ठाण्यातील कळवा भागात दरड कोसळून ३ वर्षांच्या चिमुरडीसह ५ ठार.!
अरुण पाटील, भिवंडी, दिं.१९ :
रविवारी चेंबूर विक्रोळीत ईमारत व दरड कोसळून झालेल्या सुरघटनेत २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताज़ी असतानाच ठाण्यातील कळवा पूर्व भागात घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३ वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे.
आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान ही घटना आहे. ठाण्याचे आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळण्याची घटना घडली तेव्हा शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात १ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे.
ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणी यादव कुटुंब राहत होते. यादव कुटुंबातील सदस्य दरडीच्या ढिगाराखाली सापडले. यात 3 वर्षांच्या संध्या यादव आणि १० वर्षांच्या सिमरन यादव या चिमुरडीचा समावेश आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे.
घटनेत वाचवण्यात आलेल्यांची नावे अशी
आहेत (१) प्रिती यादव - वय ५ वर्षे, (२) आंचल यादव - वय १८ वर्षे, मृतांची नावे (१) प्रभू यादव : वय ४५ वर्षे (२) विधावतादेवी यादव : वय ४० वर्षे, (३) रविकिशन यादव : वय १२ वर्षे (४) सिमरन यादव : वय १० वर्षे (५)संध्या यादव : वय ३ वर्षे. अपघातात 5-6 जणांना कळवा शिवाजी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केले आहे. तर अजून ५-६ जण ढिगाराखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment