण्याच्या टाकी जवळ नदीपात्रात वाहत वाहत आला होता. त्याचा मृदेह पुढील तपासणीसाठी पाठवला असून याबाबत अधिक तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...