मुंबई -विरार येथील इमारतीच्या टेरेसवरून फेकून दिलेल्या नवजात मुलीचा मृत्यू.!
भिवंडी, दिं, 4,अरुण पाटील (कोपर) :
मुंबईजवळील विरारमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नवजात बाळाला इमारतीच्या टेरेसवरून खाली फेकण्यात आले आहे. या बाळाची प्रकृती चिंताजनक असतानाच तिचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील तुलिप सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने इमारतीच्या टेरेसवरून नुकताच जन्मलेल्या स्री जातीच्या बाळाला फेकुन दिले. सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांनी अर्भक आवळून आले आणि एकच खळबळ उडाली. रहिवाशांनी तातडीने याबद्दलची माहिती पोलिसांना कळवली.
त्याआधी स्थानिक नागरिकांनी बाळाला एका कपड्यात गुंडाळून नजीकच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. लहान बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. इवल्याशा जिवाला इमारतीच्या टेरेसवरून कुणी फेकले असावे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशां पैकी कुणीही हे कृत्य केलं नसल्याचं सांगितलं.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मात्र हे नवजात बाळ नेमकं कोणी फेकलं हे अजूनही स्पष्ट झाले नाही. अर्नाळा सागरी पोलीस घटनेचा सखोल तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. याच परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मातेनं हे कृत्य केल्याचं समोरं आले आहे. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

No comments:
Post a Comment