Tuesday, 20 July 2021

काळू नदीवर पूल रवीवारी रात्रीपासून ८ तास पाण्याखाली ! "सकाळी ९ वाजता पाणी ओसरले, पुन्हा पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता"

काळू नदीवर पूल रवीवारी रात्रीपासून ८ तास पाण्याखाली !
"सकाळी ९ वाजता पाणी ओसरले, पुन्हा पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता"


टिटवाळा उमेश जाधव :- रविवारी पावसाने मुसळधार सुरुवात करत कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत करून सोडले होते. तालुक्यातील काळू, भातसा, उल्हास व बारावी या नद्यांना पूर येऊन जागोजागी पाणी तुंबून पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. रूंदे गावा जवळून वाहणाऱ्या काळू नदीवरील पूल रवीवारी रात्री पाण्याखाली जाऊन सोमवारी सकाळी ९ वाजता ओसरल असून पुन्हा हा पूल पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त केली जाते. 


शनिवार व रविवार या दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावत कल्याण तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागाला चांगले झोडपून काढले आहे. तसेच सोमवारी देखील पावसाचा जोर कायम असल्याने जनजिवन विस्कळित झाले आहे.

या पावसामुळे तालुक्यातील काळू भातसा उल्हास व बारवी या नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना चांगलाच फटका बसला. या पुराच्या पाण्यामुळे रविवारी रात्री उशिरा रुंदे गावाजवळील काळू नदीवर असणारा पूलावरील पाण्याखाली गेला. यामुळे येथील १० ते १२ गावांचा शहरांशी संपर्क तुटला होता. पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने सोमवारी सकाळी नऊ च्या सुमारास पुलावरी पाणी ओसरले. परंतु पुला पाणि लागलेले असल्याने पावसाचे प्रमाण वाढले तर हा पुल पुन्हा पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.  
 
काळू नदीवरील पुल पावसाच्या पूरात पाण्याखाली जाणे ही बाब जणू काय आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा पुल चार ते पाच वेळा पाण्याखाली जातो. यामुळे या भागातील १० ते १२ गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
सखाराम जाधव, रहिवासी, फळेगांव

दरवर्षी आम्ही किती त्रास सहन करायचा हा पूल नेहमीच पावसाच्या पुरात पाण्याखाली जातो. यामुळे शालेय विद्यार्थी, चाकरमानी, व्यावसायिक,  दूधवाले व भाजीवाले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रशासनाने या बाबींवर लक्ष केंद्रित करून या ठिकाणी नवीन उंच पूल उभारावा.
भाऊ चौधरी, रहिवासी, रूंदे

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...